प्रहार - अर्थजगत
2009-10 मध्ये विकासदर 7.2 टक्के?
2009-10 या आर्थिक वर्षात विकासदर 7.2 टक्के राहील, असे अनुमान केंद्र सरकारच्या मध्यवर्ती सांख्यिकी संस्थेने वर्तवले आहे.
Categories: Economy
महागाई लवकर आटोक्यात येणे कठीणच!
अन्नधान्य महागाई दर चार ते पाच टक्क्यांवर आणण्याची आवश्यकता असून हे भारतापुढील मोठे आव्हान आहे, असे भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर के सी चक्रवर्ती यांनी सांगितले.
Categories: Economy
व्यावसायिक करात सध्या कपात नाही?
व्यावसायिक करात कपात करण्याची उद्योग जगताची मागणी येत्या अर्थसंकल्पात पूर्ण होण्याची शक्यता नाही, अशी माहिती अर्थ खात्यातील एका वरिष्ठ अधिका-याने दिली आहे.
Categories: Economy
महागाई नियंत्रणासाठी समितीची स्थापना
महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्र्याचा समावेश असलेली समिती स्थापन केली आहे.
Categories: Economy
मोबाइल फोन म्युझिकवर लवकरच कर?
मोबाइल फोन म्युझिकवर करमणूक कर लावण्याची शिफारस महसूल खात्याने राज्य सरकारकडे केल्याने कॉलर ट्युन्स किंवा गाणी डाउनलोड करण्यावर लवकरच कर बसण्याची शक्यता आहे.
Categories: Economy
सेन्सेक्सचा तीन महिन्यांतील नीचांक
गुंतवणुकदारांनी खरेदीचा प्रचंड सपाटा लावल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक शुक्रवारी तब्बल 430 अंकांनी कोसळला.
Categories: Economy
सेन्सेक्समध्ये 271 अंकांची घसरण
मुंबई शेअर बाजाराचा बुधवारच्या दिवसभरात उसळलेला निर्देशांक गुरुवारी पुन्हा घसरला.
Categories: Economy
अन्नधान्य महागाई दर 17.56 टक्के
डाळी आणि बटाटे यांच्या सततच्या वाढत्या दरामुळे अन्नधान्य महागाई दरातही वाढ झाली आहे.
Categories: Economy
केरोसिन, एलपीजी दरवाढीची शिफारस
पेट्रोल-डिझेलच्या दरांवरील सरकारी नियंत्रण हटवण्याची शिफारस पंतप्रधानांनी यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या कीर्ती पारीख समितीने केली आहे.
Categories: Economy
सेन्सेक्सची तब्बल 333 अंकांची उसळी
आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा परिणाम मुंबई शेअर बाजारावरही झाला असून बुधवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकात तब्बल 333 अंकांनी वाढ झाली.
Categories: Economy
‘एमएसएमई’च्या विकासासाठी निधीची मागणी
जागतिक मंदीमध्ये होरपळलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना पुन्हा उभारी देण्यासाठी 5,500 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे या खात्याने सांगितले आहे.
Categories: Economy
मुदतपूर्व परतफेडीसाठी दंड आकारणे रास्तच
मुदतीच्या आधी कर्जाची परतफेड केल्यास बँकांकडून आकारला जाणारा दंड हा स्पर्धा आयोगाच्या कायद्यांचे उल्लंघन करणारा नसल्याचा दावा बँकांनी केला आहे.
Categories: Economy
इंधन दरवाढ अटळ?
इंधनाच्या दरांमध्ये वाढ होऊ नये यासाठी प्रयत्न चालू असले तरी इंधनविक्रीतून येणारी तूट सहन करण्यासाठी निधी तोकडा पडत असल्याने दरवाढ अपरिहार्य ठरेल, असे पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी स्पष्ट केले.
Categories: Economy
निर्यातीमध्ये 9.3 टक्क्यांनी वाढ
जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर सातत्याने घटणा-या निर्यातीमध्ये गेले दोन महिने वाढ नोंदवली गेली आहे.
Categories: Economy
सेवा कर पुन्हा 12 टक्के होणार?
आर्थिक तुटीला आळा घालण्याच्या दृष्टीने एक पाऊल म्हणून येत्या अर्थसंकल्पात सेवा कर पुन्हा 12 टक्के केला जाण्याची शक्यता आहे.
Categories: Economy
रिझव्र्ह बँकेचे ‘वेट अॅँड वॉच’
आरबीआयच्या ‘सीआरआर’चा सामान्य माणसाशी थेट संबंध असतो का प्रश्न विचारला जातो. ‘सीआरआर’ वाढवल्याने त्याचा परिणाम हा खाजगी गुंतवणुकीवर आणि सामान्य माणसाच्या खर्च करण्याच्या शक्तीवर होतो. शिखर बॅँक सध्या ‘वेट अँड वॉच, अशा पवित्र्यात आहे. केंद्राचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर त्याला अनुसरून नवे पतधोरण आरबीआय मांडेल.
Categories: Economy
विशेष आर्थिक मदत मागे घ्या- आरबीआय
केंद्रीय अर्थसंकल्पाची तयारी सध्या जोरात सुरू असल्याने विशेष आर्थिक मदत मागे घेण्यासाठी अंशत: सुरुवात करण्यात यावी असा सल्ला रिझव्र्ह बॅँकेने अर्थ खात्याला दिला आहे.
Categories: Economy
सीआरआरमध्ये पाऊण टक्क्याने वाढ
रिझर्व्ह बँकेचे तिमाही पतधोरण जाहीर झाले असून बाजारातील रोखता कमी करण्याच्या उद्देशाने सीआरआरमध्ये पाऊण टक्के वाढ करण्यात आली आहे.
Categories: Economy
आरबीआय भांडवल पुरवठा कमी करणार?
वाढत्या महागाईला आळा घालण्याच्या दृष्टीने एक पाऊल म्हणून भांडवल पुरवठा आखडता घेणार असल्याचे संकेत भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.
Categories: Economy
अन्नधान्य महागाई दर 17.40 टक्के
बटाटे आणि डाळी यांच्या वाढत्या किमतीमुळे अन्नधान्य महागाई दरात वाढ झाली असून 16 जानेवारीला संपलेल्या आठवड्यात महागाई दर 17.40 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.
Categories: Economy

