छोट्या पडद्यावर ‘एस फॅक्टर’

– सुनील सकपाळ
छोट्या पडद्यावर सध्या ‘एस फॅक्टर’ दिसून येत आहे. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे आणि सचित पाटील पाठोपाठ स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकरने टीव्ही मालिकेमध्ये पुनरागमन केले आहे. स्वप्नील आणि सिद्धार्थसह अमृता खानविलकर आणि मधुरा देशपांडे यांच्या सशक्त अभिनयाने सजलेली ‘जिवलगा’ ही मालिका ‘स्टार प्रवाह’वर प्रसारित होणार आहे.

‘झी चित्र गौरव’मध्ये शेवंताची दिलखेचक अदा

झी मराठीवरील लोकप्रिय अशा ‘रात्रीस खेळ चाले-२’ मालिकेमधील ‘शेवंता’ची दिलखेचक अदा आता ‘झी चित्र गौरव’ पुरस्काराच्या सोहळय़ादरम्यान अनुभवायला मिळणार आहे. या सोहळय़ामध्ये ती नव्वदीच्या दशकातल्या सुप्रसिद्ध गाण्यांवर नृत्य करणार आहे.
अपूर्वा नेमळेकर ही ‘रात्रीस खेळ चाले-२’ मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे. अण्णांसमोर हट्ट करणारी, प्रेमळ वाद करणारी शेवंता अवकाशातून अवतरली आणि तिने एक छान नृत्य सादर केलं तर..? शेवंता तिच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी खरंच एक मनमोहक नृत्य सादर करणार आहे.

मथुरेत ‘ड्रिमगर्ल’ विरुद्ध ‘हरियाणवी आयटम गर्ल’ सामना!

प्रहार वेब टीम
मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात नवीन उमेदवार, नवीन चेहरे उतरवण्यासाठी राजकीय पक्षांची रस्सीखेच चालू आहे. कोणी क्रिकेटपटू तर कोणी अभिनेता, अभिनेत्रींना उमेदवारी देत असताना मथुरेमध्ये ‘ड्रिमगर्ल’ विरुद्ध ‘आयटम गर्ल’ असा सामना पहायला मिळणार आहे.
हरियाणवी डान्सर सपना चौधरी मथुरा लोकसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. सपना काँग्रेसकडून लढणार असल्याची चर्चा आहे.

Video : ‘पीएम नरेंद्र मोदी’चा ट्रेलर पाहिलात का?

प्रहार वेब टीम
मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारीत चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ‘पीएम नरेंद्र मोदी’ असे या चित्रपटाचे नाव असून यामध्ये अभिनेता विवेक ओबेरॉयने मोदींची भूमिका साकारली आहे. मोदींचा बालपणापासून ते पंतप्रधान बनण्यापर्यंतचा प्रवास बघता येणार आहे. त्यामुळे मोदींच्या राजकीय आयुष्यासह खासगी आयुष्यावरही या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे.