क्षेपणास्त्रांसाठी फ्रान्ससोबत १ हजार कोटींचा करार !

संरक्षण मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
नवी : भारतीय भूदल आपल्या सामर्थ्यांत वाढ करण्याच्या तयारीत आहे. यासाठी फ्रान्सकडून अत्याधुनिक क्षेपणास्त्रे आणि रणगाडा विरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्रे विकत घेणार आहे. मिलान २-टी, असे या क्षेपणास्त्राचे नाव आहे. जवळपास ३ हजार क्षेपणास्त्रे विकत घेण्याचा तयारीत संरक्षण मंत्रालय आहे.

ट्रम्प-किम यांच्यात फेब्रवारी महिन्यात होणार भेट

वॉशिग्टंन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोग उन यांची भेट घेणार आहे. व्हाईटहाऊसच्या वतीने या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.
या घोषणेच्या आधी किम जोग यांच्या एक निकटवर्तीयाने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेते व्हिएतनामला भेटतील, असा अंदाज बांधला जात आहे. व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांची भेट घेणा-या खास व्यक्तीचे नाव किम याँग छोल आहे. ते उत्तर कोरियाचे मुख्य मध्यस्थ आहेत.

इंधन पाइपलाइनला आग; २० जणांचा होरपळून मृत्यू

प्रहार वेब टीम
मेक्सिकोः मध्य मेक्सिकोमधील भागात इंधन पाइपलाइनला गळती लागून लागलेल्या आगीत २० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर ५४ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज मेक्सिको शहरापासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या हिडाल्को राज्यात घडली आहे.
पाइपलाइनला छिद्र पाडून त्यातून इंधन चोरले जात होते. हे इंधन बादलीत भरले जात होते. याचवेळी स्फोट झाला आणि त्यानंतर आग भडकली. २० लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे, अशी माहिती हिडाल्गो राज्याचे गव्हर्नर ओमर फयाद यांनी स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली आहे.

#10yearchallenge डेटा कलेक्शनबद्दल फेसबुकने दिले ‘हे’ उत्तर!

नागोराव कराड : प्रहार वेब टीम
मुंबई : सोशल मीडियावर सध्या #10yearchallenge हा ट्रेंड व्हायरल होत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम अशा प्रत्येक ठिकाणी सामन्य व्यक्तीपासून सेलिब्रेटी पर्यंत प्रत्येकजण आपला १० वर्ष जुना आणि आताचा फोटो सोशल मिडीयावर अपलोड करीत आहेत. हा ट्रेंड सध्या सोशल मिडियावर जोरदार धुमाकुळ घालत आहे.