ऑलिव्हर स्टोन, मनोजकुमार यांना जीवनगौरव

तीन वेळा अत्यंत प्रतिष्ठेचा ऑस्कर पुरस्कार मिळवणारे जागतिक ख्यातीचे दिग्दर्शक ऑलिव्हर स्टोन यांचा जीवनगौरव पुरस्काराने करण्यात येणारा गौरव हे यंदाच्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (मामि) खास वैशिष्ट्य असून यंदा प्रथमच महोत्सवात काही परदेशी चित्रपटांचे जागतिक प्रिमियरही होणार आहेत.