नवी मुंबईचा 'हायटेक' थाट; 4जी इंटरनेटमध्ये सगळ्यात सुस्साट

ब्रिटनची वायरलेस मॅपिंग कंपनी ओपन सिग्नलने भारतातील शहरांमधील इंटरनेट स्पीडवर अभ्यास केला आहे. यानुसार भारतात रात्री 10 वाजता डाऊनलोड स्पीड 3.7 एमबीपीएस आणि पहाटे 4 वाजता चौपट म्हणजेच 16.8 एमबीपीएस एवढा प्रचंड वेग मिळतो. 

मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत, कुर्ला-सायनदरम्यान रेल्वे रूळाला तडा

कुर्ला-सायन रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यानं मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

बाळासाहेबांच्या स्मारकाचे दार उघडले, युतीचे बंदच!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महापौर बंगल्यातील स्मारकासाठीची कागदपत्रे बुधवारी बाळासाहेबांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

अभिजीत पानसे चिडले, रागातच थिएटरबाहेर पडले; 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वेगळाच 'सीन'

चित्रपटाचे निर्माते आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु संजय राऊतांचं ऐकून न घेता 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगमधून अभिजीत पानसे कुटुंबीयांसह तडकाफडकी निघाले.

संशयित अतिरेक्यांनी रचला होता देशभरात रासायनिक हल्ल्यांचा कट

एटीएसने अटक केलेल्या ९ संशयित अतिरेक्यांनी इसिस या दहशतवादी संघटनेच्या विचारांनी प्रेरित होऊन उम्मत-ए-मोहम्मदिया नावाचा गट तयार केला होता.