अंबानींकडून घोषणांचा पाऊस, फुकटात फोन

मुंबई- रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी रिलायन्स जिओचा फोन फुकट देण्याची घोषणा करुन पुन्हा एकदा भारतीय बाजारात मोठा ‘धमाका’ केला आहे. 
रिलायन्स जिओने मुंबईत झालेल्या ४०व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत देशातील पहिला स्वस्त आणि स्मार्ट ४जी फीचर फोन लॉन्च केला. विशेष म्हणजे जिओच्या ४जी व्होल्ट फोनची इफेक्टीव्ह किंमत शून्य आहे. मात्र, यासाठी १५०० रुपये सिक्युरिटी डिपॉ‍झिट म्हणून कंपनीकडे ठेवावे लागतील. तीन वर्षांनंतर ते परत (रिफंड) केले जाणार आहेत.

एलआयसीला अर्ध्या तासात ७ हजार कोटींचा फटका

मुंबई- भांडवली बाजारात झालेल्या घसरणीत भारतीय विमा कंपन्यांचे मंगळवारी तब्बल १० हजार कोटींचे नुकसान झाले. यामध्ये एफपीआय कंपनीचे सर्वाधिक ९ हजार कोटींचे नुकसान झाले.

एसबीआयने ‘ही’ सेवा केली निशुल्क

स्टेट बँक ऑफ इंडियाने आयएमपीएस सेवेद्वारे एक हजार रुपयांपर्यंतची रक्कम पाठविण्यासाठी लागणारे शुल्क रद्द केले आहे.
नवी दिल्ली-   स्टेट बँक ऑफ इंडियाने इमिजिएट पेमेंट सर्व्हिसद्वारे (आयएमपीएस) एक हजार रुपयांपर्यंतची रक्कम पाठविण्यासाठी लागणारे शुल्क रद्द केले आहे. त्याचबरोबर ७५ टक्के शुल्क कपात केले आहे. ग्राहकांना ही सेवा उद्यापासूनच मिळणार आहे.

भारताच्या प्रगतीचा वेग चीनपेक्षा वाढला!

आर्थिक क्षेत्रात भारत हा चीनला मागे टाकून जागतिक महाशक्ती म्हणून उदयास येत असल्याची आनंददायी अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

ऑनलाईन व्यवहार होणार अधिक सुरक्षित

कॅशलेस व्यवहारात ग्राहकांना होणा-या फसवणूकीला आळा बसवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने नवी संकल्पना सुरू केली आहे.