ठाण्यात शिवजयंती विशेष संगीत कट्ट्यावर सुरवीरांचा मानाचा मुजरा 'दैवत छत्रपती'

शिवजयंती विशेष संगीत कट्ट्यावर संगीत कट्ट्याच्या सुरवीरांनी महाराजांच्या पवित्र स्मृतीस आपल्या गीतांच्या सादरीकरणाने मानाचा मुजरा अर्पण केला.

ठाणे जिल्ह्यातील ४० मतदार परदेशातून करणार मतदान

जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीत ६० लाख ९४ हजार ३०८ मतदार मतदान करणार आाहेत. यात सध्या सुरू असलेल्या मतदार नोंदणीमुळे त्यात काही प्रमाणात वाढ होणार आहे.

ठाणे मतदारसंघात १५ वर्षे भाजपाच, युतीच्या जागावाटपात १९९६ मध्ये मतदारसंघ गेला शिवसेनेकडे

सुमारे १५ वर्षे हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात होता. अवघी पाच वर्षे काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शांताराम घोलप यांनी केले. त्यानंतर मात्र आजवर काँग्रेसला या मतदारसंघावर वर्चस्व सिद्ध करता आले नाही.

कल्याण लोकसभा : भाजपाच्या मदतीवर सेनेचे भवितव्य

जनसंघापासून भाजपाचा बालेकिल्ला अशी ख्याती असलेल्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपा आणि शिवसेनेचे सूर जुळतात की नाही, यावर लोकसभा निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार आहे

बेकायदा बांधकामे वाचवण्यासाठी लपाछपीचा खेळ, भार्इंदर पालिकेचा कारभार

मीरा-भार्इंदरमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बेकायदा बांधकामांवर कारवाई टाळण्यासाठी नगररचना विभाग आणि प्रभाग अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.