दारू दुकानाविरोधात महिलांचा एल्गार

– जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
नागपूर, २४ एप्रिल
गोरले लेआऊट येथील देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी नगरसेवक संदीप जोशी यांच्या पुढाकाराने गोरले लेआऊट येथील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या भागातील देशी दारूचे दुकान बंद करण्याची मागणी महिलांनी अनेकदा केली होती. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकार्‍यांशी भेटून महिलांनी आपले गार्‍हाणे मांडले.

बाळाच्या नावात शिव्या नकोत

रशियन संसदेचा आदेश
मॉस्को, २४ एप्रिल 
एकनाथ, ओम किंवा षण्मुग या अर्थाची रशियन भाषेतील नावे आता रशियन व्यक्तींना ठेवता येणार नाहीत. कारण अपत्यांची नावे आकडे, चिन्ह किंवा शिव्या असलेल्या शब्दांची नको, असा कायदा रशियाची संसद ड्यूमाने मंजूर केला आहे.
आकडे, शब्दांसहित आकडे, चिन्हे, उद्गार चिन्ह हे पालकांना आपल्या अपत्यांच्या नावांमध्ये घालता येणार नाहीत, असे या कायद्यात म्हटले आहे. तसेच अश्‍लील शब्द, पद आणि पदव्या यांचाही नावांमध्ये समावेश करता येणार नाही.

संत्रानगरीचे विश्‍वविक्रमवीर

– विष्णू मनोहर यांच्या विक्रमाच्या निमित्ताने
नागपूर, २४ एप्रिल
प्रख्यात शेफ विष्णू मनोहर यांच्या विश्‍वविक्रमाच्या निमित्ताने संत्रानगरीतील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर्सची आठवण झाली. गतस्मृतीत गेलेले हे अफलातून विक्रम सोशल नेटवर्किंग साईट्‌समुळे पुन्हा एकदा चर्चेत आले. विष्णू मनोहर यांनी ५३ तास मॅरेथॉन स्वयंपाक करण्याचा विक्रम केल्यानंतर व्हॉट्‌स अप आणि फेसबुकवर या विक्रमवीरांची नावे आणि त्यांच्या विक्रमांचीही चर्चा सुरू झाली.

मेट्रो कर्मचार्‍यांच्या कामकाज वेळेत बदल

– वाढत्या उकाड्यामुळे घेतला निर्णय
नागपूर, २४ एप्रिल
नागपूर मेट्रो रेल्वेचे वेगाने सुरू असलेले काम आणि त्यानुरूप वेळोवेळी घेतले जाणारे निर्णय नागपूरकरांसाठी कुतूहलाचाच विषय असतो. मात्र, नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित आणि जागतिक स्तरावरील वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणारी मेट्रोची यंत्रणा मानवी संवेदनांप्रतिही जागरूक आहे. शहरातील पारा सातत्याने ४४ ते ४६ अंशाच्या दरम्यान असल्याने ऊन लागण्यासारख्या घटनांसोबतच दैनंदिन कामातही उष्णतेच्या त्रासाने अडथळा निर्माण होऊ लागल्याने मेट्रो प्रशासनाने कार्यशैलीत आवश्यक ते निर्णय घेत नवा पायंडा पाडला आहे.