देसी क्वीन सपना चौधरी झाली मॉडर्न, ग्लॅमरस लुकमध्ये फोटोशुट व्हायरल

Primary tabs

प्रहार वेब टीम
मुंबई : बिग बॉस फेम सपना चौधरीचा बदललेला लुक चाहत्यांना चांगलाच घायाळ करणार आहे. हरियाणाची प्रसिध्द डान्सर सपना चौधरीने आपले वजन कमी केले आहे. देसी क्वीन सपना आता मॉडर्न झाली आहे. इंन्स्टाग्रामवर नुकतेच काही फोटो तीने शेअर केले आहेत. त्यामध्ये ती फारच ग्लॅमरस दिसत आहे.

सपनाने इंन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती युनिक लुकमध्ये दिसत आहे. तीने आपला चेहरा दागिन्याने मढवला आहे.

पांढ-या शुभ्र ड्रेसमध्ये ती एखाद्या मॉडेल पेक्षा तसुभरही कमी दिसत नाही. ती आता पहिल्यापेक्षा स्लीम दिसत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर कोणीही असा अंदाज लाऊ शकणार नाही की, ही तीच देसी सपना चौधरी आहे.

बिग बॉसमध्ये सपनाच्या प्रसिध्दीची चांगलीच प्रचिती आली होती. गुगल २०१८ च्या सर्च इंजिनमध्ये सर्वात जास्त सर्च सेलेब्रिटी लिस्टमध्ये सपनाचा तिसरा क्रमांक लागतो. ती काही कार्यक्रमात डान्स करताना दिसून येते.

युपी-बिहार-हरियाणा मध्ये सपनाचा मोठा चाहता वर्ग आहे. सपनाची डान्स स्टाईल चाहत्यांमध्ये चांगलीच प्रसिध्द आहे. मात्र तीच्या करियरला बिग बॉसनंतरच चांगले यश मिळाले.

पंजाबी ड्रेसमध्ये दिसणारी सपना आता पुर्णपणे बदली आहे. तीच्या या नव्या लुकने चाहत्यांना चांगलेच इंप्रेस केले आहे. सपनाला चित्रपटात काम करण्याचीही संधी मिळाली आहे. तिने भोजपूरी आणि बॉलिवूडमध्ये अॅटम सॉग केली आहेत.
फोटो- इंस्टाग्राम