उद्योगांसाठीचे भारनियमन रद्द
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 19:40पुणे - थंडीमुळे मागणी कमी झाल्याने आणि नवीन प्रकल्पांतून मिळणाऱ्या विजेमुळे राज्यातील उद्योगांसाठी करण्यात येणारे भारनियमन रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय "महावितरण'ने घेतला आहे. येत्या डिसेंबरपर्यंत पुरेशी वीज उपलब्ध झाल्यास राज्य भारनियमनमुक्त करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा "महावितरण'मधील सूत्रांनी केला आहे. मात्र, हा निर्णय उद्योगांसाठी चांगला असला, तरी तो कायमस्वरूपी लागू करावा, अशी अपेक्षा उद्योग क्षेत्राने व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टच्या सुमारास आंध्र प्रदेशातील तेलंगण आंदोलन आणि ओरिसात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्याला वीज उत्पादनासाठी मिळणाऱ्या कोळशाचे प्रमाण घटले होते.
...अन् त्यांचे पैसे परत मिळाले!
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 19:55पुणे - चांगल्या परताव्याची हमी देऊन सात मूकबधिरांकडून एकाने सुमारे 12 लाख रुपये गोळा केले... एका वर्षात पैसे परत करण्याची त्याने हमीदेखील दिली होती... पाच वर्षे झाली तरी पैसे परत मिळाले नाहीत. अखेर त्या युवकांनी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्याकडे धाव घेतली अन् सर्वांना पैसे परत मिळाले. मूकबधिर असले तरी त्यांच्या भाषेत त्यांनी पोलिसांचे कौतुक केले. मूकबधिर असलेले सातही जण छोटे-मोठे व्यवसाय करतात. मूकबधिर असलेल्याच एका व्यक्तीने त्यांना खानापूरमधील त्याच्या जागेवर कारखाना उभारतो आहे, असे सांगितले.
येरवड्यात टिंगरे, चलवादी कोट्यधीश
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 19:40येरवडा : महापालिका निवडणुकीसाठी येरवडा भागातील उमेदवारांनी प्रतिज्ञापत्राद्वारे आपली संपत्ती जाहीर केली असून, त्यात अनेकजण कोट्यधीश असल्याचे स्पष्ट झाले. धानोरीच्या (प्रभाग 1) उमेदवार नगरसेविका रेखा टिंगरे व त्यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांच्याकडे सुमारे वीस कोटी रुपयांची संपत्ती आहे. नगरसेवक सुनील विजयराव टिंगरे यांच्याकडे सुमारे सहा कोटी रुपयांची संपत्ती आहे. कॉंग्रेसचे सुनील यशवंत टिंगरे यांच्याकडे एक कोटी 40 लाख रुपयांचे दागिने तसेच धानोरी येथे अडीच कोटींची जागा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बॉबी ऊर्फ अनिल वसंतराव टिंगरे यांच्याकडे रोख दीड ते दोन कोटी रुपयांची संपत्ती आहे.
प्रचारातही महिला"राज'
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 19:55पुणे - आगामी महापालिका निवडणुकीत 50 टक्के महिला उमेदवार असल्याने प्रचारातही महिलांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. महिला उमेदवार आपल्याबरोबर महिलांना घेऊन जाण्यास प्राधान्य देत आहेतच. त्याचबरोबर पुरुष उमेदवारही घराघरांतील महिला मतदारांशी संपर्क साधण्यासाठी महिला प्रचारकांना पसंती देत आहेत. यंदा प्रचारामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. पक्षाची उमेदवारी निश्चित झालेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षातील इतर महिला जात आहेत पण ज्यांची उमेदवारी अजून पक्षाकडून घोषित झाली नाही किंवा ज्या अपक्ष लढणार आहेत, त्या मैत्रिणी, नात्यातील महिलांना बरोबर घेऊन प्रचार करत आहेत.
बोपोडी-औंधला करोडपतींमध्ये लढत
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 19:55पुणे - बोपोडी-औंध, पाषाण परिसरातील कोट्यवधींचे मालक असणाऱ्या उमेदवारांमध्ये यंदाची महापालिका निवडणूक रंगणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान नगरसेवक श्रीकांत पाटील 13 कोटी, मनसेचे शहराध्यक्ष प्रकाश ढोरे तीन कोटी, कॉंग्रेसचे पुणे विद्यापीठ प्रभागातील उमेदवार कैलास गायकवाड 16 कोटी, प्रमोद निम्हण साडेचार कोटी, अशी या परिसरातील उमेदवारांची मालमत्ता आहे.
एआयएसएसएमएसच्या संघाला "आतिथ्य 2012'चे विजेतेपद
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 19:40पुणे - आदरातिथ्य अन् पाककौशल्यात वर्चस्व राखत "आतिथ्य 2012' स्पर्धेच्या विजेतेपदाचा करंडक एआयएसएसएमएस संस्थेच्या कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग टेक्नॉलॉजीने शुक्रवारी पटकाविला. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीतर्फे या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. देशभरातील 22 महाविद्यालयांचे संघ त्यामध्ये सहभागी झाले. "सकाळ' या स्पर्धेचा माध्यम प्रायोजक होता.
महायुतीतही रिपब्लिकन पक्षाची फरफट
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 19:55पुणे - कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी शिवसेना- भारतीय जनता पक्षाबरोबर जाणाऱ्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाची "महायुती'तही फरफट होऊ लागली आहे. अमरावती वगळता अन्य नऊ महापालिकांमधील कार्यकर्त्यांनी "अपेक्षित जागा मिळाल्याच नाहीत' अशी तक्रार करून महायुतीचा फेरविचार करण्याची मागणी केली. आठवले यांच्याकडे कार्यकर्त्यांच्या तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडत असला, तरी त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना टोकाची भूमिका घेऊ नका, असा सल्ला दिला आहे. "उद्या (शनिवारी) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे.
शंभर पोलिसांनी केला गोळीबाराचा सराव
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 19:55पुणे - निवडणुकांपूर्वी शहर पोलिस दलातील सर्व अधिकाऱ्यांनी गोळीबाराचा सराव पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त मीरा बोरवणकर यांनी दिले आहेत. वडाची वाडी येथे असलेल्या "फायरिंग रेंज'मध्ये हा सराव सुरू असून पाच दिवसांत सुमारे शंभर अधिकाऱ्यांनी तो पूर्ण केला आहे. पोलिस उपायुक्त (मुख्यालय) शिरीष सरदेशपांडे म्हणाले, ""पोलिस अधिकाऱ्यांना दर वर्षी गोळीबाराचा सराव करण्यासाठी संधी दिली जाते.
राजलक्ष्मी भोसलेंकडे 26 कोटींची "लक्ष्मी'
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 19:40पुणे - गेल्या पाच वर्षांत शहराने पाहिलेल्या दोन महापौरांपैकी एकाकडे केवळ सव्वासहा हजार रुपये असले, तरी त्यापूर्वीच्या महापौर राजलक्ष्मी भोसले यांची मालमत्ता आहे तब्बल 26 कोटींची. भोसले यांच्याकडे आठ चारचाकी वाहनांमध्ये रेंज रोव्हर, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, इनोव्हा यांसारख्या महागड्या गाड्या आहेत. राष्ट्रवादीची सत्ता आल्यावर शहराच्या महापौर होण्याचा मान राजलक्ष्मी भोसले यांनी मिळवला. भोसले या यंदा काळेपडळ-महंमदवाडी प्रभागातून निवडणूक लढवत आहेत. निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली मालमत्ता जाहीर केली आहे.
काही प्रभागांतील राजकीय समीकरण बदलणार
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 19:55पुणे - जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल न करणे, शपथपत्रावर स्वाक्षरी नसणे अशा विविध कारणांमुळे पन्नासहून अधिक उमेदवार महापालिका निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर फेकले गेले आहेत. चार जणांच्या अर्जांबाबतचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आल्याने त्यांच्यावर टांगती तलवार आहे. अर्जच अवैध ठरल्यामुळे काही प्रभागांतील राजकीय चित्र बदलले आहे. कोथरूड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभागातील एकही उमेदवार बाद झाला नाही, तर संगमवाडी क्षेत्रीय कार्यालयात छाननीचे काम उशिरापर्यंत सुरू होते. महापालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी करण्याची प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाली.
दोन माजी महापौरांना डावलले
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 19:40पुणे - विरोधी पक्षनेते आबा बागूल यांचे चिरंजीव अमित बागूल, अनिता जाधव, शिवसेनेचे मिलिंद काची व सुनंदा गडाळे, नगरसेविका लता राजगुरू, शकिला मुख्तार शेख आदींची उमेदवारी निश्चित झाली. बंडखोरी टाळण्यासाठी कॉंग्रेसची अंतिम यादी आता उद्या (शनिवार) सकाळी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. वादग्रस्त प्रभागांच्या नावांची यादी निश्चित करण्यासाठी गुरुवारी रात्री प्रदेश कॉंग्रेसच्या संसदीय समितीसोबत पुण्यातील कॉंग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. बैठकीस शहराध्यक्ष अभय छाजेड, समन्वय समितीचे अध्यक्ष शरद रणपिसे, कमल व्यवहारे आदी उपस्थित होते. उरलेल्या प्रभागांची यादी या वेळी सादर करण्यात आली.
प्राप्तिकर कार्यालयाला ठकविणाऱ्याविरुद्ध गुन्हा
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 19:40पुणे - स्वारगेट येथील प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयातून धनादेश चोरून वेगवेगळ्या नावाने बॅंकांमधून परस्पर रक्कम काढणाऱ्या गिरीश ऊर्फ शैलेश ऊर्फ लालचंद पटेल (रा. 1523, शुक्रवार पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्तिकर अधिकारी जलजा सुभाष जाधव यांनी या बाबत पोलिसांकडे फिर्याद दिली. पटेलने प्राप्तिकर कार्यालयातून धनादेश चोरून अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करीत बॅंकेतून दोन लाख 13 हजार रुपये परस्पर काढून घेतले. एप्रिल ते जून 2011 या कालावधीत हा गैरप्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. निरीक्षक एस. एन. कांबळे तपास करीत आहेत.
हायटेक प्रचार बनला नागरिकांसाठी डोकेदुखी
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 19:40वाघोली - विकसित तंत्रज्ञानामुळे सध्या निवडणूक प्रचार हायटेक झाला असला तरी हाच हायटेक प्रचार मतदारांची डोकेदुखी बनू लागला आहे. त्यातच रेकॉर्डिंग कॉलमुळे मोबाईलधारक हैराण झाले आहेत. पूर्वी घोंगड्या बैठका, सभा, भिंतीवरील जाहिराती, पदयात्रा, फिरत्या वाहनातून स्पीकर आदी माध्यमांतून प्रचार केला जात होता. यानंतर यामध्ये हळूहळू बदल होत गेला. प्रचारासाठी प्रसारमाध्यमांचा वापर होऊ लागला. मात्र खर्चासाठी मर्यादा आल्याने प्रसारमाध्यमांचा वापर कमी झाला. त्यामुळे मोबाईल व इंटरनेटद्वारा प्रचारास सुरवात झाली.
पिंपरीत राष्ट्रवादीच्या यादीवर आझम पानसरेंचे वर्चस्व
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 19:40पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने निश्चित केलेल्या बहुसंख्य उमेदवारांत राज्य ग्राहक सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि पक्षाचे शहराध्यक्ष आझम पानसरे यांनी शिफारशी केलेल्या 47 कार्यकर्त्यांची वर्णी लागल्याचे समजते. अन्य उमेदवारी मिळालेल्यांमध्ये महापौर योगेश बहल, आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप आणि अण्णा बनसोडे यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः लक्ष घालून व सर्व गटातटांचा समतोल राखण्याचा प्रयत्न करून उमेदवारीचे वाटप केले, असे सांगण्यात आले.
परीक्षेतील अपयशाने विद्यार्थ्याची आत्महत्या
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 19:55सोमेश्वरनगर - येथील श्री सोमेश्वर डिप्लोमा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने परीक्षेत आलेल्या अपयशामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली. द्वितीय वर्ष मेकॅनिकल शाखेत प्रथम सत्राच्या दोन विषयांत नापास झाल्याचा ऑनलाइन निकाल काल त्याला प्राप्त झाला होता. अनिकेत जालिंदर हांडे (वय 19, रा. रिसे, ता. पुरंदर) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. आज दुपारी हा प्रकार उजेडात आला. अनिकेतला मागील वर्षी केंद्रीय प्रवेशपद्धतीनुसार डिप्लोमाच्या मेकॅनिकल शाखेला प्रवेश मिळाला होता. तो करंजेपूल येथील बस स्थानकासमोरील डॉ. गजानन सावळकर यांच्या खोलीमध्ये सहकाऱ्यांसह भाडोत्री पद्धतीने राहात होता.
