सभा घ्यायची कुठे ते सांगा - राज

मुंबई - "गिरगाव चौपाटी, आझाद मैदान आणि आता शिवाजी पार्कवरही जाहीर सभा घ्यायची नाही, तर सभा नक्की घ्यायची कुठे, हे एकदाचे सांगा,'' असा त्रागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

पोलिसांच्या मारहाणीमुळे तरुणाने पेटवून घेतले

गेवराई - गावातील एकाशी झालेल्या वादातून पोलिसांनी केलेली मारहाण सहन न झाल्याने रागाच्या भरात तरुणाने पोलिस चौकीसमोर जाळून घेतल्याची घटना मादळमोही (ता. गेवराई) येथे शनिवार (ता. चार) सांयकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या घटनेनंतर गावातील संतप्त नागरिकांनी पोलिस चौकीवर हल्ल्याचा प्रयत्न केला मात्र सरपंचांच्या मध्यस्थीनंतर तो टळला. गावकऱ्यांचा रुद्रावतार पाहून चौकीतील पोलिस पळून गेले. गावात तणावपूर्ण शांतता असून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या तरुणावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून तो सत्तर टक्के भाजला आहे.

अफगाणिस्तानमध्ये वर्षभरात 3 हजार मृत्युमुखी

काबूल - अफगाणिस्तानमधील युद्धात गेल्या वर्षभरात तब्बल 3 हजार नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. युद्धात सामान्य नागरिकांचा बळी जाण्याची संख्या गेल्या 5 वर्षांपासून वाढतच असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात म्हटले आहे. या अहवालामुळे पाश्‍चिमात्य देश आणि अफगाणिस्तान सरकार यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. युद्धात सामान्य नागरिक मृत्युमुखी पडत असल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई आणि नाटोचे सैन्या यांच्यात टोकाचे मतभेद आहेत.

हिमवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर वाहतूक ठप्प

श्रीनगर - काश्‍मीर खोऱ्यात गेले दोन दिवस झालेल्या हिमवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. सीमा रस्ते संघटनेच्या वरिष्ठ अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार,""बनिहाल आणि पटणीटॉप भागातील हिमवृष्टी थांबल्यामुळे रस्त्यावर साठलेला बर्फ बाजूला करण्याचे काम वेगाने सुरू आहे. जवाहर बोगद्याच्या परिसरातही चार इंचांपर्यंत बर्फ साचल्याने या भागातील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.'' श्रीनगर विमानतळावरील प्रमुख धावपट्टी आणि परिसरातही हिमवर्षाव झाल्यामुळे सकाळच्या वेळेतील अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली होती.

फेसबुकच्या भारतीय युजर्समध्ये दुपटीने वाढ

वॉशिंग्टन - लोकप्रिय सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ फेसबुकच्या भारतीय युजर्समध्ये गेल्या वर्षी दुपटीने वाढ झाली असून चीनमध्ये फेसबुकला साधा शिरकावही करता आला नसल्याचे वृत्त आहे.

माकडांचा उच्छाद रोखण्यास वनविभाग सज्ज

मडिकेरी (कर्नाटक) - निसर्गधाम या पर्यटन ठिकाणी माकडांनी घातलेला उच्छाद संपविण्यासाठी वनविभागाने पावले उचलली आहेत. आज (शनिवार) सकाळपर्यंत सुमारे 40 हून अधिक माकडांना पकडण्यात वनविभागास यश आले असून, पकडलेल्या माकडांना सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडण्यात येणार आहे. जणू एखादी युद्धमोहिम हाती घेतल्यासारखे वनविभागाची टीम या प्रकरणात लक्ष घालत आहे. वन अधिकारी अचाप्पा यांनी पत्रकारांना याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले, की निसर्गधाम हे एक प्रसिद्ध ठिकाण असून, अनेक पर्यटक येथे भेट देतात. तेव्हा येथे असलेल्या माकडांचा त्यांना भरपूर त्रास सहन करावा लागतो.

मणिपूरमध्ये ३४ ठिकाणी फेरमतदान

इंफाळ - मणिपूरमध्ये आज 11 विधानसभा मतदारसंघांतील 34 मतदान केंद्रांवर फेरमतदान झाले. मतदानावेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी सात ते दुपारी 3 या वेळेत मतदानप्रक्रिया पार पडली. राज्यात विधानसभेच्या 60 जागांसाठी 28 जानेवारीला मतदान झाले होते. मात्र, 34 मतदान केंद्रांवर झालेल्या हिंसाचाराच्या विविध घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला. हिंसाचार झालेल्या केंद्रांवर आज पुन्हा मतदान घेण्यात आले.

एकदिवसीय क्रमवारीत विराट तिसऱ्या स्थानावर

दुबई - भारताचा फलंदाज विराट कोहली याने जागतिक एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत तिसरे स्थान मिळविले आहे. तर कर्णधार महेंद्रसिंह धोनी पाचव्या स्थानावर आहे. कोहलीच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम क्रमवारी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज (शनिवार) प्रसिद्ध केलेल्या आकडेवाडीनुसार पहिल्या दहा गोलंदाजांमध्ये एकही भारतीय गोलंदाजाचा समावेश नाही. गोलंदाजांमध्ये श्रीलंकेचा लसिथ मलिंगा पहिल्या स्थानावर आहे. फलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे फलंदाजी हाशिम आमला पहिल्या आणि एबी डिव्हिलियर्स दुसऱ्या स्थानावर आहे.

मुल्ला उमरच्या पत्रावरून तालिबान अस्वस्थ

काबूल - अफगाणिस्तानातील तालिबानचा म्होरक्या मुल्ला उमर याने अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना पत्र पाठविल्याच्या वृत्ताचा, तालिबानचा प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद याने स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे. हा आरोप बिनबुडाचा असल्याचा दावाही त्याने केला आहे.

उत्तर प्रदेशात आघाडी करणार नाही -राहुल गांधी

संत कबिरनगर- उत्तर प्रदेशात कोणत्याही राजकीय पक्षासोबत कॉंग्रेस आघाडी करणार नाही, असे स्पष्टीकरण कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी आज (शनिवार) दिले आहे. उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री कॉंग्रेस पक्षाचा राहील, असा दावाही त्यांनी यावेळी केला. मेहदवाल येथे झालेल्या प्रचार सभेत बोलताना राहुल म्हणाले,""उत्तर प्रदेशात कॉंग्रेस सत्तेवर येणार आहे. उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री कॉंग्रेस पक्षाचा राहील. त्यामुळे निवडणुका झाल्यावर कोणत्याही राजकीय पक्षासोबत आघाडी केली जाणार नाही. आमची केवळ उत्तर प्रदेशच्या नागरिकांशी आघाडी असेल. लोकांचा आवाज लखनौपर्यंत पोहोचण्यासाठी पारदर्शी प्रशासन आणले जाईल.

२ जी स्पेक्ट्रमच्या 'रेंज'मध्ये चिदंबरम नाही !

नवी दिल्ली - "केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना टू जी स्पेक्‍ट्रम गैरव्यवहारात सहआरोपी करून घ्यावे,' अशी मागणी करणाऱ्या सुब्रह्मण्यम स्वामी यांचा अर्ज फेटाळला. न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे गृहमंत्र्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. तत्कालीन दूरसंचारमंत्री ए. राजा यांच्या काळात वाटप करण्यात आलेले 122 स्पेक्‍ट्रम परवाने रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला होता. त्यानंतर आज (शनिवार) होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. चिदंबरम यांना सहआरोपी करण्याची याचिका फेटाळल्याने केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

फेसबुकमुळे भेटल्या ३० वर्षांनंतर जुळ्या बहिणी

स्टॉकहोम - काय असेल ते असो, पण स्वीडनमधील अनेक जोडप्यांचा कल आशियाई मुले दत्तक घेण्याकडे असतो. भारतातूनही अनेक मुले या देशात दत्तक गेली आहेत. इंडोनेशियाही मागे नाही. सुमारे ३० वर्षांपूर्वी इंडोनेशियातील एका दांपत्याने आपल्या जुळ्या मुलींपैकी एकीला स्वीडनमधील एका जोडप्याला दत्तक दिले.

मानवी शरीरासाठी साखर विषारी

वॉशिंग्टन - कोणत्याही पदार्थाचे अतिरेकी सेवन, मानवी शरीराला घातक ठरू शकते. शास्त्रज्ञांच्या मते साखरेचाही त्यात समावेश आहे. मानवी शरीरासाठी साखर विषारी असून, सरकारने मद्याप्रमाणेच साखरेच्या सेवनावरही नियंत्रण आणले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

न्यायालयाच्या निकालाने आश्चर्य नाही - सिब्बल

नवी दिल्ली - २ जी स्पेक्ट्रम गैरव्यवहार प्रकरणात पी. चिदंबरम यांना सहआरोपी करण्यासाठी सुब्रह्मण्यम स्वामी यांनी दाखल केलेली याचिका सीबीआय न्यायालयाने फेटाळल्याने आपल्याला आश्चर्य झाले नसल्याचे, केंद्रीय दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे. सिब्बल म्हणाले, ''माझ्यासाठी न्यायालयाचा हा निर्णय कोणताही आश्चर्य देणारा नाही. विरोधी पक्षातील काही नेते कायमच टीका करीत असल्याने दुःख होते.'' सुब्रह्मण्यम स्वामींच्या याचिकेवर आज (शनिवार) न्यायालयाने सुनावणी करीत याचिका फेटाळून लावली. त्यामुळे चिदंबरम यांना मोठा दिलासा मिळाला असून, ते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

लग्नापूर्वीच करीना कपूर गर्भवती?

मुंबई - बॉलिवुडमध्ये सध्या दबक्या आवाजात चर्चा चालू आहे, ती करीना कपूरची. अलिकडेच एका प्रसिद्ध दैनिकाने करीना एका विमानतळावर आलेली असताना, एका दैनिकाच्या छायाचित्रकाराने तिचे छायाचित्र टिपले. आपली छाबी कोणी टिपत असल्याची तिला कल्पनाच नव्हती. मात्र ते प्रसिद्ध झाल्यापासूनच दबक्या चर्चेला उधाण आले आहे.