लाच प्रकरणात वकिलास जीवे मारण्याची धमकी

Primary tabs

पुणे  : जमिनीबाबतचा निकाल आपल्या बाजूने देण्यासाठी भूमी अभिलेख उपसंचालकाकडुन पावणे दोन कोटी रुपये लाच स्विकारण्याच्या प्रकरणात तक्रार देणाऱ्या वकीलास पिस्तुलाचा धाक दाखवुन जिवे मारण्याची धमकी दिल्याबाबतची तक्रार बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. 
अॅड. उमेश चंद्रकांत मोरे यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांच्यासाठी अॅड. रोहित शेंडे याने पावणे दोन कोटी रुपयांची लाच स्विकारली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेंडे यास अटक केल्यानंतर वानखेडे विरुद्ध ही गुन्हा दाखल केला होता. वानखेडे सध्या उपचार घेत असुन त्यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
दरम्यान, या प्रकरणामध्ये तक्रार देणाऱ्या मोरे यांना दोघानी पिस्तुलचा धाक दाखवुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
News Item ID: 51-news_story-1548312173Mobile Device Headline: लाच प्रकरणात वकिलास जीवे मारण्याची धमकी Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Pune
Mobile Body: पुणे  : जमिनीबाबतचा निकाल आपल्या बाजूने देण्यासाठी भूमी अभिलेख उपसंचालकाकडुन पावणे दोन कोटी रुपये लाच स्विकारण्याच्या प्रकरणात तक्रार देणाऱ्या वकीलास पिस्तुलाचा धाक दाखवुन जिवे मारण्याची धमकी दिल्याबाबतची तक्रार बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. 
अॅड. उमेश चंद्रकांत मोरे यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांच्यासाठी अॅड. रोहित शेंडे याने पावणे दोन कोटी रुपयांची लाच स्विकारली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेंडे यास अटक केल्यानंतर वानखेडे विरुद्ध ही गुन्हा दाखल केला होता. वानखेडे सध्या उपचार घेत असुन त्यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
दरम्यान, या प्रकरणामध्ये तक्रार देणाऱ्या मोरे यांना दोघानी पिस्तुलचा धाक दाखवुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
Vertical Image: English Headline: The threat of killing the lawyer in the bribe caseसकाळ वृत्तसेवाAuthor Type: Agencyपोलिसउच्च न्यायालयhigh courtSearch Functional Tags: पोलिस, उच्च न्यायालय, High CourtTwitter Publish: Meta Keyword: Threat, Killing, Lawyer, Bribe, Pune, Crime,Meta Description: The threat of killing the lawyer in the bribe case