ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पेट्रा क्विटोवा उपांत्य फेरीत

Primary tabs

उपांत्य फेरीचा सामना अमेरिकेच्या डॅनियल कोलीनसोबत
मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत महिला एकेरीत झेक प्रजासत्ताकच्या ८ व्या मानांकित पेट्रा क्विटोवाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पेट्राने ऑस्ट्रेलियाच्या १५व्या मानांकित अ‍ॅग बार्टीचा ६-१, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
क्विटोवाने बार्टीला संपूर्ण सामन्यात पुनरागमनाची संधीच दिली नाही. पेट्राचा उपांत्य फेरीचा सामना ३५व्या मानांकित अमेरिकेच्या डॅनियल कोलीन हिच्यासोबत होणार आहे.
दुस-या गटातील उपांत्यपूर्व सामन्यात अमेरिकेचा सरेना विल्यम्सन आणि ७ व्या मानांकित झेक प्रजासत्ताकची कॅरोलिना प्लिस्कोवाशी होणार आहे. तर दुसरा सामना चौथी मानांकित जपानची नाओमी ओसाका आणि ६ व्या मानांकित युक्रेनची एलिना स्वेतोलिनाशी होणार आहे.