आयपीएल संग्रामला आजपासून सुरूवात, बंगळुरू विरुद्ध चेन्नईची लढत!

प्रहार वेब टीम
मुंबई : ‘इंडियन प्रिमिअर लिग’ अर्थात आयपीएलच्या बाराव्या सिझनला शनिवारपासून सुरुवात होत आहे. पहिल्याच सामन्यात विराट कोहली विरुद्ध एम.एस.धोनी अशी लढत पहायला मिळणार आहे. धोनीच्या ‘चेन्नई सुपरकिंग्ज’ विरुद्ध कोहलीच्या ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ संघाशी लढत होणार आहे.

आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, इथे होणार सामने

प्रहार वेब टीम
मुंबई : क्रिकेट चाहत्यांना इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) संपूर्ण वेळापत्रकाची उत्सुकता होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) ने मंगळवारी आयपीएलच्या साखळी फेरीचे वेळापत्रक जाहीर केले.

आयपीएलसाठी कोहली तय्यार!

प्रहार वेब टीम
बंगळूरु : भारताचा क्रिकेट कर्णधार विराट कोहली आता आयपीएलच्या बाराव्या हंगामासाठी सज्ज झाला आहे. बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सचे नेतृत्व भूषवणा-या तडाखेबंद फलंदाजाने सरावाला सुरुवात केली. सलामीच्या लढतीपूर्वीच्या एम. चिन्नास्वामी मैदानावरील सरावादरम्यानचे सरावाचे फोटो सोमवारी ‘ट्विटर अकाउंट’वरून ‘शेअर’ केले आहेत.

इरफानची जपानवारी निश्चित

प्रहार वेब टीम
नोमी : भारताचा प्रतिभावंत खेळाडू इरफान केटी हा २०२० टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या एशियन रेस चालण्याच्या (वॉकिंग) स्पर्धेत रविवारी चौथे स्थान मिळवत त्याने जपानवारी निश्चित केली. आगामी ऑलिम्पिकसाठी पात्र सिद्ध केलेला तो भारताचा पहिला धावपटू (अ‍ॅथलेटिक्स) ठरला आहे.
इरफानने प्रस्तावित २० किलोमीटर अंतर १:२०:५७ सेकंदांमध्ये पार करताना ऑलिम्पिक पात्रता सिद्ध केली. ऑलिम्पिकसाठीची पात्रता वेळ १ तास २१ मिनिटे इतकी आहे.

अति कसोटी क्रिकेटमुळे वनडेतील स्थान गमावले नाही-अश्विन

मुंबई : कसोटी क्रिकेटला अधिक प्राधान्य दिल्यामुळे किंवा अति कसोटी क्रिकेटमुळे वनडे संघातील स्थान धोक्यात आले नसल्याचे भारताचा अनुभवी ऑफस्पिनर आर. अश्विन याने मुंबईमध्ये सांगितले.