मुंबईत धावत्या लोकलवर दगड भिरकावला

Primary tabs

रेल्वे प्रवास सुरक्षित आणि सुखकर करण्याचे दावे होत असले तरी सर्वसामान्य प्रवाशांचा, विशेषत: मुंबईकरांचा प्रवास अद्याप असुरक्षितच असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. मुंबईत धावत्या लोकलवर दगड मारण्याचा प्रकार पुन्हा घडला असून काल रात्री एलफिन्स्टन स्थानकाच्या दिशेनं भिरकावलेला दगड लागून एक महिला जखमी झाली आहे.