Samsung Days: गॅलेक्सीच्या फोनवर १२ हजार सूट

Primary tabs

नवी दिल्ली फ्लिपकार्टवर सुरू झालेल्या सॅमसंग डेज (Samsung Days) या सेलमध्ये सॅमसंगच्या मोबाइलवर १२ हजारांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. हा सेल २४ जानेवारी ते २७ जानेवारी या दरम्यान सुरू राहणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी नोट ९ वर ८ हजार १०० रुपयांची सूट दिली जात आहे. गॅलेक्सी नोट ९ या स्मार्टफोनवर १२ हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे. हा फोन ६ जीबी रॅम प्लस ६ जीबी स्टोरेज आणि ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी या दोन पर्यायात उपलब्ध आहे. या दोन्ही मोबाइलवर १२ हजारांची सूट दिली जात आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए९ या स्मार्टफोनवर ५ हजार १०० रुपयांची सूट दिली जात आहे. या फोनमध्ये २४ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए७ स्मार्टफोनवर ६ हजार ९१० रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. गॅलेक्सी एस ८ या फोनवरही ३ हजार ४४४ रुपयांची सूट आहे. हा फोन नो ईएमआय कॉस्टवर खरेदी करण्याची सुविधा आहे. सॅमसंग ऑन८ हा फोन १२ हजार ९९० रुपयांना मिळत आहे. सॅमसंग ऑन६ ९ हजार ९९० रुपयांना मिळत आहे. या फोनची किंमत १७ हजार ९०० रुपये इतकी आहे. सॅमसंग ऑन एनएक्सटी ९ हजार ९९० रुपयांना मिळत आहे. गॅलेक्सी ऑन ५ हा फोन ५ हजार ४९० रुपयांना मिळत आहे. मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट