प्रहार - पहिले पान

Syndicate content Prahaar.in -Marathi Online News Mumbai|Marathi News|Online Marathi News
Prahaar.in -Marathi Online News Mumbai|Marathi News|Online Marathi News
Updated: 2 hours 26 min ago

सानिया मिर्झाचे लग्न मो़डले

Thu, 01/28/2010 - 00:35
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने तिचा बालपणीचा मित्र मोहम्मद सोहराब याच्याशी ठरलेले लग्न मोडल्याचे सांगितले आहे.
Categories: Main news

बांगलादेश संस्थापकांच्या हत्येचा कट रचलेल्यांना फाशी

Thu, 01/28/2010 - 00:00
बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबर रेहमान आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हत्येला जबाबदार असलेल्या पाच माजी लष्करी अधिका-यांना फाशी देण्यात आली आहे.
Categories: Main news

भारतीय संघ

Wed, 01/27/2010 - 23:10
बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर विजयी ट्रॉफीसह भारतीय संघ...
Categories: Main news

‘स्वाभिमान’कडून कोका-कोलाला ताकीद

Wed, 01/27/2010 - 22:15
मुंबईकरांवर भीषण पाणीटंचाईचे संकट घोंघावत असतानाच वाडा येथील वैतरणा प्रकल्प तलावाला थेट जलवाहिन्या जोडून पाणी मिळवणा-या ‘कोका-कोला’ या शीतपेय उत्पादक कंपनीला ‘स्वाभिमान’ संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी ताकीद देणारे पत्र लिहून या पाण्याचा वापर करणे बंद करा, असा इशारा दिला आहे.
Categories: Main news

गाजावाजाशिवाय सुलोचनादीदींना महाराष्ट्रभूषण

Wed, 01/27/2010 - 22:10
ढोल ताशा, मिरवणुका, भव्य- दिव्य सोहळे हे महाराष्ट्र राज्याचे एक वैशिष्टय़ असताना सरकारने मंगळवारी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांना कोणताही गाजावाजा न करता आणि प्रसिद्धी माध्यमांना कानोकान खबर लागू न देता राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार प्रदान सोहळा उरकला.
Categories: Main news

खारफुटीच्या जमिनीवर ‘नॉन-फॉरेस्ट’ कारवायांना बंदी

Wed, 01/27/2010 - 22:05
खारफुटीची जमीन जंगलाशिवाय इतर कोणत्याही कारणासाठी वापरली जाऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिले.
Categories: Main news

मिठी नदीसाठी सोनियांना साकडे

Wed, 01/27/2010 - 22:00
मिठी नदीच्या रुंदीकरणाबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप काँग्रेस नेते कन्हैयालाल गिडवाणी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र पाठवून केला आहे.
Categories: Main news

उल्हासनगरवासीयांसाठी नवी बससेवा

Wed, 01/27/2010 - 22:00
वाढते शहरीकरण आणि दळवळणाची गरज लक्षात घेऊन बुधवारी उल्हासनगर महापालिकेच्या परिवहन सेवा समितीमार्फत उल्हासनगरवासीयांसाठी बीओटी तत्त्वावर दोन नव्या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.
Categories: Main news

पुरावे संपले आता युक्तिवाद

Wed, 01/27/2010 - 21:45
पाकिस्तानी दहशतवादी अजमल आमिर कसाब तसेच भारतीय संशयित फहीम अन्सारी व सबाउद्दीन शेख यांच्याविरोधात आर्थर रोड तुरुंगातील विशेष न्यायालयात सुरू असलेल्या ‘२६/११’ खटल्यात बुधवारी सुनावणीच्या १७२व्या दिवशी साक्षीपुराव्यांचे काम संपले
Categories: Main news

लोकशाहीचा आधार

Wed, 01/27/2010 - 18:00
मतदानासाठी दिली जाणारी सुटी आणि त्या सुटीचा वापर मतदानासाठी न करता मौजमजेसाठी करण्याची प्रवृत्ती वाढते आहे. या पांढरपेशा वर्गाला सुटीऐवजी दोन तासांची सवलत देऊन मतदानाची सक्ती करणे अधिक योग्य ठरेल.
Categories: Main news

पद्म पुरस्कारांची खिरापत

Wed, 01/27/2010 - 18:00
पद्म पुरस्कारांच्या यादीवर वाढत जाणारे सेलिब्रिटींचे वर्चस्व अस्वस्थ करणारे आहे. देशाचे एवढे महत्त्वाचे पुरस्कार दिले जाताना त्यात कोणतेही सूत्र दिसत नाही.
Categories: Main news

‘युनियन जॅक’ ऑस्ट्रेलियातून उतरणार?

Wed, 01/27/2010 - 18:00
एकेकाळची ब्रिटनची वसाहत असलेला ऑस्ट्रेलिया हा आता सार्वभौम देश असला, तरी त्याच्या राष्ट्रीय ध्वजावर ब्रिटनच्या ‘युनियन जॅक’ची प्रतिमा आजही फडकते आहे.
Categories: Main news

विद्यार्थ्यांना रक्तदानाचे जादा गुण द्यावेत

Wed, 01/27/2010 - 18:00
गेल्या २२ वर्षात ८२ वेळा रक्तदान करणारे शैलेश बागवे यांच्याशी रक्तदानाच्या चळवळीसंदर्भात केलेली बातचीत.
Categories: Main news

वेंगुर्ल्यात उतरले परदेशी पाहुणे

Wed, 01/27/2010 - 17:00
गेल्या काही दिवसांपासून वेंगुर्ले-परबवाडा येथील पाणवठय़ाच्या ठिकाणी दुर्मीळ समजले जाणारे ‘सायबेरीयन क्रेन’ हे पक्षी मुक्कामासाठी आले आहेत.
Categories: Main news

ह्यूस्टनमध्ये साजरी झाली मराठमोळी संक्रांत

Wed, 01/27/2010 - 15:00
मराठी माणसं जगात कुठेही गेली तरी आपली संस्कृती विसरत नाहीत. अमेरिकेतील ‘ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळा’ने मकरसंक्रातीनिमित्त अलीकडेच शुगरलँड कम्युनिटी सेंटर येथे आयोजित केलेल्या ‘मकरसंक्राती फन अँड फुड फेस्ट’ या मराठमोळ्या कार्यक्रमातही याचाच प्रत्यय आला.
Categories: Main news

विद्यार्थ्याला मारणा-या शिक्षकाला चोप

Wed, 01/27/2010 - 14:00
बेळगाव तालुक्यातील हलगा येथील जे. आर. दोद्दन्ना या शाळेतील विद्यार्थ्यांला कन्नडधार्जिण्या शिक्षकाने मारहाण केल्याची घटना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी घडली. या घटनेनंतर शाळेत जाब विचारायला गेलेल्या ग्रामस्थांना टोलवाटोलवीची उत्तरे मिळाल्याने त्यांनी शिक्षकाला बेदम चोप दिला.
Categories: Main news

स्वायत्त शिक्षणसंस्थांचा दर्जा धोक्यात

Wed, 01/27/2010 - 12:45
देशातील अभिमत विद्यापीठे वादाच्या भोव-यात सापडली असतानाच राज्यातल्या स्वायत्त संस्थांचा दर्जाही धोक्यात येण्याची चिन्हे आहेत
Categories: Main news

सामान्यांच्या प्रश्नांना ‘प्रहार’ने वाचा फोडावी

Wed, 01/27/2010 - 10:55
वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या वर्षभरात गौरवास्पद नावलौकिक मिळवणा-या ‘प्रहार’ने सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री आणि ‘प्रहार’चे संपादकीय सल्लागार नारायण राणे यांनी ‘प्रहार’च्या सावंतवाडी कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
Categories: Main news

नांदेड, लातूर, सोलापूर विमानतळांवरील उड्डाणांत वाढ?

Wed, 01/27/2010 - 10:50
नांदेड, लातूर आणि सोलापूर विमानतळांचा वापर करून आणखी काही मार्गांवर उड्डाणे सुरू करण्याचा प्रस्ताव गो एअर या खासगी विमान कंपनीने राज्य सरकारला दिला आहे.
Categories: Main news

आर्थिक सुधारणांना सर्वोच्च प्राधान्य

Wed, 01/27/2010 - 10:05
आर्थिक सुधारणांना प्रत्येक देशाकडून सर्वोच्च प्राधान्य दिले जावे, या आग्रहासाठी जगातील आघाडीचे 2,500 उद्योजक एकत्र आले आहेत.
Categories: Main news