सकाळ - राजकारण

Syndicate content visit www.eSakal.com
DesheSakal.com © CopyRight Sakaal Media Group.20092010
Updated: 1 hour 5 min ago

वायलर रवी यांचा लायबेरियात अपघात

Fri, 02/05/2010 - 14:58
अबुजा - लायबेरियात मोटार अपघातात जखमी झालेले परदेशस्थ भारतीय व्यवहार मंत्री वायलर रवी यांना उपचारासाठी आज विमानाने कोट दी आयव्होर येथे हलविण्यात आले आहे. रवी हे आफ्रिकेतील देशांच्या दौऱ्यावर आहेत. ते काल नायजेरियाला जाण्यासाठी विमानतळाकडे निघाले असताना मोनरोव्हिया येथे भरधाव मोटारीने त्यांच्या मोटारीला धडक दिली. यात ते जखमी झाले. या वेळी भारताचे राजदूतही त्यांच्यासमवेत होते. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. लायबेरियाचे अध्यक्ष एलन जॉनसन सरलिफ यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृती
Categories: Politics

पचौरी यांच्या पाठीशी दस्तुरखुद्द पंतप्रधान

Fri, 02/05/2010 - 14:55
नवी दिल्ली -nbsp हिमालयातील हिमनद्यांच्या प्रश्‍नांवरून सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पर्यावरणतज्ज्ञ आर. के. पचौरी यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज येथे दिली. दहाव्या शाश्‍वत विकास परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. पंतप्रधान म्हणाले, ""पचौरी यांनी जगात मोठा आदर मिळविला असून तापमानवाढीसंदर्भातील त्यांच्या कार्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. "इंटरकॉन्टिनेंन्टल पॅनेल ऑन क्‍लायमेट चेंज' (आयपीसीसी) वर भारताचा पूर्ण विश्‍वास आहे.
Categories: Politics

मुंबई हल्ल्यातील 'हॅंडलर' भारतीय

Fri, 02/05/2010 - 09:36
नवी दिल्ली -nbsp मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी हल्ला करणाऱ्या दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतातील एका साथीदाराने (हॅंडलर) मदत केली असल्याची माहिती हाती आली आहे मात्र या साथीदाराची ओळख अद्याप पटू शकलेली नाही, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आज दिली. मुंबई हल्ल्यासंदर्भात अशी माहिती सरकारकडून प्रथमच देण्यात आली आहे. "पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणारा साथीदार भारतीय असावा, असा आमचा संशय आहे. कदाचित या साथीदाराने भारतात घुसखोरी करून येथे प्रदीर्घ काळ मुक्काम केला असावा आणि भ
Categories: Politics

रुचिकाप्रकरणी राठोडला कमाल शिक्षेची विनंती

Fri, 02/05/2010 - 08:05
चंदीगड - रुचिकाप्रकरणी हरियानाचे माजी पोलिस महासंचालक एस.पी.एस. राठोड यांना दोन वर्षांपर्यंत कमाल शिक्षा ठोठावण्याची विनंती केंद्रीय गुप्तचर विभाग (सीबीआय) ने आज (ता.५) न्यायालयाला केली. या प्रकरणाची सुनावणी येत्या ८ तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. न्यायालयाने यापूर्वी राठोड याला सुनावलेल्या सहा महिने सक्तमजुरीच्या शिक्षेला "सीबीआय'ने काल आव्हान दिले होते. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर.एस.अत्री यांनी "सीबीआय'ची विनंती आणि तक्रारदार मधु प्रकाश यांनी केलेली पुनर्विचाराची विनंती लक्
Categories: Politics

रुचिकाप्रकरणी राठोडला कमाल शिक्षेची विनंती

Fri, 02/05/2010 - 07:36
चंडीगड - रुचिकाप्रकरणी हरियानाचे माजी पोलिस महासंचालक एस.पी.एस. राठोड यांना दोन वर्षांपर्यंत कमाल शिक्षा ठोठावण्याची विनंती केंद्रीय गुप्तचर विभाग (सीबीआय) ने आज (ता.५) न्यायालयाला केली. या प्रकरणाची सुनावणी येत्या ८ तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. न्यायालयाने यापूर्वी राठोड याला सुनावलेल्या सहा महिने सक्तमजुरीच्या शिक्षेला "सीबीआय'ने काल आव्हान दिले होते. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर.एस.अत्री यांनी "सीबीआय'ची विनंती आणि तक्रारदार मधु प्रकाश यांनी केलेली पुनर्विचाराची विनंती लक्
Categories: Politics

सोहराबुद्दीन प्रकरणी दिनेश यांना जामीन नाकारला

Fri, 02/05/2010 - 07:04
नवी दिल्ली - सोहराबुद्दीन शेख बनावट एन्काउंटरप्रकरणातील प्रमुख आरोपी आणि भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी एम.एन. दिनेश यांना सर्वोच्च न्यायालयाने आज (ता.५) जामीन नाकारला. न्या. पी. सथीसिवम आणि न्या. एच.एल. दत्तू यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने दिनेश यांचा जामीनअर्ज रद्दबातल ठरवत फेटाळून लावतानाच त्यांना गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यास परवानगी दिली.
Categories: Politics

लोकलच्या तिकिटासाठी राहुल गांधी रांगेत

Fri, 02/05/2010 - 06:49
मुंबई - अंधेरीहून वेस्टर्न रेल्वेने दादरला आलेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस राहुल गांधी, दादर रेल्वे स्थानकात तिकिटासाठी अन्य प्रवाशांबरोबर रांगेत उभे राहिले आणि तिकीट घेतले. त्यापूर्वी त्यांनी स्थानकावरील 'एटीएम'मधून पैसेही काढले आणि सामान्य प्रवाशाप्रमाणे लोकलमधून घाटकोपरपर्यंतचा प्रवास केला. nbsp राहुल गांधी स्थानकात तिकिटाच्या खिडकीवर उभे असताना, योगायोगाने मुंबईतील एका दैनिकाचा छायाचित्रकार स्थानकावर आला होता. राहुल गांधी सामान्य प्रवाशाप्रमाणे रांगेत उभे असल्याची खात्री पटत
Categories: Politics

कॉंग्रेस कार्यसमितीत महागाई, तेलंगणावर चर्चा

Fri, 02/05/2010 - 06:41
नवी दिल्ली - देशातील महागाई आणि वेगळ्या तेलंगणाच्या मुद्यावर आज (ता.५) झालेल्या कॉंग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत तीव्र महागाईची परिस्थिती हाताळण्यासाठी करायच्या उपाययोजनांबद्दल विचारविनिमय करण्यात आला. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी उद्या (ता.६) बोलवलेली सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आणि याच महिन्याच्या अखेरीस सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत सुरू असलेल्या सल्लामसलतींच्या पार्श्‍वभूमी
Categories: Politics

माजी आमदाराने दिला अतिरेक्‍याला आश्रय

Fri, 02/05/2010 - 04:14
नवी दिल्ली - "बाटला हाऊस'चकमकीतून सहीसलामत निसटलेला इंडियन मुजाहिदीन या संघटनेचा अतिरेकी शहझाद आलम याने दिल्लीतील एका माजी आमदाराने त्याला आश्रय आणि पैसे दिल्याची कबुली पोलिसांसमोर दिल्याचे वृत्त आहे. बिहारमधील एक माजी मंत्री आणि मुंबईतील एका प्रभावी राजकीय नेत्याने या प्रकरणात आपली अटक टाळण्यासाठी मदत केल्याचे शहझाद आलमने सांगितल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिली. आलमला उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी गेल्या सोमवारी अटक करून दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर मंगळवारी त्याला
Categories: Politics

मुंबई हल्ल्यातील 'हॅंडलर' भारतीय

Fri, 02/05/2010 - 01:17
नवी दिल्ली -nbsp मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी हल्ला करणाऱ्या दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतातील एका साथीदाराने (हॅंडलर) मदत केली असल्याची माहिती हाती आली आहे मात्र या साथीदाराची ओळख अद्याप पटू शकलेली नाही, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आज दिली. मुंबई हल्ल्यासंदर्भात अशी माहिती सरकारकडून प्रथमच देण्यात आली आहे. "पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणारा साथीदार भारतीय असावा, असा आमचा संशय आहे. कदाचित या साथीदाराने भारतात घुसखोरी करून येथे प्रदीर्घ काळ मुक्काम केला असावा आणि
Categories: Politics

मुंबई हल्ल्यातील 'हॅंडलर' भारतीय

Thu, 02/04/2010 - 17:08
नवी दिल्ली -nbsp मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी हल्ला करणाऱ्या दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतातील एका साथीदाराने (हॅंडलर) मदत केली असल्याची माहिती हाती आली आहे मात्र या साथीदाराची ओळख अद्याप पटू शकलेली नाही, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आज दिली. मुंबई हल्ल्यासंदर्भात अशी माहिती सरकारकडून प्रथमच देण्यात आली आहे. "पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणारा साथीदार भारतीय असावा, असा आमचा संशय आहे. कदाचित या साथीदाराने भारतात घुसखोरी करून येथे प्रदीर्घ काळ मुक्काम केला असावा आणि
Categories: Politics

शीतपेये, चॉकलेट उत्पादकांना साखर आयातीची सूचना?

Thu, 02/04/2010 - 16:57
नवी दिल्ली -nbsp शीतपेये, फळांच्या रसाची उत्पादने, चॉकलेट आणि आइस्क्रीम उत्पादनांसाठी लागणारी साखर या पदार्थांच्या उत्पादकांना परस्पर आयात करण्यास सांगण्याचा गांभीर्याने विचार केला जाईल, असे आश्‍वासन केंद्रीय कृषी, अन्न व नागरी पुरवठामंत्री शरद पवार यांनी दिल्याचे आज सांगण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते कन्हय्यालाल गिडवानी यांनी साखरेचे भाव कमी करण्यासंदर्भात गेल्याच आठवड्यात वरील उपायांबरोबरच इतरही काही उपाय सुचविणारे पत्र पंतप्रधान, अर्थमंत्री, पवार व त्यांचे सहकारी के. व्ही
Categories: Politics

बाटला हाउस चकमकीची चौकशी व्हावी - दिग्विजयसिंह

Thu, 02/04/2010 - 16:55
नवी दिल्ली -nbsp दोन वर्षांपूर्वी बाटला हाउसमध्ये झालेल्या पोलिस चकमकीची चौकशी व्हावी, या कॉंग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंह यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. कॉंग्रेस कार्यकारिणीची उद्या बैठक होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर वाद टाळण्यासाठी पक्षाने या वक्तव्यापासून स्वतःला दूर ठेवणे पसंत केले आहे. दिग्विजयसिंह यांनी आझमगड जिल्ह्यातील संजालपूर येथे जाऊन बाटला हाउस प्रकरणाच्या फेरचौकशीची मागणी केल्याचे वृत्त येऊन धडकल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी तातडीने मुख्
Categories: Politics

शिवसेनेपुढे झुकण्यास शाहरुख खानचा नकार

Thu, 02/04/2010 - 16:55
लंडन -nbsp आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना सहभागी करून घेण्याच्या आपल्या भूमिकेवर अभिनेता शाहरुख खानने आज पुन्हा ठाम भूमिका घेतली आहे. शिवसेनेने मागणी केली म्हणून मी माफी मागण्याचा प्रश्‍नच नाही. यावर, मी जाहीर केलेल्या मतांबद्दल मी कशाला माघार घेऊ, असा सवालही त्याने केला आहे. शाहरुख खानने माफी मागावी, अशी मागणी करीत शिवसेनेने त्याच्या "माय नेम इज खान' या चित्रपटावर बहिष्कार घातला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आज येथे चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आयोजित पत्रकार परिषदेत तो बोलत होता. या वेळी दिग्दर्
Categories: Politics

पेट्रोल दरवाढीवर अर्थसंकल्पाआधी निर्णय?

Thu, 02/04/2010 - 16:55
नवी दिल्ली -nbsp पेट्रोल-डिझेलसह स्वयंपाकाचा गॅस आणि रॉकेलच्या दरात वाढ करण्याच्या पारिख समितीच्या अहवालाला राजकीय पक्षांनी कडाडून विरोध केला आहे. या अहवालावर केंद्रीय अर्थसंकल्पाआधी निर्णय होण्याची शक्‍यता असल्याचे पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी सांगितले. पंतप्रधानांनी नेमलेल्या किरीट पारिख यांच्या नेतृत्वाखालील समितीने गॅस सिलिंडरच्या दरात शंभर रुपयांनी, तर रॉकेलच्या दरात सहा रुपयांनी वाढ करण्याची शिफारस केली होती तसेच पेट्रोलचे दर 4.72 आणि डिझेलचे दर 2.33 रुपयांनी वाढविण्याचे या शिफा
Categories: Politics

भाजपने केली शाहरुखची प्रशंसा

Thu, 02/04/2010 - 16:55
नवी दिल्ली -nbsp मुंबई, महाराष्ट्र व मराठी भाषेची सक्ती आदी वादग्रस्त मुद्यांवर "मुंबईत एक आणि दिल्लीत दुसरी' अशा वेगवेगळ्या भूमिका घेणाऱ्या भाजपने अभिनेता शाहरुख खानची आज प्रशंसा केली. शाहरुखच्या किंवा कोणत्याही चित्रपटांच्या विरोधातील हिंसाचार भाजपला मान्य नाही, असे सांगून भाजपने बदललेल्या भूमिकेचाही प्रत्यय आणून दिला. "आयपीएल' स्पर्धेतील पाक क्रिकेटपटूंच्या प्रस्तावित लिलावावरून शाहरुख खान व शिवसेनेची सध्या जुंपली आहे. पक्षाचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी सांगितले, की सांस्कृतिक दहशतवादाच
Categories: Politics

पाकशी पुन्हा चर्चा सुरू करण्याचा भारताचा निर्णय

Thu, 02/04/2010 - 16:40
नवी दिल्ली -nbsp पाकिस्तानबरोबर परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा सुरू करण्याचा प्रस्ताव भारताने ठेवला आहे. दोन देशांत शांतता प्रस्थापित करण्यासाठी दहशतवादाप्रमाणेच कोणत्याही विषयावर चर्चा करण्याचा निर्णय भारताने आज घेतला. पाकिस्तानने या निर्णयाचे स्वागत केले आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने चर्चा थांबविली होती, तसेच दहशतवाद्यांवर कठोर कारवाई केल्यानंतरच चर्चा करण्याची भूमिका जाहीर केली होती. परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले, ""या हल्ल्यात गुंतलेल्या सात दहशतवाद्यांवि
Categories: Politics

कंधमाल जिल्ह्याला दिली युरोपियन शिष्टमंडळाने भेट

Thu, 02/04/2010 - 16:40
भुवनेश्‍वर -nbsp ओरिसातील कंधमाल जिल्ह्याला युरोपियन समुदायाच्या 11 सदस्यीय शिष्टमंडळाने अखेर गुरुवारी भेट दिली. विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने दिलेल्या निदर्शनांच्या इशाऱ्यानंतरही या शिष्टमंडळातील चार सदस्यांना नंदगिरी येथील पुनर्वसन केंद्राला भेट देण्याची परवानगी राज्य सरकारने दिली. युरोपातील नऊ देशांतून आलेल्या या शिष्टमंडळाने नंदगिरी केंद्रातील दंगलपीडितांची अर्धा तास विचारपूस करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. दोन वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर तेथे कडेकोट बंदोबस्त ठेवण
Categories: Politics

महागाई रोखण्यासाठी आंध्रात 'टास्क फोर्स'

Thu, 02/04/2010 - 16:40
हैदराबाद -nbsp महागाई आटोक्‍यात आणण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने अनेक उपाययोजना केल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री के. रोसय्या यांनी आज दिली. व्यापारी, मिल मालक यांना परवाना पद्धतीअंतर्गत आणण्यात आले आहे. साठवणूक क्षमतेची मर्यादा ठरविण्यात आली आहे तसेच साठेबाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी "टास्क फोर्स'ची स्थापना करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. तांदूळ, डाळी, खाद्यतेल आदी जीवनावश्‍यक वस्तूंच्या किमतीवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याचे निर्देश नागरी पुरवठा विभागाला देण्यात आले आहेत. सामान
Categories: Politics

गुजरातमध्ये सिमेंट प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन

Thu, 02/04/2010 - 16:40
अहमदाबाद -nbsp सिमेंट प्रकल्पासाठी शेतजमीन संपादित करण्याच्या प्रक्रियेला विरोध करण्यासाठी गुजरातमधील महुआ येथील शेतकऱ्यांनी गुरुवारी "रास्ता रोको' आंदोलन केले. सुमारे 11 हजार आंदोलक शेतकऱ्यांनी गांधीनगर महामार्ग दोन तासांसाठी रोखून धरला. भावनगर जिल्ह्यात महुआ येथे सिमेंट प्रकल्प उभारण्यासाठी राज्य सरकार निरमा कंपनीला सुमारे चार हजार एकर शेतजमीन देणार आहे. ही जमीन बागायती असल्याने तेथील शेतकऱ्यांनी या संपादन प्रक्रियेला विरोध केला आहे. महुआचे भारतीय जनता पक्षाचे आमदार कनुभाई कलसारिया यांच्या
Categories: Politics