स्वामींच्या अंत्यसंस्काराला मोदी का अनुपस्थित?

Primary tabs

वृत्तसंस्था, बेंगळुरूसिद्धगंगा मठाचे मठाधीश श्री शिवकुमार स्वामी (वय १११) यांच्या अंत्यविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थित राहिल्याबद्दल कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पंतप्रधान सेलिब्रेटींच्या विवाहाला हजेरी लावतात, फिल्मस्टारना भेटतात; पण स्वामींसारख्या दैवत लाभलेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीला उपस्थित राहत नाहीत, असे बोलून त्यांनी खंत व्यक्त केली.गेली सात दशके मठाचे प्रमुखपद भूषविणाऱ्या स्वामीजींचे गेल्या सोमवारी निधन झाले. मंगळवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 'स्वामीजींनी आपल्या प्रत्येक भेटीमध्ये आपल्याला प्रेम आणि आशीर्वाद दिले', अशा भावना पंतप्रधान मोंदींनी व्यक्त केल्या होत्या. अंत्यविधीस केंद्रीय मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा आणि निर्मला सीतारामन उपस्थित राहिले होते.उपमुख्यमंत्री परमेश्वर यांच्या टीकेनंतर कर्नाटक भाजपने ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली. 'पंतप्रधान मोदींना भारतीय परंपरा माहित आहेत. ते तुमच्या संधिसाधू अध्यक्षासारखे (राहुल गांधी) नसून त्यांनी धार्मिक श्रद्धास्थानांना कायम महत्त्व दिले आहे,' असे ट्विट करण्यात आले आहे.पंतप्रधानांना अंत्यविधीसाठी येण्याची इच्छा असली, तरी दिल्लीवरून सुरक्षेविषयक परवानगी न मिळाल्यामुळे कदाचित ते आले नसावेत, असे भाजप अध्यक्ष बी. एस. येडीयुरप्पा यांनी म्हटले होते.दरम्यान, 'शिवकुमार स्वामी हे नोबेलपासून भारतरत्न किताब मिळवण्यास पात्र होते. त्यांना भारतरत्न मिळावे यासाठी कर्नाटक सरकार मागणी करणार आहे,'असे गृहमंत्री एम.बी. पाटील यांनी म्हटले आहे.महिला पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तनतुमकुर येथील सिद्धगंगा मठाचे प्रमुख महंत शिवकुमार स्वामीजी यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी कर्नाटकाचे पर्यटनमंत्री एस. आर. महेश आणि तुमकुरच्या पोलिस अधीक्षक दिव्या गोपीनाथ यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या वेळी महेश यांनी अपशब्द वापरल्याने दिव्या गोपीनाथ यांना अश्रू अनावर झाल्याचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. त्यामुळे महेश हे अडचणीत येण्याची शक्यता आहे.मंगळवारी शिवकुमार स्वामीजी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्याच वेळी मंत्री एस. आर. महेश यांचेही आगमन झाले. परंतु, मठामध्ये खूप गर्दी झाल्याने दिव्या गोपीनाथ यांनी त्यांना प्रवेशद्वारावर रोखले आणि आत न जाण्याची विनंती केली. मात्र, याचा राग आल्याने मंत्री महोदयांनी अपशब्द वापरले. यामुळे गोपीनाथ यांनी रडू कोसळले. या घटनेचा व्हिडिओ काही वृत्त वाहिन्यांच्या हाती लागला. त्यांनी त्याचे प्रक्षेपणदेखील केले.दरम्यान, महेश यांनी सर्व आरोप फेटाळले असून, आपण कोणतेही अपशब्द वापरले नाहीत, असे म्हटले आहे. 'सर्व खासदार आणि मंत्री आत असताना, मी बाहेर कसे थांबू, एवढेच मी म्हणत होतो,' असेही त्यांनी सांगितले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट