महाराष्ट्र टाईम्स - पहिलं पान
Maharashtra Times: Breaking news, views, reviews, cricket from across India
Updated: 3 hours 19 min ago
महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर
महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत बहुमताने मंजूर झाले. मंगळवारी संध्याकाळी झालेल्या मतदानात १८६ मते मिळवत विधेयक मंजूर झाले. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान झाले त्यावेळी फक्त एका सदस्याने विधेयकाचा विरोध केला. तृणमूल काँग्रेस मतदानाला गैरहजर राहिले तर बसपने मतदानावर बहिष्कार टाकला.
Categories: Main news
भाजपला हवे विदर्भ वैधानिक विकास मंडळ
विदर्भ राज्य संग्राम समितीने विदर्भ वैधानिक विकास मंडळ नकोच, अशी रोखठोक भूमिका या मंडळाची मुदत ३० एप्रिल रोजी संपत असताना सोमवारी घेतली असतानाच २४ तास उलटत नाहीत तोच समितीत एक घटक असलेल्या भाजपने नेमकी विरोधी भूमिका घेऊन एकच खळबळ उडवून दिली.
Categories: Main news
मतदान मनमानीः ममता
महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आलेली पद्धत, विधेयकाबाबत आपल्या पक्षाला अंधारात ठेवण्यात आले होते, अशी तक्रार तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली.
Categories: Main news
विलासरावांची 'फ्री स्टाइल'
दिल्लीत पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर एकत्र आलेल्या विविध पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरच्या चार मराठी नेत्यांनी एकमेकांवर केलेली टोलेबाजी आणि त्यातून निर्माण झालेल्या हास्यविनोदाने संध्याकाळ रंगली होती.
Categories: Main news
सात 'गोंधळी' खासदार निलंबित
ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयकाला विरोध करण्यासाठी काल, सोमवारी राज्यसभेचा ‘आखाडा’ करणा-या सात खासदारांवर आज निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल आणि लोक जनशक्ती पार्टीच्या खासदारांचा त्यात समावेश आहे.
Categories: Main news
अल्पवयीन अपहृत मुलीची सुटका
मालाड येथे राहणा-या निसार शेख (नाव बदललेले) या अकरा वर्षीय अपहृत मुलीची सुखरूप सुटका करण्यात क्राइम ब्रँच युनिट ११ च्या अधिका-यांना यश आले आहे.
Categories: Main news
हत्याप्रकरणी आरोपीस पो.कोठडी
नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद अजमेरी शेख याला १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश मॅजिस्ट्रेट कोर्टाने दिला आहे.
Categories: Main news
कसाबला शिक्षा लवकरच!
मुंबईवर २६ नोव्हेंबर, २००८ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील खटल्यामध्ये आजपासून अंतिम युक्तिवादाला सुरूवात झाली. यावेळी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि गृहराज्यमंत्री रमेश बागवे हे आज खटल्याच्या सुनावणीला उपस्थित होते.
Categories: Main news
मनसेचा महिला आरक्षणाला पाठिंबा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महिला आरक्षण विधेयकाला पूर्णपणे पाठिंबा आहे, अशी घोषणा पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली. या विधेयकाला विरोध करणा-या लालूप्रसाद, मुलायमांची संस्कृती त्यांच्या भूमिकेतून कळते, असा सणसणीत टोलाही त्यांनी हाणला.
Categories: Main news
'मराठी माणसाशी प्रतारणा नाही!'- राज
मराठी माणसाच्या भल्यासाठी, भूमिपुत्रांच्या उन्नतीसाठी आणि मराठी अस्मिता जपण्यासाठी आम्ही सतत काम करत राहू. मराठी माणसाशी कधीही प्रतारणा करणार नाही, असं वचन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिलं.
Categories: Main news
बोरिवलजवळ ओव्हरहेड वायर तुटली
बोरिवलीजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने चर्चगेटकडे येणा-या स्लो ट्रॅकवरील लोकल १० ते १५ मिनिटे उशीराने धावत आहेत. दरम्यान गाड्या इतर ट्रॅकवर वळवण्यात आल्या असून पुढील काही मिनिटांत वाहतूक सुरळीत होईल, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Categories: Main news
मनसैनिकांनी खेचली एअरटेलची ‘टेल’
मराठीत व्यवहार न करणा-या एअरटेलची टेल खेचा, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणात सांगितल्यानंतर अवघ्या काही तासांतच मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील नौपाडा परिसरात असलेल्या एअरटेलच्या गॅलरीवर दगडफेक केली.
Categories: Main news
‘छावा’च्या कार्यकर्त्यांनी जाळली बस
येथील परांडा भागात मराठा आरक्षणासाठी संशयित ‘छावा’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज एसटी बस जाळली. या घटनेमुळे बसमधील प्रवासी भयभीत झाले असून परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
Categories: Main news
'यादव त्रिकुटा'ला हवी सर्वपक्षीय चर्चा
बहुचर्चित, बहुप्रलंबित आणि वादग्रस्त महिला आरक्षण विधेयकावरून काल संसदेत 'यादवी' माजवणा-या यादव त्रिकुटानं आज पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही आपली नाराजी व्यक्त केली.
Categories: Main news
राज ठाकरेंना सुप्रीम कोर्टाची समज
मुंबईतल्या परप्रांतियांविरोधात तुझी प्रक्षोभक भाषणं जोवर सुरू राहतील, तोपर्यंत तुझ्यावर देशभरात खटले दाखल होतच राहणार...ही जहाल वक्तव्य थांबव, नाहीतर खटल्यांना सामोरा जा, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टानं राज ठाकरेंना समज दिली आहे.
Categories: Main news
परदेशी गुंतवणूकदारांनी पुण्याला दिले प्राधान्य
शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या उत्तम संस्था.... कुशल मनुष्यबळाची उपलब्धता..... उत्तम वातावरण अशा अनेक कारणांमुळे देश-विदेशातील उद्योगांनी पुण्यात गुंतवणुकीला प्राधान्य दिले आहे.
Categories: Main news
सेन्सेक्स १०८ ने उंचावला
शेअर बाजारात सोमवारी निवडक कंपन्यांची खरेदी झाली. त्यामुळे सेन्सेक्स १०८ अंशांनी उंचावला आणि १७,१०३वर स्थिरावला.
Categories: Main news
लीना गोखले यांच्या 'हेल्दी हॅबिट्स'!
उद्योजकता असो किंवा नव्या संशोधनासाठी लागणारी कल्पकता यात महिला कोठेही मागे नाहीत, हे आता नव्याने सांगण्याची गरज उरलेली नाही.
Categories: Main news
द. आफ्रिकेने भारताला रोखले
वर्ल्डकप 'ब' गट साखळीत भारताला चौथ्या स्थानावरच समाधान मानावे लागले.
Categories: Main news
कांगारू अव्वल
र्वल्डकप हॉकी स्पधेर्त 'ब' गटात ऑस्ट्रेलियाने १२ गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला तो सरस गोलसरासरीमुळे.
Categories: Main news
