Meizu Zero: आला अनोखा फोन! स्पीकर, चार्जिंगसाठी पॉइंटच नाही

Primary tabs

नवी दिल्ली चीनची कंपनी मेईझूने आपला आगळावेगळा स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे या स्मार्टफोनला एकही होल नाही. मोबाइलमध्ये स्पीकर आहे, पण, स्पीकरसाठी होल नाही. चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग पोर्टही (होल) नाही. आवाजासाठी सर्व मोबाइलमध्ये दिसणारे बटन सुद्धा नाही. एकही होल नसलेला हा जगातील पहिला स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. स्मार्टफोनचे पॉवर आणि आवाज वाढवण्यासाठी बटन ऐवजी बाजुला एक खास टच पॅनल लावण्यात आला आहे. स्पीकरसाठी मेझूने डिस्प्लेमध्येच एक ऑप्शन दिले आहे. चार्जिंग करण्यासाठी कंपनीने वायरलेस चार्जिंग सपोर्ट दिला आहे. कंपनीने या फोनची किंमत किती असणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवले आहे. Meizu Zero ची वैशिष्ट्ये >> ५.९९ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले >> रिझॉल्यूशन १०८० X २१६० पिक्सल >>२.५ डी कर्व्ड ग्लास प्रोटेक्शन >> स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर, ६३० जीपीयू >> ड्युअल कॅमेरा, २० मेगापिक्सल फ्रंट, १२ मेगापिक्सल बॅक >>ब्लूटूथ, १८ व्हॅट वायरलेस चार्जिंग सपोर्ट मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट