#10yearchallenge डेटा कलेक्शनबद्दल फेसबुकने दिले ‘हे’ उत्तर!

नागोराव कराड : प्रहार वेब टीम
मुंबई : सोशल मीडियावर सध्या #10yearchallenge हा ट्रेंड व्हायरल होत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम अशा प्रत्येक ठिकाणी सामन्य व्यक्तीपासून सेलिब्रेटी पर्यंत प्रत्येकजण आपला १० वर्ष जुना आणि आताचा फोटो सोशल मिडीयावर अपलोड करीत आहेत. हा ट्रेंड सध्या सोशल मिडियावर जोरदार धुमाकुळ घालत आहे.

४० टक्के लोकांचा फेसबुकवरील विश्वास उडाला, फक्त एका कारणामुळे बदनाम झाली कंपनी

प्रहार वेब टीम
मुंबई : आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग असलेल्या सोशल मिडियापैकी एक म्हणजे फेसबूक. मात्र डेटा लीक झाल्यानंतर फेसबूकच्या विश्वासार्हतेवर जगभरातून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. ४० टक्के लोकांचा फेसबुकववरील विश्वास उडाला असल्याचे एका सर्वेतून स्पष्ट झाले आहे.
हँकर्सनी 3 कोटी युजर्सच्या डेटा चोरला असल्याचा खुलासा फेसबुककडून करण्यात आला. मात्र त्यावर लोकांचा विश्वास बसलेला नाही. फेसबूकचे दर महिना २.३ अब्ज युजर्स आहेत. त्यात लक्षणीय घट होत आहे.

पहिला १० जीबी रॅमचा स्मार्टफोन भारतात दाखल 

प्रहार वेब टीम

मुंबई : संगणकापेक्षाही अधिक गतीने चालणारा आणि तब्बल १० जीबी रॅम असलेला वनप्लसचा स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. ‘वन प्लस ६टी मॅकलारेन’ असे त्याचे नाव असून, याची किंमत ५० हजार ९९९ आहे. १० जीबी रॅम असल्यामुळे वेगाने चालणा-या या स्मार्टफोनमध्ये अत्याधुनिक फिचर्सचा समावेश आहे.

नासाच्या ‘इनसाईट’ यानाचे मंगळावर यशस्वी लँडिंग

प्रहार वेब टीम
वॉशिंग्टन : नासाच्या ‘इनसाईट मार्स लँडर’ यानाचे मंगळ ग्रहावर भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री १ वाजून २४ मिनिटांनी यशस्वी लँडिंग झाले आहे. मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर यान उतरताना १९,८०० किमी प्रति तास वेगाने जाणारे हे यान सहा मिनिटांत शून्य वेगावर आल्याचे नासाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले. त्यानंतर यान पॅराशूटमधून बाहेर आले आणि लँडिंग झाले. इनसाईटने मंगळ ग्रहावरुन आपले पहिले छायाचित्र पाठवले आहे. नासाकडून याचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले आहे.

येत आहे एचपीचा नवीन लॅपटॉप!

एचपी कंपनीने आपल्या पॅव्हिलॉन या मालिकेतील एक्स ३६० या कन्व्हर्टीबल प्रकारातील नवीन लॅपटॉपला भारतीय बाजारपेठेत उतरवण्याची अधिकृत घोषणा केली आहे.