चॅनल्स न निवडल्यास १ फेब्रुवारीपासून टीव्ही बंद?

Primary tabs

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) आपल्या आवडीचे टीव्ही चॅनल्स निवडणे आणि तेवढ्या निवडक चॅनल्सचे शुल्क भरण्याबाबतची घोषित केलेली नवी व्यवस्था लागू होण्यास केवळ ८ दिवस उरले आहेत. येत्या १ फेब्रुवारीपासून नव्या व्यवस्थेची अंमलबजावणी होणार आहे. परंतु, सुमारे १६ कोटी ५० लाख डायरेक्ट टू होम (डीटीएच) आणि केबल ग्राहकांपैकी तब्बल ६५ % ग्राहकांनी आपल्या आवडत्या चॅनल्सची यादीच बनवलेली नाही.