रशियन दाम्पत्यास रेडी किनाऱ्यावर वाचविले

Primary tabs

वेंगुर्ले - सागर सुरक्षा कवच मोहीम एका रशियन दाम्पत्याला जीवदान देणारी ठरली. रेडी येथील समुद्रात बुडणाऱ्या या दाम्पत्याला सागरी सुरक्षारक्षकांनी वाचविले. हा प्रकार घडला.
सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या माध्यमातून ‘सागर सुरक्षा कवच’ हे अभियान मंगळवार (ता.२२) व आज राबविण्यात आले. आज दुपारी रेडी यशवंत गडाच्या समुद्र किनाऱ्यावर देशी व विदेशी पर्यटक हे समुद्रात पोहण्याचा आनंद घेण्याकरिता आले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एक रशियन दाम्पत्य पोहण्याचा आनंद घेत असताना समुद्राला भरती असल्याने ते वाहत बुडत असल्याचे निदर्शनास येताच रेडी गावच्या सागर रक्षक दल व जीवरक्षक यांनी तत्काळ समुद्रात जाऊन या पर्यटकांना वाचवले. त्यांच्या सतर्कतेमुळे विदेशी पर्यटकांचा आज जीव वाचला.
रेडी समुद्रात कोणतरी बुडत असल्याचे येथील नीलेश रेडकर यांनी पाहिले. त्यांनी ताबडतोब संभाजी येरागी यांना सांगून त्यांची खासगी पर्यटक बोट घेऊन आले. तेथे रेडी ग्रामपंचायतीचे जीवरक्षक संजय गोसावी व दिलीप रुद्रे हेदेखील होते. सर्वांनी  बोटीच्या साहाय्याने तत्काळ खोल समुद्रात जाऊन पाण्यात बुडत असलेल्या व मदतीची याचना करणाऱ्या पर्यटक दाम्पत्यास वाचविले आणि किनाऱ्यावर आणले. त्यावेळी समुद्रावर असणाऱ्या इतर देशी-विदेशी पर्यटकांनी त्या दाम्पत्याचा जीव वाचविल्याबद्दल नीलेश रेडकर, संभाजी येराजी, संजय गोसावी व दिलीप रुद्रे यांचे अभिनंदन करून कौतुक केले.
दरम्यान, नीलेश रेडकर हे २००६ पासून वेंगुर्ले पोलिस ठाणेअंतर्गत सागर रक्षक दलाच्या माध्यमातून आपले सामाजिक कर्तव्य म्हणून कार्य करीत आहेत. त्यांना या घटनेबद्दल अधिक विचारले असता ते म्हणाले, ‘‘सागरी किनाऱ्यालगतच्या  ग्रामपंचयात हद्दीतील जीव रक्षकांना गस्तीकरिता शासनाकडून अथवा संबंधित ग्रामपंचायतीकडून  एका बोटीची आवश्‍यकता आहे. जेणेकरून अशा गंभीर घटनांवर नियंत्रण ठेवता येईल. ही यंत्रणा नसल्याने शासनाने यात सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष घालून पूर्तता करावी.’’
चौघांच्या कामाची दखल घेणार
रेडी गावच्या या सागर रक्षक दल व जीवरक्षक या चारही जणांनी  कर्तव्य ‘सागर सुरक्षा कवच’ या अभियानाच्या दिवशी सतर्क राहून परदेशी पर्यटकांचे जीव वाचविल्याने जो अनर्थ टळला. यासाठी भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था, कोकण विभागातर्फे या चारही जणांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे कोकण विभागाचे सीइओ राजन रेडकर यांनी या चारही जणांची शासनस्तरावर या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांचा योग्य सन्मान करण्यात यावा, यासाठी पोलिस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांना पत्राद्वारे कळविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
News Item ID: 51-news_story-1548305245Mobile Device Headline: रशियन दाम्पत्यास रेडी किनाऱ्यावर वाचविलेAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Kokan
Mobile Body: वेंगुर्ले - सागर सुरक्षा कवच मोहीम एका रशियन दाम्पत्याला जीवदान देणारी ठरली. रेडी येथील समुद्रात बुडणाऱ्या या दाम्पत्याला सागरी सुरक्षारक्षकांनी वाचविले. हा प्रकार घडला.
सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या माध्यमातून ‘सागर सुरक्षा कवच’ हे अभियान मंगळवार (ता.२२) व आज राबविण्यात आले. आज दुपारी रेडी यशवंत गडाच्या समुद्र किनाऱ्यावर देशी व विदेशी पर्यटक हे समुद्रात पोहण्याचा आनंद घेण्याकरिता आले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एक रशियन दाम्पत्य पोहण्याचा आनंद घेत असताना समुद्राला भरती असल्याने ते वाहत बुडत असल्याचे निदर्शनास येताच रेडी गावच्या सागर रक्षक दल व जीवरक्षक यांनी तत्काळ समुद्रात जाऊन या पर्यटकांना वाचवले. त्यांच्या सतर्कतेमुळे विदेशी पर्यटकांचा आज जीव वाचला.
रेडी समुद्रात कोणतरी बुडत असल्याचे येथील नीलेश रेडकर यांनी पाहिले. त्यांनी ताबडतोब संभाजी येरागी यांना सांगून त्यांची खासगी पर्यटक बोट घेऊन आले. तेथे रेडी ग्रामपंचायतीचे जीवरक्षक संजय गोसावी व दिलीप रुद्रे हेदेखील होते. सर्वांनी  बोटीच्या साहाय्याने तत्काळ खोल समुद्रात जाऊन पाण्यात बुडत असलेल्या व मदतीची याचना करणाऱ्या पर्यटक दाम्पत्यास वाचविले आणि किनाऱ्यावर आणले. त्यावेळी समुद्रावर असणाऱ्या इतर देशी-विदेशी पर्यटकांनी त्या दाम्पत्याचा जीव वाचविल्याबद्दल नीलेश रेडकर, संभाजी येराजी, संजय गोसावी व दिलीप रुद्रे यांचे अभिनंदन करून कौतुक केले.
दरम्यान, नीलेश रेडकर हे २००६ पासून वेंगुर्ले पोलिस ठाणेअंतर्गत सागर रक्षक दलाच्या माध्यमातून आपले सामाजिक कर्तव्य म्हणून कार्य करीत आहेत. त्यांना या घटनेबद्दल अधिक विचारले असता ते म्हणाले, ‘‘सागरी किनाऱ्यालगतच्या  ग्रामपंचयात हद्दीतील जीव रक्षकांना गस्तीकरिता शासनाकडून अथवा संबंधित ग्रामपंचायतीकडून  एका बोटीची आवश्‍यकता आहे. जेणेकरून अशा गंभीर घटनांवर नियंत्रण ठेवता येईल. ही यंत्रणा नसल्याने शासनाने यात सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष घालून पूर्तता करावी.’’
चौघांच्या कामाची दखल घेणार
रेडी गावच्या या सागर रक्षक दल व जीवरक्षक या चारही जणांनी  कर्तव्य ‘सागर सुरक्षा कवच’ या अभियानाच्या दिवशी सतर्क राहून परदेशी पर्यटकांचे जीव वाचविल्याने जो अनर्थ टळला. यासाठी भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था, कोकण विभागातर्फे या चारही जणांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे कोकण विभागाचे सीइओ राजन रेडकर यांनी या चारही जणांची शासनस्तरावर या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांचा योग्य सन्मान करण्यात यावा, यासाठी पोलिस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांना पत्राद्वारे कळविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
Vertical Image: English Headline: The Russian couple was saved on a redee seashoreसकाळ वृत्तसेवाAuthor Type: AgencyTwitter Publish: