रत्नागिरीतील साईरत्न आयोजित क्रिकेट स्पर्धेला निलेश राणे यांची भेट, स्पर्धेसाठी एक लाख रूपये जाहीर

Primary tabs

प्रहार वेब टीम
रत्नागिरी : शहरातील छत्रपती शिवाजी क्रिडांगणावर सुरु असलेल्या साईरत्न आयोजित नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला शनिवारी कोकणचे तरूण तडफदार, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांनी भेट दिली. यावेळी राजेश मयेकर व त्यांच्या सर्व क्रिकेटप्रेमी सहका-यांनी राणे यांचे जल्लोषात स्वागत केले.
राणे म्हणाले की, मी स्वत: क्रिकेट प्रेमी आहे. मला बोलण्यापेक्षा जास्त मैदानावर खेळायला आवडते. पण राजेश मयेकर व त्यांच्या सर्व सहका-यांनी एवढं मोठ दिमाखदार चित्र माझ्यासमोर उभे केले. मी कुठे सीसीआय वगैरे स्टेडीयममध्ये बसून क्रिकेट स्पर्धा बघतोय की काय असे मला वाटतं. म्हणून आपल्या सगळ्यांना या गोष्टींची जाणीव व्हावी की, हे सर्व चित्र उभ करायला फार मेहनत करावी लागते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
तुमच्या मनामध्ये प्रेम आणि जाणीव असेल तरच असे चित्र उभे राहते. हे नुसते पैसे कमवण्याचे साधन नाही. मुळात ही समाजसेवा आहे. मी क्रिकेटप्रेमी म्हणून या क्रिकेट स्पर्धेसाठी एक लाख रूपये जाहीर करतो. पुढच्या वर्षी या क्रिकेट स्पर्धेला सेलिब्रेटी आणण्याच काम निलेश राणे करेल. कारण मला क्रिकेटबद्दल खूप आवड आहे. मला स्वत:ला खेळाडू बनायचं होत. पण आमची बॅटींग वेगळीच सुरु आहे व ती चालूच राहील. यावेळी राजेश मयेकर व त्यांच्या सर्व क्रिकेटप्रेमी सहकाऱ्यांना माजी खासदार निलेश राणे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सुदेश मयेकर, अमित विलनकर, राजेश सावंत, नंदू केदारी, तसेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नित्यानंद दळवी, बाबू पाटील, योगेंद्र सावंत, संकेत चवंडे, मेहताब साखरकर, अविनाश पावसकर, शोएब खान, नंदू चव्हाण, अमित देसाई, शिवाजी कारेकर, अभिलाष कारेकर, सचिन वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.