नागपूर मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयासाठी दोन कोटी : पालकमंत्र्यांची घोषणा

Primary tabs

महापालिकेच्या रुग्णालयांनी अनेक पिढ्यांना उपचार देत नवजीवन दिले आहे. एकेकाळी खासगी रुग्णालयांची एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्धता नसताना महापालिकेच्या रुग्णालयांनीच गरीब, मध्यमवर्गीय नागरिकांना संजीवनी देण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. अनेकांचे आयुष्य वाचविणाऱ्या महापालिकेच्या रुग्णालयांची अवस्था आता वाईट असून या रुग्णालयांचेच जीवन वाचविण्याची वेळ आली आहे. इंदिरा गांधी रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी नागपूर महापालिकेने पुढाकार घेतला असून या रुग्णालयात नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी अत्याधुनिक उपकरणे असणे आवश्यक आहे. या उपकरणासाठी राज्य सरकारकडून दोन कोटी रुपये देण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.