‘अमेरिकेसमोरील धोक्यात वाढ’

Primary tabs

वॉशिंग्टन : सातत्याने गुंतागुंतीच्या होणाऱ्या आणि अनिश्चित जग अमेरिकेसमोर आहे. त्यामुळेच, अमेरिकेसमोरील धोकाही तितकाच वैविध्य आणि परस्परांशी जोडणारा आहे, असा इशारा अमेरिकेच्या 'नॅशनल इंटेलिजन्स'चे संचालक डॅनियल कोट्स यांनी दिला आहे. या धोक्यांमध्ये महाविनाशकारी अस्त्रांच्या तस्करीपासून हिंसक मूलतत्त्ववाद, आंतरदेशीय संघर्ष आणि प्रादेशिक अस्थिरता यांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले. रशिया, चीन, उत्तर कोरिया, इराण यांसह अनेक वर्षांपासून शत्रू असणाऱ्या देशांबरोबरच दहशतवादी गट आणि अन्य 'नॉन स्टेट अॅक्टर'कडून धोका असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट