#10yearchallenge डेटा कलेक्शनबद्दल फेसबुकने दिले ‘हे’ उत्तर!

Primary tabs

नागोराव कराड : प्रहार वेब टीम
मुंबई : सोशल मीडियावर सध्या #10yearchallenge हा ट्रेंड व्हायरल होत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम अशा प्रत्येक ठिकाणी सामन्य व्यक्तीपासून सेलिब्रेटी पर्यंत प्रत्येकजण आपला १० वर्ष जुना आणि आताचा फोटो सोशल मिडीयावर अपलोड करीत आहेत. हा ट्रेंड सध्या सोशल मिडियावर जोरदार धुमाकुळ घालत आहे.
हा ट्रेंड नक्की कोणी सुरु केला, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. हा ट्रेंड फेसबूककडून चालवला जात असल्याचे काहीजणांचे म्हणणे आहे. फेसबूक आपल्या मशीन लर्निग सिस्टीमसाठी वयाच्या संबधित डेटा एकत्र करत आहे. त्यामुळे हा ट्रेंड सुरु करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र आता या ट्रेंडवर फेसबुककडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. फेसबूकने एक टविट करत म्हटले आहे की, ‘लोकांना यात आनंद मिळत आहे म्हणूनच हा ‘ट्रेंड यामुळे व्हायरल होत आहे. 10Yearchallenge हा ट्रेंड युजरने विकसित केलेले मीम आहे. यावरुन हे सिध्द होत आहे की, लोकांना फेसबूकवर आनंद मिळत आहे. अजून काही नाही’

टेक कंपन्याकडून युजरने अपलोड केलेल्या फोटोचा वापर फेशियल रिकग्निशन अल्गोरिदमला ट्रेनिंग देण्यासाठी केला जातो. त्यामुळे फेसबूककडून कोणत्याही युजरने फोटो अपलोड केल्यानंतर चेहरा ओळखल्यानंतर फोटोतील मित्र किंवा संबधित व्यक्तींना टॅंग करण्यास सांगितले जात आहे. अशा अनेक वादानंतर फेसबूकवरच्या विश्वासार्हेतेवर लोक आता प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. यामुळेच आजही लोक सोशल मिडीया वेबसाइट्सवर काही बद्दल झाला की लोक चिंता व्यक्त करतात. त्यामुळेच 10YearChallenge च्या ट्रेंड बद्दल लोक संभ्रमात आहेत.
10YearChallenge हा ट्रेंड काही दिवसांपुर्वीच सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. लोकांनी मोठ्या प्रमाणात आपले फोटो पोस्ट केले आहेत. फेसबूकसोबतच इन्स्टाग्रामवरही या ट्रेंडची क्रेझ आहे. आणि इन्स्टाग्राम हे फेसबुकच्या मालकीचे आहे.