३० वर्षांनंतर मूकपट; मराठी माणसाचं धाडस

Primary tabs

कमल हसनच्या कसदार अभिनयामुळं गाजलेल्या 'पुष्पक' चित्रपटाच्या धर्तीवर बॉलिवूडमध्ये तब्बल ३० वर्षांनंतर मूकपटाची निर्मिती होत आहे. मऱ्हाटमोळा चित्रपट निर्माता किशोर बेलेकर यानं हे शिवधनुष्य उचललं आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करतानाच बेलेकर यांनी हे वेगळं आणि धाडसी पाऊल उचलल्यानं या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे.