Reliance Jio : जिओ फोन ग्राहकांसाठी दोन नवे प्लान लाँच

Primary tabs

नवी दिल्ली रिलायन्स जिओने जिओ फोनच्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा दोन नवीन प्लान आणले आहेत. मोठी वैधता असलेले ५९४ रुपये आणि २९७ रुपयांचे दोन नवे प्लान जिओने लाँच केले आहेत. याआधी जिओने १ हजार ६९९ रुपयांचा वार्षिक प्लान आणला होता. हा प्लान सर्व ग्राहकांसाठी होता. परंतु, जिओचे हे दोन्ही प्लान केवळ जिओफोनसाठीच उपलब्ध आहेत. ५९४ रुपयांच्या प्लानमधील वैधता ही १६८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये जिओफोन ग्राहकांना अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. तसेच अनिलिमिटेड डेटा मिळणार आहे. प्रत्येक महिन्याला ३०० एसएमएसही मिळणार आहे. दुसऱ्या प्लानमध्ये २९७ रुपयांत ८४ दिवसांची वैधता आहे. यात जिओफोन ग्राहकांना अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगची सुविधा देण्यात येणार आहे. तसेच अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. या प्लानमध्ये दररोज डेटाची मर्यादा ०.५ जीबी आहे. त्यानंतर ६४ केबीपीएसवर येणार आहे. ग्राहकांना ३०० एसएमएस मिळणार आहे. जिओच्या १,६९९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना प्रतिदिन १.५ जीबीचा ४ जी डेटा दिला जातो. अनलिमिटेड लोकल कॉल, एसटीडी आणि रोमिंग व्हाईस कॉलिंग, १.५ जीबीचा ४ जी डेटा, १०० एसएमएस प्रतिदिन मिळतो. या प्लानची वैधता वर्षभर (३६५ दिवस) इतकी आहे. मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट