रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

पंढरपूर: शाळेत एका अनोळखी मुलाने चिठ्ठी दिल्याचा प्रयत्न केल्यानंतर दहावीत शिकणाऱ्या काजल पोरे या मुलीने घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. मुलीला चिठ्ठी देण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वाखरी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. अखेर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. वखारी येथील माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयात काजल पोरे ही विद्यार्थीनी दहावीत शिकत होती. दोन दिवसापूर्वी शाळेत असताना तिला एका अज्ञात मुलाने एका लहान मुलाच्या हातून चिठ्ठी देण्याचा प्रयत्न केला होता.

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी १०० कोटी; शोभा डेंचा विरोध

मुंबई:शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी १०० कोटी रुपये मंजूर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला ज्येष्ठ लेखिका शोभा डे यांनी विरोध दर्शवला आहे. 'कुणाला हवीत ही स्मारकं? आम्हाला शाळा आणि रुग्णालयं पाहिजेत,' असं ट्विट डे यांनी केलं आहे.काही दिवसांपूर्वीपर्यंत मुंबईच्या महापौरांचं निवासस्थान असलेल्या दादर येथील हेरिटेज वास्तूत बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होणार आहे. त्यासाठी महापौरांचं निवासस्थान राणी बागेतील एका बंगल्यात स्थलांतरित करण्यात आलं आहे.

लोक प्रियांकांमध्ये इंदिरा गांधींना पाहतील: शिवसेना

मुंबई:मित्रपक्ष भाजपला सध्या विरोधकांपेक्षाही टोकाचा विरोध करणाऱ्या शिवसेनेनं प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशाचं स्वागत केलं आहे. 'प्रियांका यांच्याकडं त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांच्यासारखीच गुणवत्ता असून त्यांचं व्यक्तिमत्त्वही आकर्षक आहे. त्यांच्या सक्रियतेचा काँग्रेस पक्षाला निश्चितच फायदा होईल. मतदार प्रियांकांमध्ये इंदिरा गांधी यांना पाहतील,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे.आजवर सक्रिय राजकारणापासून दूर असलेल्या प्रियांका गांधी यांची काँग्रेस पक्षानं पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे.

'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वादाची डरकाळी घुमली

मुंबई:'ठाकरे' चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगच्यानिमित्ताने शिवसेना आणि मनसेमधील छुप्या वादाची अनुभूती पुन्हा एकदा उपस्थितांना आली. 'ठाकरे' चित्रपटाचे दिग्दर्शक आणि मनसे नेते अभिजित पानसे हे चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंग सुरू असताना तडकाफडकी उठून गेले. चित्रपटाच्या निर्मात्यांकडून मिळालेल्या वागणुकीने अपमानित झाल्यामुळे पानसे तेथून उठून गेल्याचे सांगण्यात येते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील वरळीमधील एट्रिया आयनॉक्स थिएटरमध्ये ठाकरे चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते.

मराठा आरक्षण; ६ फेब्रुवारीपासून होणार सुनावणी

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व याचिकांवरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली आहे. तसेच, मराठा आरक्षणाच्या याचिकांवरील अंतिम सुनावणीस ६ फेब्रुवारीपासून सुरुवात केली जाईल, असे आदेश न्या. रणजीत मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने दिले. त्याचवेळी राज्य सरकारने राज्य मागास प्रवर्ग आयोगाचा संपूर्ण अहवाल तातडीने उच्च न्यायालयात सादर करण्यात यावा. हा अहवाल तशाच्या तसा जाहीर करायचा की नाही, हे उच्च न्यायालय ठरवेल, असे आदेशही देण्यात आले. राज्य सरकारच्या सर्व विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे.