फर्ग्युसन विद्यापीठ

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाला विद्यापीठाचा दर्जा मिळणे ही स्वागतार्ह बाब आहे. सव्वाशे वर्षांहून अधिक इतिहास असलेल्या 'फर्ग्युसन'ने राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या शैक्षणिक विश्वात आपली मुद्रा केव्हाच उमटविली आहे. एक दर्जेदार संस्था असा लौकीक असलेल्या 'फर्ग्युसन' ला यापूर्वीच विद्यापीठाचा दर्जा मिळायला हवा होता. आता हा निर्णय घेऊन राज्य सरकारने पुढचे पाऊल टाकले आहे. अशाच प्रकारच्या राज्यातील अन्य महाविद्यालयांसाठी निर्णय घेण्याची गरज आहे. अर्थात, त्यासाठी त्या-त्या संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. खासगी संस्थांची विद्यापीठे राज्याला काही नवीन नाहीत.

आदिवासींचा 'मूळ' प्रश्न

प्रकल्पासाठी गावांचे अधिग्रहण करताना गावकऱ्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारची असते. या काळात सरकारी प्रयत्न अपुरे पडतात. प्रकल्पग्रस्तांना आवाज त्यातूनच बुलंद होतो. तीव्र आंदोलने उभी होतात. विदर्भातील मेळघाटची समस्या मुळातून समजून घेण्याची गरज आहे. जंगलाची साथसोबत करायची, की व्यवहारी जगाचे कायदे पाळायचे यातून हा तिढा पेटला. सुविधा आणि मोबदल्यासोबतच कुटुंबातील प्रत्येकाला किमान एक एकर जमीन मिळावी म्हणून आठ गावांतील आदिवासी थेट मूळ गावांत परतले. ही गावे मेळघाटच्या राखीव अभयारण्यातील आहेत. वन्यजीवांसाठी हा भाग निर्मनुष्य करण्यात आल्याने आदिवासीच्या वाट्याला विस्थापनाच्या झळा आल्या.

'फनेल झोन'चा विळखा !

चिन्मय काळेchinmay.kale@timesgroup.com'फनेल झोन' च्या विचित्र नियमामुळे विमानतळ परिसरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासात मोठा अडथळा आला आहे. या इमारतींचा पुनर्विकास तर होऊ शकतो, पण त्यामध्ये उभ्या होणाऱ्या नवीन इमारतींची उंची एक इंचही वाढवता येणार नाही. 'फनेल झोन' म्हणजे विमानांच्या ये-जा करण्याच्या मार्गात एकही उंच इमारत नसावी, यावर भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे (एएआय) कडक नियम आहेत.

काँग्रेसचे ब्रह्मास्त्र

काँग्रेस पक्षाने आपल्या भात्यातील प्रियांका गांधी वड्रांचे 'ब्रह्मास्त्र' उपसून केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आश्चर्याचा अनपेक्षित धक्का दिला आहे. पंधरा वर्षांपूर्वी राहुल गांधी यांनी राजकारणात पदार्पण केले, तेव्हापासूनच प्रियांका यांनाही राजकारणात उतरविण्याची आग्रही मागणी होत होती. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या लाजिरवाण्या पराभवाचे अप्रत्यक्षपणे नेतृत्व करणारे आणि पुढच्या तीन वर्षांत सतत निष्प्रभ ठरणाऱ्या राहुल गांधींच्या अपयशावर शिक्कामोर्तब झाल्यावरच प्रियांका राजकारणात उतरतील, असा समज काँग्रेसजनांनी करून घेतला होता.

आरोग्यमंत्र: 'ही' आहेत रक्तदाबाची कारणे

डॉ अभय विसपुते,जनरल फिजिशियनरक्तदाबाची कारणे -१. आनुवंशिकता : उच्च रक्तदाब असलेल्या पालकांच्या मुलांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण चारपट अधिक असू शकते. तसेच पालकांची जीवनपद्धती, राहणीमान, खाणे-पिणे यांचे अनुकरण मुले करत असल्यामुळेही या मुलांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक असू शकते. २. मानसिक ताण : मानसिक ताणतणावांमुळे जीवनात सतत मानसिक ताणतणाव सहन करावा लागतो. त्यांच्या मानसिक संघर्षामुळे शरीरातील विविध ग्रंथी, विशेषत: अॅड्रिनल ग्रंथी उत्तेजित होतात त्यामुळे रक्तदाब वाढतो.३. धूम्रपान : धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक असते.