कॉर्पोरेट कार्यकर्ती

खाजगी कंपन्यांचं सामाजिक उत्तरदायित्व हा विषय खरं तर तसा नवा नव्हे. पण जरा त्याच्यापलीकडचा आशय घेऊन ही संकल्पना पुढे आली आहे. या विषयात गंभीरपणे आणि तळमळीने काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये यशश्री गुर्जरांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल.