सुमारे १० कोटींना झाली रवींद्र जडेजाची विक्री!

बंगळुरू - आयपीएलच्या पाचव्या मोसमासाठी आज (शनिवार) येथे लिलावास सुरुवात झाली आहे. या लिलावात देश-विदेशातील १४४ क्रिकेटपटूंवर बोली लावण्यात येणार आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला आतापर्यंत झालेल्या लिलावात सर्वाधिक म्हणजे सुमारे १० कोटी रुपयांना चेन्नई सुपर किंग्जने विकत घेतले आहे. चौथ्या मोसमात आयपीएलमध्ये सहभागी झालेले कोटी टस्कर्सचे निलंबन आणि पुणे वॉरियर्स इंडियाचे मालक सहारा इंडियाने मालकी रद्द करण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे या लिलावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रॉयल गार्डेनिया हॉटेलमध्ये होत असलेल्या या लिलावात पुणे वॉरियर्सचे प्रतिनिधीही सहभागी झाले आहेत.

सहाराने काढला भारतीय संघाचा 'सहारा'

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रायोजक असलेल्या 'सहारा' इंडिया कंपनीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाबरोबर (बीसीसीआय) झालेल्या वादामुळे प्रायोजकत्व काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आयपीएलमधील पुणे वॉरियर्स संघाची मालकी रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

भारतीय क्रिकेट संघाचे सिलेक्टर्स मूर्ख - चॅपल

मेलबर्न - ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत भारतीय क्रिकेट संघाला मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे आजी आणि माजी खेळाडूंनी भारतीय क्रिकेटपटूंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपल यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीतील सदस्यांना मूर्ख असे संबोधले आहे. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज ब्रेट ली याने शुक्रवारी भारतीय क्रिकेटपटूंची मानसिकता खालावली असल्याचे म्हटले होते. आता चॅपल यांनी निवड समितीच्या सदस्यांना लक्ष्य केले आहे. चॅपल म्हणाले, ''सध्या सर्व संघ युवा खेळाडूंना संघात स्थान देत असताना, भारतीय संघ मात्र युवा खेळाडूंना संधी देत नाही.

भारताच्या पारड्यात अखेर यश

मेलबर्न - भारतीय संघ म्हणजे खराब क्षेत्ररक्षण असे समीकरण मांडणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला जबरदस्त धक्का देणारी कामगिरी भारतीय तरुण खेळाडूंनी मेलबर्न क्रिकेट मैदानावर केली. अफलातून चपळ क्षेत्ररक्षण करताना भारतीय खेळाडूंनी चार ऑसी फलंदाजांना धावबाद केले. धावा वाचवण्यापेक्षा फलंदाजांना बाद करायची योजना कामाला आली आणि सतत फलंदाज बाद होत राहिल्याने यजमान संघाचा धावफलक दौऱ्यावर पहिल्यांदा फुलताना दिसला नाही. 131 धावांत संपूर्ण संघाला बाद केल्यावर आवश्‍यक धावा 19.4 षटकांत करून भारतीय संघाने तब्बल 40 दिवसांनंतर यश अनुभवले. गौतम गंभीरने नाबाद अर्धशतक करून संघाला विजयाचा मार्ग दाखवला.

नवी फोर्स इंडिया कार अवतरली!

लंडन - सहारा फोर्स इंडिया फॉर्म्युला वन संघाच्या नव्या मोसमासाठी सज्ज झालेल्या कारचे इंग्लंडमधील सिल्व्हरस्टोन येथे अनावरण झाले. पॉल डी रेस्टा आणि निको हुल्केनबर्ग या दोन ड्रायव्हरनी कारवरील रेशमी पडदा उघडला आणि "व्हीजेएम05' या कारचे उपस्थितांना पहिले दर्शन झाले! राखीव ड्रायव्हर ज्यूल्स बियांची हा सुद्धा कारपाशी उपस्थित होता. तांत्रिक संचालक अँड्य्रू ग्रीन यांच्या मार्गदर्शनाखाली बनविण्यात आलेली ही दुसरी कार आहे. गेल्या मोसमात संघांच्या गुणतक्‍त्यात (कन्स्ट्रक्‍टर्स चॅंपियनशिप) फोर्स इंडियाने सहावे स्थान मिळविले होते. त्यांनी मातब्बर संघांना चांगली झुंज दिली होती.

कार्तिकेयनच असणार "एचआरटी'चा ड्रायव्हर

माद्रिद - आगामी फॉर्म्युला वन जागतिक मालिकेत भारताचा नरेन कार्तिकेयन हिस्पॅनीया रेसिंग टीमचे (एचआरटी) प्रतिनिधित्व करेल. पेड्रो डी ला रोसा त्याचा सहकारी असेल. 16 मार्च रोजी मेलबर्नवरील अल्बर्ट पार्क सर्कीटवर ऑस्ट्रेलियन ग्रांप्रीचा नवा मोसम सुरू होत आहे. "एचआरटी' हा स्पेनचा संघ असून, कार्तिकेयनचा हा त्यांच्यासह दुसरा मोसम आहे. गेल्या मोसमात पहिल्यावहिल्या भारतीय ग्रांप्रीमध्ये कार्तिकेयन याने याच संघाचे प्रतिनिधित्व केले होते. मायदेशातील ग्रांप्रीमध्ये सहभागी झालेला तो एकमेव भारतीय ड्रायव्हर होता. पुढील आठवड्यात "एचआरटी'चे "जेरेझ'वर "टेस्टिंग' सुरू होईल. तेथे पेड्रो सहभागी होईल.

दुलिप लढती आजपासून

चेन्नई - दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य लढतींना शनिवारपासून प्रारंभ होत आहे. या लढती चार दिवसांच्या असतील. गतविजेत्या दक्षिण विभागाची घरच्या मैदानावर मध्य विभागाशी लढत होत आहे तर दिल्लीत उत्तर आणि पूर्व यांच्यात लढत असेल. पूर्वेने पश्‍चिमेला हरविले. या लढती अभिनव मुकुंद, एस. बद्रिनाथ, दिनेश कार्तिक, विनीत सक्‍सेना, रॉबिन उथप्पा अशा खेळाडूंसाठी महत्त्वाच्या असतील. गोलंदाजीत यो महेश, ऋतुराज सिंग, पंकजसिंग अशा खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष असेल.

न्यूझीलंडचा झिंबाब्वेवर सहज विजय

ड्युनडिन - मार्टिन गुप्टीलच्या अर्धशतकानंतर रॉब निकोल आणि काईल मिल्सच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये झिंबाब्वेवर 90 धावांनी मात केली. तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये न्यूझीलंडकडे 1-0 अशी आघाडी आहे. झिंबाब्वेचा कर्णधार ब्रॅंडन टेलर याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. शिंगी मसाकत्झा याने चार गडी बाद करत न्यूझीलंडला नियमित अंतराने धक्के दिले. सलामीवीर गुप्टीलने 105 चेंडूंत 70 धावा केल्या. त्याला नॅथन मॅकलम (30), केन विल्यमसन (35) आणि अँड्य्रू एलिस (33) यांनी उपयुक्त योगदान दिल्याने न्यूझीलंडला 248 धावांची मजल मारता आली.

भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

मेलबर्न - पहिल्या ट्‌वेंटी-20 सामन्यात झालेल्या दारुण पराभवाचा वचपा काढीत भारताने आज (शुक्रवार) ऑस्ट्रेलियावर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळविला. दुसऱ्या ट्‌वेंटी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांचा एकही फलंदाज खेळपट्टीवर फार काळ टिकू शकला नाही.

इंग्लंडने उडविला पाकिस्तानचा ९९ धावांत खुर्दा

दुबई- इंग्लंड व पाकिस्तानदरम्यान तिसरा आणि शेवटच्या कसोटी सामना होत असून, इंग्लंडने पाकिस्तानचा 99 धावांमध्ये आज (शुक्रवार) खुर्दा उडविला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्यांना एका मागून एक धक्के दिले. इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॅंडने 36 धावांत 4 तर जेम्स अँडरसनने 35 धावांत 3 गडी बाद केले आहेत.

भारतीय खेळाडूंची मानसिकता खालावली- ली

मेलबर्न- भारतीय क्रिकटपटूंची मानसिकता खालावली आहे, असे वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने दुसऱया ट्वेंटी-20 सामन्यापूर्वी केले. ऑस्ट्रेलियाने भारताला कसोटी बरोबरच ट्वेंटी-20 मधील पहिल्या सामन्यात हरविले आहे. यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतीय संघावर शाब्दिक हल्लाही करू लागले आहेत. भारतीय संघाची मानसिकता खालावल्यामुळे आम्ही त्याचा फायदा घेत आहोत, असेही ब्रेट लीने म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पूर्ण ताकदीनिशी लढत असल्यामुळेच आम्हाला विजय मिळत असल्याचे त्याने म्हटले आहे.

अली यांच्या प्रशिक्षकांचे निधन

फ्लोरिडा - महान मुष्टियोद्धा महंमद अली यांचे प्रशिक्षक अँजेलो डुंडी (90) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. अली यांच्या कारकिर्दीतील बहुतांश कालावधीत डुंडी हेच प्रशिक्षक होते. अली यांच्याशिवाय डुंडी यांनी जॉर्ज फोरमन, स्युगर रे लिओनार्ड यांच्यासह 15 जागतिक विजेत्यांना प्रशिक्षण दिले होते. जवळपास सहा दशके मुष्टियोद्‌ध्यांना प्रशिक्षण देणाऱ्या डुंडी यांना 1994मध्ये आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध "हॉल ऑफ फेम'द्वारे सन्मानित करण्यात आले होते.

'आयसीसी'चा चेहरामोहरा बदलणार

लंडन - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) अध्यक्षपदाचे अधिकार कमी करून कार्याध्यक्षपद निर्माण करण्याचे ठरविले आहे. याशिवाय आगामी काळात अनेक आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत. लॉर्ड वुल्फ यांनी भारतीय न्यायमूर्ती मुकुल मुद्‌गल यांच्या साथीत बनविलेल्या अहवालात अनेक शिफारशी करण्यात आल्या असून, त्यामुळे शिखर संघटनेचा चेहरामोहराच बदलण्याची अपेक्षा आहे. हा अहवाल तयार करताना क्रिकेटपटू संघटना, "आयसीसी'चे माजी अध्यक्ष आणि पत्रकारांशीही चर्चा करण्यात आली. कार्यकारिणीचे स्वातंत्र्य वाढविणे आणि "बड्या' देशांचे त्यावरील वर्चस्व कमी करण्याचा हेतू आहे.

'किंग्ज इलेव्हन पंजाब'ची तयारी सुरू

नवी दिल्ली - "आयपीएल-5'मध्ये लक्षणीय यश मिळविण्यासाठी "किंग्ज इलेव्हन पंजाब'ने विशेष स्पर्धेचे आयोजन करून प्रशिक्षणाला सुरवात केली आहे. गेली दोन वर्षे "किंग्ज इलेव्हन पंजाब' या स्पर्धेचे आयोजन करत आहे. यात चार संघांमध्ये एकूण 70 खेळाडूंनी भाग घेतला आहे. येत्या चार फेब्रुवारीपासून मोहाली आणि चंडिगढ येथील स्टेडियमवर या स्पर्धेची सुरवात होईल.

क्रिकेटमधील बदलांचे स्वागतच करा : हसी

मेलबर्न - "स्वीच हीट' हा फटका क्रिकेटची आकर्षकता वाढवणारा आहे त्याचे सर्वांनी स्वागतच केले पाहिजे. अशा नवनवीन कल्पनांमुळेच क्रिकेट रंगतदार होत असते आणि म्हणूनच त्यावर बंदी घालण्याची चर्चा करू नये, असे मत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू डेव्हिड हसीने व्यक्त केले. बुधवारी झालेल्या भारताविरुद्धच्या तिसऱ्या षटकामध्ये ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने "स्वीच हीट'वर षटकार खेचला होता. त्यावरून या फटक्‍याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. "स्वीच हीट' : - 2008 मध्ये इंग्लंडच्या केविन पीटरसनने केला प्रथमच वापर - गोलंदाज चेंडू टाकण्याआधी किंवा नंतर फलंदाज "ग्रीप' बदलतो.