Virat Kohli: शेवटच्या दोन वनडेतून विराटला विश्रांती
Primary tabs
नवी दिल्ली :न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतील शेवटचे दोन सामने आणि त्यानंतर होणाऱ्या टी-२० मालिकेतून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. विराटच्या अनुपस्थितीत उपकर्णधार रोहित शर्माकडे टीम इंडियाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.बीसीसीआयने आज एक प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली. गेल्या काही महिन्यांतील व्यस्त वेळापत्रक ध्यानात घेऊन संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने कोहलीला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे, असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.कोहलीच्या जागी संघात अन्य खेळाडूचा समावेश केला जाणार नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या वनडेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करेल. त्यानंतर होणाऱ्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतही रोहितकडेच नेतृत्व राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान, न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने आज पहिल्या वनडेत यजमानांचा धुव्वा उडवत पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट