'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वादाची डरकाळी घुमली

Primary tabs

मुंबई:'ठाकरे' चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगच्यानिमित्ताने शिवसेना आणि मनसेमधील छुप्या वादाची अनुभूती पुन्हा एकदा उपस्थितांना आली. 'ठाकरे' चित्रपटाचे दिग्दर्शक आणि मनसे नेते अभिजित पानसे हे चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंग सुरू असताना तडकाफडकी उठून गेले. चित्रपटाच्या निर्मात्यांकडून मिळालेल्या वागणुकीने अपमानित झाल्यामुळे पानसे तेथून उठून गेल्याचे सांगण्यात येते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील वरळीमधील एट्रिया आयनॉक्स थिएटरमध्ये ठाकरे चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते. स्क्रीनिंगला पोहोचायला उशीर झाल्याने अभिजीत पानसे आणि संजय राऊत शाब्दिक चमकम झाल्याच्या चर्चांनादेखील उधाण आलंय. तर दुसरीकडे, पानसे कुटुंबीयांना थिएटरमध्ये बसायला नीट जागा देण्यात आली नसल्याची बोलले जात आहे. मान्यवरांसाठी असलेल्या राखीव जागांवर पानसे आणि कुटुंबीयांचा समावेश केला नसल्याने शिवाय निर्मात्यांनी दिलेल्या वागणुकीमुळे नाराज होऊन त्यांनी थिएटरमधून काढता पाय घेतल्याची चर्चा आहे. चित्रपटाच्या प्रमोशनमधून डावलल्याने पानसे यांनी हे पाऊल उचलल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. परंतु, अभिजीत पानसे नेमके कशामुळे संतापले हे समजू शकलेले नाही.दरम्यान, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर अभिजीत पानसे यांचे म्हणणे मांडले आहे. 'अभिजितशी फोन वर बोललो तो म्हणाला मी चित्रपट मा. बाळासाहेबांच्या प्रेमापोटी केला बाकी कोणी कस वागायचं हा ज्याच्या त्याच्या संस्काराचा प्रश्न' असं त्यांनी लिहिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट