जेवण देण्यास नकार दिल्याने हॉटेल चालकाला मारहाण

Primary tabs

पुणे : रात्री उशीर झाल्याने जेवण बनविण्यास नकार दिल्याच्या कारणावरून दोघांनी तवा व कोयत्याने वार करून हॉटेल चालकास गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (ता. 9) रात्री पावणेबाराच्या सुमारास बालेवाडी येथे घडली. 
याप्रकरणी तानाजी इंगोले (वय 24, रा. बालेवाडी) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंगोले यांचे बालेवाडी येथील मोझे कॉलेजसमोर हॉटेल आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास ते हॉटेलची साफसफाई करत होते. त्या वेळी दुचाकीवरून दोन तरुण आले. त्यांनी जेवण देण्यास सांगितले.
त्यावर हॉटेल बंद झाल्याने जेवण उपलब्ध नाही आणि बनवून देता येणार नाही, असे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या दोघांनी त्यांच्याकडील कोयता व तव्याने इंगोले यांना मारहाण करून पळ काढला. 
News Item ID: 51-news_story-1547222384Mobile Device Headline: जेवण देण्यास नकार दिल्याने हॉटेल चालकाला मारहाणAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Pune
Mobile Body: पुणे : रात्री उशीर झाल्याने जेवण बनविण्यास नकार दिल्याच्या कारणावरून दोघांनी तवा व कोयत्याने वार करून हॉटेल चालकास गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (ता. 9) रात्री पावणेबाराच्या सुमारास बालेवाडी येथे घडली. 
याप्रकरणी तानाजी इंगोले (वय 24, रा. बालेवाडी) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंगोले यांचे बालेवाडी येथील मोझे कॉलेजसमोर हॉटेल आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास ते हॉटेलची साफसफाई करत होते. त्या वेळी दुचाकीवरून दोन तरुण आले. त्यांनी जेवण देण्यास सांगितले.
त्यावर हॉटेल बंद झाल्याने जेवण उपलब्ध नाही आणि बनवून देता येणार नाही, असे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या दोघांनी त्यांच्याकडील कोयता व तव्याने इंगोले यांना मारहाण करून पळ काढला. 
Vertical Image: English Headline: The hotel Owner beaten after refusing to give mealसकाळ वृत्तसेवाAuthor Type: AgencyहॉटेलपोलिसSearch Functional Tags: हॉटेल, पोलिसTwitter Publish: