सकाळ - मुंबई
पाच वर्षांच्या मुलीवर दोघा नराधमांचे लैंगिक अत्याचार
मुंबई - घरासमोर खेळणाऱ्या एका पाच वर्षीय मुलीला खाऊचे आमिष दाखवून दोघा नराधमांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना काल रात्री उशिरा ट्रॉम्बे येथील चिता कॅम्प परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी या दोघा जणांना अटक केली. आज दुपारी उपचार सुरू असताना ही पीडित मुलगी दगावल्याची अफवा पसरल्याने या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर आलेल्या संतप्त जमावाने एका आरोपीच्या दुकानाची तोडफोडही केली. या दोन्ही आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दा
Categories: Mumbai
ठाण्यातील रेमंड कंपनीचा आज होणार निर्णय
ठाणे - रेमंड कंपनी बंद होणार या भीतीने हजारो कामगार चिंतेत आहेत. या विषयावर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कंपनी बंद होऊ नये, यासाठी प्रयत्न केले आहेत. अखेर या विषयावर उद्या (ता. 3) दुपारी अडीच वाजता कंपनीचे व्यवस्थापन, लोकप्रतिनिधी आणि कामगार संघटनेच्या चर्चेनंतर कंपनीच्या पुढील वाटचालीची दिशा ठरणार आहे. कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दालनात रेमंड कंपनीबाबतची बैठक होणार आहे. सरनाईक यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे ही कंपनी बंद पडू न देण्यासाठी पाठपु
Categories: Mumbai
खून खटल्याचा निकाल दोन महिन्यांत लावण्याचा आदेश
मुंबई - nbsp शहापुरातील एका हत्याप्रकरणीच्या 20 वर्षे रखडलेल्या खून खटल्याचा निकाल कल्याण सत्र न्यायालयाने दोन महिन्यांत लावावा, असा आदेश उच्च न्यायालयाने आज दिला. हे प्रकरण 1989 पासून सुरू आहे. 22 मार्च 1989 रोजी शहापुरात एका व्यक्तीचा खून झाला होता. त्यात तिघांवर आरोप ठेवण्यात आले होते. त्याप्रकरणी सुनील कौशिक हा आरोपी असून अन्य दोघे फरारी आहेत. कौशिकविरुद्ध कल्याणच्या सत्र न्यायालयात 1990 मध्ये खटला सुरू झाल्यावर या ना त्या कारणांनी तो चांगलाच रखडला. नंतर त्याची सुनावणीच होईनाशी झाली, त्या
Categories: Mumbai
सिमेन्सची नवी लोकल आता हार्बर मार्गावरही
मुंबई - nbsp मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सिमेन्स कंपनीच्या आधुनिक गाड्यांतून प्रवास करण्याची संधी आता हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही मिळणार आहे. येत्या 5 तारखेपासून या नव्या गाडीच्या 16 फेऱ्या हार्बर मार्गावर सुरू होणार आहेत. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर सिमेन्स कंपनीच्या गाड्या धावतात मात्र हार्बरच्या सेवेत या गाड्या आत्तापर्यंत नव्हत्या. त्यामुळे सुरुवातीला एक खास नवी रेक या मार्गावर चालविण्यात येणार असून दिवसभरात या गाडीच्या 16 फेऱ्या होणार आहेत. ठाणे-पनवेल मार्गावर फास्ट लो
Categories: Mumbai
वसईत विद्यार्थिनीची; तर विरारमध्ये तरुणाची आत्महत्या
विरार - nbsp अभ्यास लक्षात राहत नसल्याच्या कारणाने पूनमदेवी अंतिल (वय 26) या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली तर विरार येथील सुमित निवंडेकर (वय 26) यानेही गळफास घेऊन आत्महत्या केली. वसई पूर्वेकडील वसंतनगरी येथे राहणारी पूनमदेवी अंतिल ही वसईतील वर्तक महाविद्यालयात बी.ए.च्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होती. घटस्फोट झाल्याने ती सध्या माहेरी राहत होती. अभ्यास लक्षात राहत नसल्याने ती परीक्षेला बसत नव्हती. याच वैफल्यातून पूनमदेवीने बेडरूममध्ये पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाब
Categories: Mumbai
शाहरुखने माफी मागावी, नाहीतर...
मुंबई - पाकिस्तानी क्रिकेटपटूंची पाठराखण केल्याबद्दल आणि मुंबई सर्व भारतीयांची असल्याचे वक्तव्य केल्याबद्दल अभिनेता शाहरूख खानने माफी मागितली नाही, तर त्याचा एकही चित्रपट मुंबईत प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे नेते आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांनी दिला आहे. शाहरूखने सोमवारीच माफी मागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईसह महाराष्ट्रवासियांना शाहरूख विरुद्ध शिवसेना असा नाट्यमय "सिनेमा' पाहायला मिळण्याची शक्यता आहे. "शाहरुख खान असो की अन्य कोण
Categories: Mumbai
पालिकेपुढे पाण्याच्या नियोजनाचे आव्हान
मुंबई - मुंबईची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि पाण्याची गरज यात मोठी तफावत निर्माण झाली आहे. पाण्याची गरज भागविण्यासाठी पुढील 25 वर्षांचे नियोजन करणे हे पालिकेपुढे मोठे आव्हान आहे, अशी कबुली पालिका आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी आज येथे दिली. डॉ. माधव चितळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने भविष्यात वाढणारी लोकसंख्या आणि पाण्याची गरज याचा अचूक अंदाज व्यक्त केला होता. त्यांच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याचा निर्धार पालिका आयुक्तांनी व्यक्त केला. मुंबई मराठी पत्रकार संघाने पत्रकार भवनाच्या आवारात बां
Categories: Mumbai
डोंबिवलीत धडाडणार राज ठाकरेंचा तोफखाना
डोंबिवलीnbsp - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा बुधवारी (ता.3) डोंबिवलीतील डीएनसी मैदानावर होणार आहे. या सभेत अनेक कार्यकर्ते मनसेत प्रवेश करणार असून त्यात काही बड्या असामींचाही समावेश आहे. या वेळी ठाकरे कोणावर तोफ डागणार, हे ऐकण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांसह अनेकांची एकच गर्दी डीएनसी मैदानावर उसळणार आहे. कल्याण रेल्वे स्थानकात परप्रांतीयांच्या विरोधात आंदोलनानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना मिळालेली लाखो मते पाहता कल्याण लोकसभा मतद
Categories: Mumbai
माझा पाठलाग सुरू होता...
मुंबई -nbsp एक गाडी माझ्या कारचा पाठलाग करीत होती. या गाडीपासून स्वतःची सुटका करण्याच्या नादात मी कारचा वेग वाढविला. त्यामुळे माझे कारवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला, अशी कबुली एका पोलिस उपनिरीक्षकासह दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या नुरीया हवेलीवाला या मद्यपी वाहनचालक तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात दिली आहे. दक्षिण प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. दरम्यान, पोलिसांनी आज त्या रात्री घडलेला घटनाक्रम तपासण्यासाठी आज नुरीयाला ति
Categories: Mumbai
'गेटवे ऑफ इंडिया'वर कॅमेऱ्यांची करडी नजर
मुंबई -nbsp भारताचे प्रवेशद्वार असलेल्या गेटवे ऑफ इंडियाची सुरक्षा लवकरच अत्यंत कडक होणार असून येथील हालचालींवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून करडी नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच येथे जाण्यासाठी कडक सुरक्षाव्यवस्था पार करावी लागणार आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज ही माहिती मंत्रालयात दिली. गेटवेजवळ पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. देश-विदेशांतील पर्यटक येथे येतात. त्यामुळे पुढील काळात गेटवेच्या सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. गेटवे ऑफ इंडिया आणि राजीव गांधी सागरी सेतूच
Categories: Mumbai
इन कॅमेरा सुनावणीसाठी नुरियाचा अर्ज
मुंबईnbsp - दारू पिऊन बेदरकारपणे गाडी चालविणाऱ्या नुरिया हवेलीवालाने न्यायालयीन सुनावणी "इन कॅमेरा' करण्याची मागणी महानगर दंडाधिकारी न्यायालयामध्ये केली आहे. मात्र प्रसिद्धिमाध्यमांनी ही सुनावणी "इन कॅमेरा' न घेण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. शनिवारी दंडाधिकारी न्यायालयात नुरियाला पोलिसांनी हजर केल्यावर तिने हा अर्ज केला. प्रसिद्धिमाध्यमांमध्ये येणाऱ्या वृत्तांमुळे जनतेचे तिच्याबद्दल मत पूर्वग्रहदूषित मत होऊ शकते, असा दावा अर्जामध्ये केला आहे. मात्र माध्यमांच्या प्रतिनिधींनीही या अर्
Categories: Mumbai
मराठी शाळा टिकविण्यासाठी नियमाची कडक अंमलबजावणी - महापौर
मुंबईnbsp - मराठी शाळांमधील बंद होणाऱ्या तुकड्या टिकविण्यासाठी विद्यार्थी पटसंख्या किमान 25 असावी, या राज्य सरकारच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करणार असल्याची सुस्पष्ट ग्वाही महापौर श्रद्धा जाधव यांनी आज दिली. खासगी अनुदानित व विनाअनुदानित मराठी शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत महापौर श्रद्धा जाधव यांच्या दालनात शिक्षकांची बैठक घेण्यात आली. शिवसेना नेते आमदार दिवाकर रावते, उपमहापौर शैलजा गिरकर, शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. राम बारोट, सभागृहनेते सुनील प्रभू, अतिरिक्त आयुक्त आशीषकुमार
Categories: Mumbai
राहुल गांधी ५ फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर
मुंबई -nbsp अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस व युवा नेते खासदार राहुल गांधी येत्या शुक्रवारी (ता. 5) मुंबईच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत. मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी ही माहिती आज पत्रकारांना दिली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी यांनी मुंबईबाहेर प्रचारसभा घेतल्या. मुंबईत ते अनेकदा खासगी कामासाठी आले होते परंतु शुक्रवारी त्यांचा मुंबईत पहिलाच राजकीय दौरा आयोजित करण्यात आला आहे. मुंबईत त्यांचे चार कार्यक्रम होणार आहेत. आझाद मैदान येथील मुंबई कॉंग्रेस
Categories: Mumbai
सारेगमपची महानायिका होण्यात शंभर टक्के यश "ऊर्मिलाचेच'
बदलापूर -nbsp सारेगमपमधील संपूर्ण 100 टक्के यश हे ऊर्मिलाचेच आहे. जिद्द, चिकाटी व प्रामाणिकपणा हे ऊर्मिलाचे गुण वाखाणण्यासारखेच असल्याचे तिचे गुरू पंडित अच्युतराव जोशी यांनी सांगितले. बदलापूरमध्ये 39 वर्षे "संगीत विद्यालय'द्वारे संगीताची कला जोपासणारे पंडित जोशी आज आनंदी, उत्साही आणि समाधानाने बोलत होते. रात्री उशिरा येऊनही त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा थकवा जणवत नव्हता. अनघा ढोमसेनंतर ऊर्मिला धनगर हिने प्रचंड यश संपादन केले. हे 100 टक्के तिचेच स्वतःचे यश असल्याचे जोशी यांनी सांगितले
Categories: Mumbai
कल्याण आरटीओने केली दहा रिक्षांवर कारवाई
कल्याण - जुन्या रिक्षाचे परमिट रजिस्ट्रेशन रद्द करून नव्या रिक्षाला लागू करण्यात आल्यानंतर जुनी रिक्षा तशीच विनापरवाना फिरविण्याचा उद्योग काही रिक्षाचालकांकडून सुरू आहे. त्याला आळा घालण्यासाठी जुनी रिक्षा आरटीओ कार्यालयात आणून ती भंगारात (स्क्रॅप) मोडीत काढण्याची कारवाई कल्याण आरटीओ कार्यालयाने सुरू केली आहे. आत्तापर्यंत 10 रिक्षा भंगारात मोडीत काढल्या आहेत, अशी माहिती आरटीओ अधिकारी संजय डोळे यांनी दिली. 1997 सालापासून शासनाने रिक्षा परमिट गोठविले आहेत. नव्याने कोणालाही परमिट देण्यात येत नाही
Categories: Mumbai
कुष्ठरोगग्रस्तांच्या मागण्या तीन महिन्यांत पूर्ण होणार - सुरेश शेट्टी
मुंबईnbsp - महाराष्ट्रातील कुष्ठरोगग्रस्तांच्या मागण्या येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेला दिल्याने आपल्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात पुकारलेले धरणे आंदोलन कुष्ठपीडितांनी मागे घेतले आहे. कुष्ठरोगग्रस्तांना कोणी काम देत नसल्याने भीक मागूनच उपजीविका करावी लागते. सरकारतर्फे दर महिना मिळणारे अनुदानही तुटपुंजे असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहही होत नाही, अशी खंत कुष्ठरोगग्रस्तांनी मांडली. आंदोलनात अमरावती, नागप
Categories: Mumbai
उद्धव ठाकरे संघावर बरसले
मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी परप्रांतीयांना संरक्षण देण्याची भूमिका मांडल्याबद्दल शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज (ता. १) त्यांच्यावर जोरदार टिका केली. राम माधव यांनी नको त्या विषयात तोंड घातले आहे, संघाला जर उत्तर भारतीयांचा एवढाच पुळका आला असेल तर दक्षिण भारतात हिंदी भाषेचा प्रचार करा, महाराष्ट्राला एकात्मता शिकवू नका असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी मुंबईची उठाठेव राम माधव यांनी करू नये असा टोला लगावला. शिवसेनेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे उद्धव ठाकरे
Categories: Mumbai
शाहरूखविरुद्ध शिवसेनेचा 'हल्लाबोल'
मुंबई - शाहरूख खानने आपला पवित्रा बदलला नाही तर त्याचा कोणताही चित्रपट यापुढे प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे विभागप्रमुख ऍड. अनिल परब यांनी आज दिला. त्यामुळे शाहरूखच्या विरोधात शिवसेना अधिक आक्रमक झाल्याचे दिसले. अभिनेता शाहरूख खानने पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या बाजूने मत व्यक्त केल्यामुळे तो अडचणीत सापडला आहे. शिवसेनेने त्याच्याविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. ठाण्यामध्ये शिवसेनेने केलेल्या आंदोलनानंतर आज त्याच्या "मन्नत' या बंगल्याबाहेर काही शिवसैनिकांनी आंदोलन केले. त्य
Categories: Mumbai
अभिनेत्रीच्या घरातून सात लाख रूपये लंपास
मुंबई - अभिनेत्री राखी गुलजार यांच्या वांद्रे येथील घरातून अनोळखी चोरट्यांनी सोन्याचांदीच्या दागिन्यांसह सुमारे सात लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.या प्रकरणी वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे उपनगर येथील अलेमा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या राखी काल रात्री घरी परतल्यावर तिला घराचा दरवाजा फोडल्याचे लक्षात आले.घरातील 49 हजार रुपयांची रोख रक्कम आणि सहा लाख 51 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. राखी या 20 जानेवारीला पनवेल येथे आपल्या फार्म हाऊसवर गेल्या होत
Categories: Mumbai
स्थापनास्थळीच कॉंग्रेसला मिळेनात सदस्य
संजय मिस्कीन nbsp nbsp मुंबई - nbsp कॉंग्रेस पक्षाच्या स्थापनेला १२५ वर्षे पुर्ण होत असताना, ज्या मुंबईत कॉंग्रेसची स्थापना झाली तिथेच अपेक्षित सदस्य नोंदणी झाली नसल्याने पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया रखडली आहे. अल्प प्रमाणात झालेल्या सदस्य नोंदणीबाबत नाराजी व्यक्त करणारा खलिता मुंबई कॉंग्रेसचे निवडणूक प्रभारी गुलचेन सिंग चरक यांनी दिल्लीतील हायकमांडकडे धाडून दिला आहे. मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्याबद्दलच्या नाराजीतूनच सदस्य नोंदणीचे गाडे ओढण्यास कार्यकर्ते नाखुश असल्या
Categories: Mumbai

