छोट्या पडद्यावर 'दोघांत तिसरी'चा ट्रेंड

Primary tabs

चैताली जोशीशनाया, कियारा, मायरा, दीपिका, लक्ष्मी... ही सगळी नावं सध्या प्रेक्षकांच्या तोंडी आहेत. दोघांमध्ये आलेली ही ‘तिसरी’ टीव्हीवर सध्या चर्चेत आहे. तिच्या येण्यानं मालिका मसालेदार होत आहेत. प्रेमाचा त्रिकोण असलेल्या मालिकांमधलं हे चित्र प्रेक्षकांना परचित आहे. ‘दोघात तिसरा...’ या रुजलेल्या ट्रेंडमध्ये एक मुद्दा मात्र ठळकपणे दिसून येतोय; तो म्हणजे ही तिसरी व्यक्ती महिला व्यक्तिरेखा आहे. जुन्या सिनेमांमध्ये ‘एक फुल दो माली’ असं असायचं. छोटा पडदा मात्र ‘दो फुल एक माली’वर चालताना दिसतोय. शेजाऱ्याच्या घरात काय सुरू आहे याबाबतचं कुतूहल हे मानवी स्वभावातच आहे. त्यातच प्रेमाचा त्रिकोण दाखवला की आपसूकच प्रेक्षक मालिकेकडे वळणारच अशी खात्री चॅनेल्सना असते. त्याचाच आधार घेऊन या मालिका सुरू आहेत. सध्या सुरू असलेल्या अनेक मालिकांमध्ये प्रेमाचा त्रिकोण आहे. पण त्यात एक पुरुष आणि त्याच्या प्रेमात पडलेल्या दोघी असं चित्र दिसतंय. हे चित्र दिसण्यामागचं मानसशास्त्रीय कारण तज्ज्ञ स्पष्ट करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘आपल्या समाजात आजही पुरुषप्रधान संस्कृती आहे. तिथे पुरुषाचे विवाहबाह्य संबंध स्वीकारलं जातात. पण, तेच एका स्त्रीनं केलं तर अत्यंत चुकीचं मानलं जातं. अशी मालिका दाखवली तर समाजात काहीतरी चुकीचं दाखवलं जातंय असे आरोप होतात. वयस्कर पुरूष आणि तरूण स्त्री असलेली मालिका लोकप्रिय होते पण वयस्कर स्त्री आणि तरुण पुरूष असलेली मालिका स्वीकारली जात नाही. म्हणूनच चालत असलेला ट्रेंड पुरुषप्रधान संस्कृतीकडे झुकतो. त्यामुळे एक पुरूष आणि दोन स्त्रिया असं चित्र अनेक मालिकांमध्ये दिसतं.’नवरा-बायको आणि ‘ती’ हा नेहमीच कुतूहलाचा विषय असतो. मालिकांमध्ये ‘ती’ वेगवेगळ्या रुपात समोर येते. एका घरात दोन बायका आणि एक पुरुष ही संकल्पना पूर्वापार स्वीकारली गेली आहे. म्हणूनच ही संकल्पना असलेल्या मालिका बघितल्या जातात. एकदा हा फॉर्म्युला हिट ठरला, की इतर मालिकाही त्याच वळणावर जातात आणि या मालिकांचा प्रेक्षकवर्ग वाढत जातो. -राकेश सारंग, ज्येष्ठ निर्माता, दिग्दर्शकमालिकांचा प्रेक्षकवर्ग आजही प्रामुख्याने महिलाच आहे. त्यात ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश असतो. या दोन्ही वर्गाची त्या मालिका बघण्याची मानसिकता वेगळी असते. महिलावर्गाला मालिकेतलं महिला पात्र जवळचं वाटतं. विरुद्ध बाजूला असणाऱ्या स्त्रीचा पराजय कसा होतो ते बघण्यास महिलावर्ग इच्छुक असतो. नटणाऱ्या, नोकरी करणाऱ्या स्त्रिया नायक-नायिकांमधली ‘तिसरी’ व्यक्ती ठरतात. सोशीक, सहनशील स्त्रियांचाच विजय होतो अशी एक समजूत आहे आणि म्हणूनच हे सगळं प्रेक्षकांना बघावसं वाटतं. -डॉ. आशिष देशपांडे, मानसोपचारतज्ज्ञप्रेमाचा त्रिकोण असलेल्या मालिका माझ्या नवऱ्याची बायकोतुला पाहते रेघाडगे अँड सूनलक्ष्मी सदैव मंगलम्ती फुलराणीराधा प्रेम रंगी रंगलीमोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट