अमेरिकेची एफबीआय अडचणीत, खब-यांना द्यायलाही पैसे नाहीत

Primary tabs

दैनंदिन कामे ठप्प, शटडाऊनचा फटका
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हट्टामुळे देशातील सर्वात मोठी तपास संस्था एफबीआय अपंग बनली आहे. शटडाऊनला एक महिना उवटला तरीही ट्रम्प आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. मेक्सिकोच्या सीमेवर साडे पाच अब्ज अमेरिकन डॉलरची भिंत उभारली जात नाही, तोपर्यंत शटडाऊन सुरूच राहील असे त्यांनी स्पष्ट केले. अशात शटडाऊनमुळे अमेरिकेतील ८ लाख केंद्रीय कर्मचारी (एफबीआयसह) बिनपगारी काम करत आहेत. त्यांना दैनंदिन कामे करणे आणि मोहिमांवर जाणे सुद्धा कठिण बनले आहे. देशात होणा-या दरोडा, अमली पदार्थाची तस्करी आणि गंभीर गुन्ह्यांची चौकशी करताना त्यांचे हात बांधले गेले आहेत.
एफबीआय एजंट्स असोसिएशनचे अध्यक्ष टॉम ओ’कॉनर यांनी सांगितल्याप्रमाणे, एफबीआय एजंट्स आपल्याला दरमहा मिळणा-या वेतन आणि भत्त्याच्या माध्यमातून तपास करत असतात. एजंट्सना एखाद्या प्रत्यक्षदर्शीची मुलाखत घेण्यासाठी दौरे करणे, भाषांतरकार सोबत घेणे, खब-यांकडून माहिती काढणे, टिप घेणे अशा विविध स्वरुपाची कामे करावी लागतात. एवढेच नव्हे, तर अनेक ठिकाणी प्रवेश मिळवण्यासाठी एफबीआय एजंट्सना स्पेशल पास आणि सिक्युरिटी क्लिअरन्स असतात. ते वेळोवेळी रिन्यू करावे लागतात. अनेकवेळा अमली पदार्थ तस्करांना पकडण्यासाठी व्यसनींच्या वेशात ड्रग्स खरेदी करावा लागतो.
या सर्व गोष्टींसाठी पैसे लागतात. गेल्या महिनाभरापूसन वेतन तर सोडा भत्ते देखील मिळतन नाहीत. अशात तपास कसे करावे असा प्रश्न अधिका-यांना पडला आहे. या संघटनेने व्हाइट आणि काँग्रेसला काही तोडगा काढून कुठल्याही परिस्थितीत शटडाऊन मागे घेण्याचे आवाहन केले आहे.