शाही थाटात रितेश-जेनेलिया विवाहबद्ध! (फोटो)

मुंबई- अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जेनेलिया हे आज (शुक्रवार) ग्रॅंड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये दुपारी 12 च्या सुमारास विवाहबद्ध झाले. शाही विवाहाला चित्रपटसृष्टीबरोबरच राजकीय नेतेही उपस्थित होते. रितेशची वरात ग्रॅंड हयाच्या मैदानातून दिमाखात वरात काढण्यात आली होती.

कर्जतच्या घरात 'पॉझिटिव्ह ऊर्जा'- जुई गडकरी

"तुजवीण सख्या रे'मधील अगदी मॉडर्न मुलगी आणि आता "पुढचं पाऊल'मधील टिपिकल गृहिणी अशा परस्परविरोधी भूमिका लीलया साकारणाऱ्या जुई गडकरीने रसिकांच्या मनात आपले स्थान भक्कम केले आहे. उच्चविद्याविभूषित असलेली जुई सध्या मुंबईत राहत असली तरी ती मूळ कर्जतची. तिथे त्यांचा मोठा वाडा होता.

लग्नापूर्वीच करीना कपूर गर्भवती?

मुंबई - बॉलिवुडमध्ये सध्या दबक्या आवाजात चर्चा चालू आहे, ती करीना कपूरची. अलिकडेच एका प्रसिद्ध दैनिकाने करीना एका विमानतळावर आलेली असताना, एका दैनिकाच्या छायाचित्रकाराने तिचे छायाचित्र टिपले. आपली छाबी कोणी टिपत असल्याची तिला कल्पनाच नव्हती. मात्र ते प्रसिद्ध झाल्यापासूनच दबक्या चर्चेला उधाण आले आहे.

अनंत महादेवनचा 'लाईव्ह' (व्हिडिओ)

अनंत महादेवन आता घेऊन येतायत स्टेईंग अलाईव्ह हा सिनेमा. ज्यात ते स्वतः दिग्दर्शनासोबतच अभिनयही करणार आहेत. हा सिनेमा म्हणजे एक डार्क कॉमेडी असेल. व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा एकाला मरणाची भीती आहे, तर दूसऱ्याला त्याची सवयच झाली आहे. एका रुग्णालयात या दोन्ही पात्रांची भेट होते. एक आहे पत्रकार तर दुसरा अंडरवर्ल्ड डॉन. या दोघांची ओळख होते रुग्णालयातील बेडवर, जिथे हे दोघे एकाच आजाराशी लढत असतात. मरणाला जीवन लाभले यावर स्टेईंग अलाईव्ह हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय अनंत महादेवन यांनी. या डार्क कॉमेडीत अनंतला साथ मिळाली आहे सौरभ शुक्लाची.

रणदीप दिसेल जिग्लोच्या भूमिकेत (व्हिडिओ)

देसी बॉईजमध्ये अक्षय आणि जॉनने मेल स्ट्रिपर्सची भूमिका केली होती. आता बॉलिवुडमध्येही अशा भूमिकांना चांगलाच वाव मिळू लागलाय. बॉलिवूडचा आणखी एका स्टार, असा बोल्ड रोल करण्यासाठी सज्ज झाला आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा देसी बॉईज या सिनेमात अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमने मेल स्ट्रिपर्सची भूमिका केली होती. &nbsp आता रणदीप हूडाही काहीशा अशाच भूमिकेत दिसणार आहे. मात्र, रणदीप हा जॉन आणि अक्षयच्या एक पाऊल पुढे गेलाय. कारण रणदीप आपल्या आगामी सिनेमात मेल प्रॉस्टिट्यूटची म्हणजेच जिग्लोची भूमिका साकारणार आहे. सिनेमाचं नाव आहे 'मायानगरी'. त्याचं दिग्दर्शन करताहेत सतीश कौशिक.

भारत-पाकिस्तान बॉर्डरवर चित्रीकरणासाठी राकेश मेहरा उत्सुक

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील मंडळी भारताबरोबरच परदेशातही चित्रीकरणासाठी पोहोचलेली आहे. कित्येक चित्रपटात स्वीत्झर्लंड, लंडन, इटाली, अमेरिका, दुबई, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका असे विविध देश आपण पाहिलेले आहेत. पाकिस्तानातही काही चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. परंतु अलीकडच्या काळात तेथील एकूणच कायदा-सुव्यवस्था पाहता कोणताही चित्रपट निर्माता-दिग्दर्शक पाकिस्तानमध्ये चित्रीकरण करण्याचे धाडस दाखवीत नाही. परंतु राकेश ओमप्रकाश मेहरा आपल्या आगामी "भाग मिल्खा भाग' या चित्रपटाचे चित्रीकरण भारत-पाकिस्तान बॉर्डरवर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

कॅनव्हासवर उमटली "ग्रीन सांगली' (फोटो फिचर)

सांगलीत 26 जानेवारी रोजी "सकाळ'' आणि कलापुष्प संस्थेतर्फे खुली राज्यस्तरिय प्रत्यक्ष निसर्गचित्रण स्पर्धा झाली. "सकाळ'ने यावर्षी "चला झाडे लावू या' मोहिम राबवली. त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर याच मोहिमेचा एक भाग म्हणून "ग्रीन सांगली' या विषयावर आधारित ही स्पर्धा घेण्यात आली.

मृणाल दिग्दर्शकाच्या भूमिकेत

मुंबई -मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत गेली कित्येक वर्षे काम करणारी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आता वेगळी इनिंग खेळणार आहे. "प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं' या चित्रपटाद्वारे ती दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकत आहे. "शेजारी शेजारी', "लपंडाव', "क्षण' या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या सचिन पारेकरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. बदलत चाललेल्या लग्नसंस्थेवर भाष्य करणारा हा चित्रपट असेल. चित्रपटाची कथा स्वतः मृणालने लिहिली आहे, तर पटकथा-संवाद मनीष रोकडे यांचे आहेत. वयाच्या सोळाव्या वर्षापासून मृणालने अभिनयात पाऊल ठेवले. त्यानंतर विविध भूमिकांनी तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

"अग्निपथ'चा दक्षिणेत रिमेक?

मुंबई - "अग्निपथ'ला मिळालेल्या यशामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून त्याच्या रिमेकसाठी विचारणा होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूडकडून दक्षिणेकडील अनेक चित्रपटांचा रिमेक बनविला जात आहे. त्याच्या हक्कांवरून दाक्षिणात्य निर्मात्यांनी बॉलिवुडला नेहमीच पाण्यात पाहिले आहे.

किंग खान - कुंदर यांचे अखेर "पॅच अप'

मुंबई - "अग्नीपथ' चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी संजय दत्त याने दिलेल्या पार्टीत, फराह खानचा पती शिरीष कुंदर याने शाहरुख खान याला उद्देशून अपशब्द वापरले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या किंग खानने त्याला थप्पड मारली होती. मंगळवारी संध्याकाळीच त्यांच्यातील वाद संपला असल्याचे, त्या दोघांचा मित्र साजिद नडियादवाला याने सांगितले. या घटनेनंतर पार्टी संपल्यावर शाहरुख खानच्या घरी जाऊन साजिद आणि शिरीष यांनी हा वाद मिटविला. या संदर्भात फराह खानशी बोलताना फराह म्हणाली, "ओम शांती ओम' चित्रपटाच्या दरम्यान देखील त्या दोघांचे संबंध चांगले होते. त्यांच्या "पॅच अप'मुळे फराहनेही आनंद व्यक्त केला आहे.

'डोंबारी'द्वारे मिलिंद शिंदेची मराठीत सिल्व्हर ज्युबिली

मुंबई - 'ती फुलराणी', 'झुलवा', 'कथा अरुणाची' आदी नाटकांबरोबरच 'नटरंग', 'पारध' अशा काही चित्रपटांत काम करणारा अभिनेता मिलिंद शिंदे याचा 'डोंबारी' हा 25 वा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. 'ऐश्‍वर्या मुव्हिज'ची निर्मिती असलेल्या या चित्रपटात तो डोंबाऱ्याची भूमिका साकारत आहे. मूळचा नगरचा असलेल्या मिलिंद शिंदेने दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनय तसेच दिग्दर्शनाचे धडे गिरविले आहेत. सन 2003 मध्ये आलेला गजेंद्र अहिरे दिग्दर्शित "नॉट ओन्ली मिसेस राऊत' हा त्याचा पहिला मराठी चित्रपट. त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलेच नाही.

मेहनत केल्यास कोठे जाण्याची गरज नाही, फळ मिळतेच!

औरंगाबाद - ""मेहनत केल्यास तुम्हाला कोठे जाण्याची गरज नाही. तो फळ देत राहील. मेहनत करा. फळाची इच्छा ठेवा. मात्र, स्वतः देव होण्याचा प्रयत्न करू नका... देवावर प्रचंड विश्‍वास तरीही कष्टावर श्रद्धा असणारे कैलास खेर... सुफियाना अंदाजाची गायकी असलेले कैलास खेर... अशी अनेक रूपे उलगडत गेली त्यांनी "सकाळ'ला दिलेल्या "एक्‍सक्‍ल्युझीव्ह' मुलाखतीत! रविवारी (ता. 29) मध्यरात्री तब्बल अर्धा ते पाऊण तास चाललेल्या या मुलाखतीमध्ये गप्पाही रंगल्या. वेरूळ-अजिंठा महोत्सवातील सादरीकरणानंतर कैलास खेर यांचा चांगलाच मूड लागला होता. औरंगाबादवर ते जाम खुश होते.

'फिल्मफेअर'मध्ये 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' सरस

मुंबई -&nbsp 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हा चित्रपट 57व्या आयडिया फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये सात पुरस्कार मिळवत सरस ठरला. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट सहअभिनेता, सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा समीक्षकांचा पुरस्कार, सर्वोत्कृष्ट संवाद व सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, असे सात पुरस्कार या चित्रपटाला मिळाले. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार रणबीर कपूरला "रॉकस्टार'मधील भूमिकेसाठी मिळाला, तर "डर्टी पिक्‍चर'मधील भूमिकेसाठी विद्या बालनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. "रॉकस्टार'साठीच ए. आर.