राजपथवर ‘एनसीसी’चे नेतृत्व औरंगाबादच्या सागरकडे

Primary tabs

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादप्रजासत्ताक दिनी दिल्लीला होणाऱ्या संचलनात यंदा 'एनसीसी'च्या संघाचे देशपातळीवर नेतृत्व औरंगाबादचा सागर खंडू मुगले करणार आहे. देवगिरी कॉलेजमधील बीए अभ्यासक्रमाचा विद्यार्थी असलेल्या सागरने आपल्या आवाज, एकाग्रता, मेहनतीच्या बळावर हे यश मिळविले.प्रजासत्ताक दिनी राजपथावर संचलनात सहभागी होण्याची संधी मिळणे ही अभिमानाची गोष्ट आहे. दरवर्षी राष्ट्रीय सेवा योजना आणि 'एनसीसी'मधून परेडमध्ये सहभागी होणासाठी मोठी स्पर्धा देशपातळीवर असते. यंदा औरंगाबादसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे, 'एनसीसी'च्या तुकडीच्या पथसंचालनाचे नेतृत्व औरंगाबादचा विद्यार्थी करणार आहे. पथसंचलनातून देशाच्या सामर्थ्याचे, संस्कृतीचे दर्शन घडते अशा या सोहळ्यात सहभागी होणे हे अतिशय अभिमानास्पद असल्याची भावना सागरने 'मटा'कडे व्यक्त केली. तो १४८ जणांच्या तुकडीचे नेतृत्च करणार आहे. त्याचा अंतिम सराव बुधवारी येथे पार पडला. देशभरातील विविध राज्यातून दोन हजार एनसीसीचे कॅडेड आले होते. अतिशय खडतर मानल्या जाणाऱ्या तयारीतून अंतिम परेडसाठी विद्यार्थी निवडले जातात. त्या तुकडीचे नेतृत्व करण्याची संधी त्याला मिळाली आहे. मुळ कन्नड तालुक्यातील वासडी गावचा असलेला सागर याने २०१६मध्ये एनसीसीमध्ये सहभाग घेतला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट