कोकणच्या सुरक्षेसाठी तटरक्षक दलात 2 सुरक्षा बोटी

महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तटरक्षक दलात दोन इंटरसेप्टर बोटी दाखल झाल्या. सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा बंदरात, या दोन सुरक्षा बोटी तटरक्षक दलाच्या सेवेत दाखल झाल्या.

नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेला नितेश राणेच गैरहजर राहणार !

काँग्रेसचे बंडखोर नेते नारायण राणे उद्या कणकवलीमध्ये पत्रकार परिषद घेऊन मोठा निर्णय जाहीर करणार आहेत. पण त्यांच्या नियोजित पत्रकार परिषदेत आमदार पूत्र नितेश राणेच सहभागी असणार नाहीत.

सलग दुसऱ्या वर्षी भगवानगड वर्चस्व वाद चिघळला

भगवानगडाच्या दसरा मेळाव्यावरून पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

राज्यातली मोठी धरणं भरली, पाण्याचा विसर्ग सुरू

राज्यात पावसाने पुन्हा सर्वदूर जोरदार हजेरी लावलीय. त्यामुळे राज्यातली प्रमुख धरणं तुडुंब भरून वाहू लागलीत. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोसळणा-या पावसामुळे धरणाचे 6 वक्री दरवाजे एक फूटाने उघडण्यात आलेत. कोयना धरणातून सध्या 9 हजार 287 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

राज ठाकरे करणार फेसबुक पेज लाँच

राज ठाकरे यांच्या नावाने फेसबुक ट्विटरवर आधीच अनेक बनावट अकाऊंट असले तरी यावेळी मात्र राज ठाकरे स्वत: हे पेज लाँच करणार आहेत.