कसला युतीचा प्रस्ताव? मॅरेज ब्यूरो आहे का?: सेना

Primary tabs

भाजप-शिवसेना युतीची चर्चा येत्या दोन दिवसांत सुरू होणार असल्याचं वृत्त शिवसेनेनं आज स्पष्ट शब्दांत फेटाळून लावलं. 'चर्चेच्या प्रस्तावाच्या बातम्या केवळ राजकीय वर्तुळात फिरत आहेत. आमच्यापर्यंत कुणीही आलेलं नाही आणि प्रस्ताव स्वीकारायला शिवसेनेनं मॅरेज ब्यूरो उघडलेला नाही,' असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.