नवप्रभा (गोवा) - मुख्य पान
The Latest news from Goa in Marathi, India right to your desktop, everyday, from Navprabha
Updated: 17 min 9 sec ago
ansari
राज्यसभेत सभाध्यक्ष हमीद अन्सारी यांच्या टेबलवरील कागदपत्रे समाजवादी पक्षाच्या एका खासदाराने फाडून अशी भिरकावली.
Categories: Main news
महिला आरक्षण विधेयकावर आज मतदान
महिला आरक्षण विधेयकावर आज मतदान
समाजवादी पक्ष व राजदकडून सरकारचा पाठिंबा मागे
बहुचर्चित महिला आरक्षण विधेयक केंद्रीय कायदा मंत्री वीराप्पा मोईली यांनी काल राज्यसभेत मांडले, मात्र, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या जोरदार विरोधामुळे काल त्यावर मतदान होऊ शकले नाही. आज त्यावर मतदान अपेक्षित आहे. राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज गदारोळामुळे काल दिवसभरासाठी स्थगित करावे लागले. सरकार हे विधेयक आहे त्या स्वरूपात संमत करू पाहात असल्याचे दिसताच विद्यमान संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याची घोषणा समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी केली.
Categories: Main news
जि. प. निवडणुकीची आज मतमोजणी
जि. प. निवडणुकीची आज मतमोजणी
रविवारी झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. सर्व अकराही तालुक्यांत मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे.
तिसवाडी तालुक्याची मतमोजणी मिनेझिस ब्रागांझा सभागृहात होणार आहे. सत्तरीची मोजणी वनप्रशिक्षण विद्यालय, डिचोलीची हिराबाई झाटये मेमोरियल हॉल, बार्देश तालुक्याची सरकारी क्रीडा प्रकल्प पेडे-म्हापसा, पेडणे तालुक्याची पेडणे सरकारी कार्यालय प्रकल्प, सासष्टीची मल्टिपर्पज स्कूल सभागृह, काणकोणची मामलेदार कार्यालयातील परिषदगृह, केपे तालुक्याची उपजिल्हाधिकाऱ्यांच्या इमारतीत, सांगे तालुक्याची मोजणी सरकारी क्रीडा प्रकल्प खैरीकाटे-सांगे, फोंड्याची सरकारी क्रीडा प्रकल्प-कुर्टी तर मुरगावची क्रीडा प्राधिकरणाचे मल्टिपर्पज हॉल-बायणा येथे मतमोजणी होणार आहे.
Categories: Main news
महागाईविरोधात आजपासून भाजपचे हस्ताक्षर अभियान
महागाईविरोधात आजपासून भाजपचे हस्ताक्षर अभियान
उद्या बुधवार दि. 10पासून प्रदेश भाजपने वाढत्या महागाईविरोधात जनतेमध्ये जागृती करून सुमारे दोन लाख सह्यांचे निवेदन केंद्राला पाठविण्यासाठी हस्ताक्षर अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
Categories: Main news
कारच्या धडकेने एका महिलेचा मृत्यू, दुसरी जखमी
कारच्या धडकेने एका महिलेचा मृत्यू, दुसरी जखमी
माड्डीतळप येथे काल एका कारने धडक दिल्यामुळे पोळे येथील प्रतिभा मोहन पडवळकर (50) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर लक्ष्मी रघुनाथ नाईक (50) ही महिला गंभीर जखमी झाली आहे.
Categories: Main news
त्या' पाचही पोलिसांना अटक करण्याची पर्रीकर यांची मागणी
"त्या' पाचही पोलिसांना अटक करण्याची पर्रीकर यांची मागणी
सध्या गाजत असलेला अमली पदार्थ गैरव्यवहाराचा विषय अत्यंत गंभीर असून त्यात गुंतलेल्या पाचही पोलिसांना अटक करून त्यांना कोठडीत डांबूनच स्वतंत्र केंद्रीय यंत्रणेद्वारे चौकशी करण्याची मागणी विरोधी नेते मनोहर पर्रीकर यांनी केली.
Categories: Main news
कणकुंबीतील ग्रामस्थांनी रोखले कळसा कालव्याचे बांधकाम
कणकुंबीतील ग्रामस्थांनी रोखले कळसा कालव्याचे बांधकाम
चोर्ला घाटरस्त्याची दुरावस्था झाल्याने कणकुंबी परिसरातील ग्रामस्थांनी कळसा कालव्याचे बांधकाम रोखले आणि बंद पाडले. रस्त्याच्या बांधकामाचे कामकाज प्राधान्यक्रमाने हाती घेतले नाही तर हा लढा तीव्र करू, असा निर्णय कणकुंबी व परिसरातील ग्रामस्थांनी घेतला आहे.
Categories: Main news
भारत निर्माण माहिती कार्यक्रम गुरुवारपासून
भारत निर्माण माहिती कार्यक्रम गुरुवारपासून
गोव्यात राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या केंद्रीय योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती करून देण्याच्या हेतूने पत्रसूचना कार्यालयाने दि. 11 ते 15 मार्च या काळात भारत निर्माण माहिती कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविले आहे, अशी माहिती पसूकाचे उपसंचालक दिलीप देशपांडे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितली.
Categories: Main news
अंगणवाडी सेविकांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा
अंगणवाडी सेविकांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा
सरकारदरबारी अडून पडलेल्या आपल्या वेगवेगळ्या मागण्या धसास लावाव्यात यासाठी काल गोवाभरातील सुमारे 1 हजार अंगणवाडी सेविकांनी पणजी शहरातून मोर्चा काढला आणि नंतर महिला व बालविकास खात्याच्या कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली.
Categories: Main news
स्कार्लेट मृत्युप्रकरण दोघांविरुध्द आरोप निश्चित
स्कार्लेट मृत्युप्रकरण दोघांविरुध्द आरोप निश्चित
2007 मध्ये गाजलेल्या स्कार्लेट मृत्युप्रकरणी काल बाल न्यायालयाने सॅमसन डिसोझा आणि पॅलेसिओ काव्होल्लो या संशयितांविरुध्द आरोप निश्चित केले.
गेल्या 21 ऑक्टोबर रोजी सीबीआयने वरील दोघांविरुध्द आरोपपत्र सादर केले होते. स्कार्लेट या जर्मन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून नंतर तिची हत्या केल्याच्या घटनेने तीन वर्षांपूर्वी खळबळ उडाली होती. भारतासह परदेशातही ही घटना गाजली होती.
Categories: Main news
महिला आरक्षण विधेयकाला आज राज्यसभेत मंजुरी मिळणार
महिला आरक्षण विधेयकाला आज राज्यसभेत मंजुरी मिळणार
समाजवादी पार्टी, राजदचा प्रखर विरोध
आज आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा होत असताना राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने पूर्ण तयारी केली आहे. कॉंग्रेससह भाजप, डावे पक्ष आणि अनेक लहान पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दर्शविला आहे. मात्र समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय जनता दल यांनी सदर विधेयकाला मुस्लिम आणि दलितविरोधी संबोधत विरोध केला आहे.
Categories: Main news
जिल्हा पंचायत निवडणुकीत 57.22 टक्के मतदान
जिल्हा पंचायत निवडणुकीत 57.22 टक्के मतदान
काल झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत 57.22 टक्के एवढे मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त बोरकर यांनी दिली. पेडणे तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 65.18 टक्के एवढे मतदान झाले. तर सर्वात कमी म्हणजे 49.27 टक्के एवढे मतदान मुरगाव तालुक्यात झाले.
पेडण्यापाठोपाठ डिचोलीत 63.41, केपेमध्ये 62.37, सत्तरीत 60.34, काणकोणात 60.7, बार्देशमध्ये 56.82, तिसवाडीत 54.33, सांगेमध्ये 53.90, फोंड्यात 53.29, सासष्टीत 50.86 टक्के मतदान झाले. 48 मतदारसंघांतून काल झालेल्या या निवडणुकीत कुठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नसल्याचे राज्य निवडणूक आयुक्त बोरकर यांनी स्पष्ट केले. मात्र आमच्या मडगाव प्रतिनिधीने दिलेल्या वृत्ताप्रमाणे काल नुवेतील एका मतदानकेंद्रावर रिकामी मतपत्रिका भरली गेल्याप्रकरणी मिकी समर्थकांनी नेहरू स्टेडियमजवळ मोर्चा काढला. त्यावेळी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
Categories: Main news
माजी मंत्र्याचे त्या पोलीस अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी प्रयत्न ?
माजी मंत्र्याचे त्या पोलीस अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी प्रयत्न ?
"दुडू' प्रकरणामुळे गोवा पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली जात असतानाही आता नवी नवी माहिती पुढे येऊ लागलेली असून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात प्रथम दर्शनी ज्या पोलीस अधिकाऱ्याविरुध्द पुरावे सापडले आहेत त्या आशिश शिरोडकर या पोलीस अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी एका माजी मंत्र्याने शर्थीचे प्रयत्न केले होते असे समजते.
Categories: Main news
कसाबवरील खटल्याचा अंतिम युक्तिवाद उद्यापासून
कसाबवरील खटल्याचा अंतिम युक्तिवाद उद्यापासून
26/11च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याच्यावरील खटल्यातील अंतिम युक्तिवादाला उद्या दि. 9 पासून सुरवात होणार आहे. आपण दहशतवादी नसून पोलिसांनी आपल्यावर तसा ठपका ठेवला आहे, असा आरोप कसाबने केला होता. त्या मुद्यावर विशेष न्यायालयातील खटल्यात प्रकाश टाकला जाण्याची शक्यता आहे.
Categories: Main news
नगरपालिका निवडणूक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राव्दारेच
नगरपालिका निवडणूक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राव्दारेच
राज्य निवडणूक आयोगाकडे आवश्यक तेवढी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे नसल्याने काल जिल्हा पंचायतींची निवडणूक मतपत्रिकेव्दारे घेण्यात आली असली तरी पुढील ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेली नगरपालिका निवडणूक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांव्दारेच घेण्यात येईल व त्यासाठी आवश्यक असलेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून मागवण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोग कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.
Categories: Main news
अमली पदार्थ व्यवहारप्रकरणी कुणाचीही गय नाही: रवी नाईक
अमली पदार्थ व्यवहारप्रकरणी कुणाचीही गय नाही: रवी नाईक
राज्यातील अमली पदार्थ व्यवहारात गुंतलेल्यांच्या विरोधात राज्य सरकार कडक कारवाई करणार असून या सर्व प्रकारांची कसून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. याबाबत कोणत्याही प्रकारची हलगर्जी केली जाणार नसल्याची प्रतिक्रिया गृहमंत्री रवी नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
Categories: Main news
भाऊसाहेब बांदोडकर जन्मशताब्दी सोहळ्याला शुक्रवारपासून प्रारंभ
भाऊसाहेब बांदोडकर जन्मशताब्दी सोहळ्याला शुक्रवारपासून प्रारंभ
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत दयानंद बांदोडकर यांची जन्मशताब्दी सरकारी पातळीवर साजरी करण्याचे गोवा सरकारने ठरवले असून या सोहळ्याचा शुभारंभ दि. 12 मार्च रोजी होणार आहे.
Categories: Main news
साईबाबांचे प्रेषित भासवून लुबाडणाऱ्या चौघांना अटक
साईबाबांचे प्रेषित भासवून लुबाडणाऱ्या चौघांना अटक
भगवी वस्त्रे परिधान करून आपण साईबाबांचे प्रेषित आहोत व आपण कोणतीही समस्या विभूतीने दूर करतो, असे सांगून लोकांना लुबाडणाऱ्या चौघांना वरचा बाजार-फोंडा येथे काल पोलिसांनी अटक केली.
Categories: Main news
