काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात पुण्याचे मेजर शहीद

Primary tabs

नियंत्रण रेषा (एलओसी) जवळील राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये शुक्रवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यात एका मेजरसह दोन जवान शहीद झाले आहेत. शहीद झालेले मेजर हे महाराष्ट्राचे सुपुत्र असून शशीधरन नायर असे त्यांचे नाव आहे. नायर हे पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.