LokSabha 2019 : दानवेंच्या पराभवासाठी सक्षम उमेदवाराला पाठींबा देऊ

जालना : अर्जुन खोतकर यांनी महिनाभर आम्हाला गाफील ठेवून मनोमिलन केले. त्यामुळे मतदारसंघातल्या सर्व ठिकाणी जाता आले नाही. मात्र, दानवेंना पराभूत करण्याचा निर्धार कायम असून वेळप्रसंगी सक्षम उमेदवाराला पाठींबा देऊ असे आमदार बच्चू कडू यांनी शनिवारी (ता.23) कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत सांगितले. तत्पूर्वी 28 मार्च रोजी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेणार असल्याचे ही त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

Loksabha : युतीचा पराभव करायचा असल्यास एकत्र या : अजित पवार

मुंबई : भाजप आणि शिवसेना या पक्षांचा पराभव करायचा असल्यास सर्वांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (शनिवार) केले. 
महाआघाडीतील नेत्यांची पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या बैठकीत अशोक चव्हाण, राजू शेट्टी यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, भाजप आणि शिवसेना या पक्षांचा पराभव करायचा असल्यास सर्वांनी एकत्र यायला हवे. तसेच यावेळी त्यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावरही निशाणा साधला. महाआघाडीत सामील न होणारे भाजपची 'बी टीम' म्हणून काम करत आहेत.   

Election Tracker : मायावती आज काय म्हणाल्या?

निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! काय म्हणाताहेत बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती?
23 मार्च, 2019
एकीकडे मताच्या स्वार्थापायी पाकिस्तानविरुद्ध भडकावणारी वक्तव्य तर दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना गोपनीय पत्र. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाच्या 130 कोटी जनतेसोबत असा खेळ खेळणे योग्य आहे का? लोकहो, यांच्यापासून सावध रहा

Loksabha 2019 : तुम्हाला एकही जागा मिळणार नाही; तरी आपण एकत्र निवडणूक लढू

मुंबई : माझ्या मागं...एवढी लोक आहेत...त्यांच्या माग एवढी जनता आहे...हो का मग दाखवा...जाऊद्या मला एकही जागा दिली नाही तरी मी समाधानी आहे...बर झालं...आपण एक काम करू, तुमच्या पक्षांना एकही जागा मिळणार नाही...तरिही आपण एकत्र निवडणूक लढवू...आणि अगदीच उमेदवारी मिळवायची असेल तर शक्ती प्रदर्शन करा मग...विचार करू. भाजप-शिवसेनेच्या महायुतीमध्ये केवळ नामधारी राहिलेल्या रामदास आठवले आणि महादेव जानकर यांची ही परिस्थिती झाली आहे.  

Loksabha 2019 : 'काँग्रेसने पैसे घेऊन उमेदवारी दिली'

नागपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हतबल झाल्याचे दिसत असताना येथे पक्षाने आर्थिक व्यवहारातून उमेदवारी दिली, असा गंभीर आरोप मतदारसंघातील यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्‍यातील कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला.