मनसेच्या आशा पाटील यांचा अर्ज जात प्रमाणपत्राअभावी बाद

ठाणे - ठाणे महापालिकेच्या उमेदवारांच्या अर्ज छाननीत एकूण 42 अर्ज बाद झाले. यात मनसेच्या प्रभाग क्रमांक 23 मधील उमेदवार आशा सुरेश पाटील यांचा समावेश आहे.&nbsp मनसेच्या आशा पाटील या प्रभाग क्रमांक 23 मधून निवडणूक लढवित आहेत. हा प्रभाग ओबीसी महिला गटासाठी आरक्षित आहे. त्यासाठी ओबीसी जात प्रमाणपत्र आवश्‍यक होते. आज झालेल्या छाननीत त्यांच्याकडे ते प्रमाणपत्र नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. याशिवाय एकूण 42 उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले. त्यामध्ये डमी, अपक्ष अशा उमेदवारांचा समावेश आहे. मनसेचा उमेदवार बाद झाल्यामुळे शिवसेनेच्या गोटात मात्र आनंदाचे वातावरण आहे.

मंत्र्यांची भांडणे मुख्यमंत्र्यांनीच रोखावीत

विलासराव देशमुख&nbsp - श्रेष्ठींनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घ्यावा मुंबई - ""मंत्रिमंडळातले वाद इतक्‍या टोकाला पहिल्यांदाच गेले असावेत. ही मंडळी बैठकीत एकमेकांशेजारी बसतील का, परस्परांचे चेहरे पाहायला तयार होतील का? अशीच स्थिती आली आहे.

राष्ट्रवादी स्वबळावर उभा राहिलेला पक्ष

मुंबई - ""अन्य पक्षांतून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नेते प्रवेश करत आहेत.

कॉंग्रेसविरुद्धची मोहीम थांबवा

मुंबई - जिल्हा परिषद निवडणुकीच्या आखाड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी कॉंग्रेस नेत्यांच्या विरोधात उघडलेली मोहीम थांबविण्याचा आदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जाहीर पत्रकार परिषदेत दिला. यामुळे कॉंग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशा विकोपाला गेलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी भवन येथे केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद आज आयोजित करण्यात आली होती. ""बहुतांश जिल्ह्यांत कॉंग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष होत आहे.

"राष्ट्रवादी' स्वबळावर उभा राहिलेला पक्ष

मुंबई - ""अन्य पक्षांतून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नेते प्रवेश करत आहेत. या प्रवेशाला फोडाफोडी किंवा घरफोडी म्हणत नाहीत,'' असे स्पष्ट करीत ""राष्ट्रवादी कॉंग्रेस हा स्वतःच्या पायावर मेहनतीने उभा राहिलेला पक्ष आहे,'' असा टोला पक्षाचे प्रमुख आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला.

मंत्र्यांची भांडणे मुख्यमंत्र्यांनीच रोखावीत

विलासराव देशमुख ः श्रेष्ठींनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घ्यावा मुंबई - ""मंत्रिमंडळातले वाद इतक्‍या टोकाला पहिल्यांदाच गेले असावेत. ही मंडळी बैठकीत एकमेकांशेजारी बसतील का, परस्परांचे चेहरे पाहायला तयार होतील का? अशीच स्थिती आली आहे.

"फेसबुक'वरील "चेहरे' दुप्पट

मुंबई - फेसबुकवरील मंथली ऍक्‍टिव्ह युजर्स असलेल्या भारतीयांची संख्या 2011च्या डिसेंबरअखेर दुप्पट झाल्याची माहिती फेसबुकने नुकतीच जाहीर केली. 2010 मध्ये ही संख्या सुमारे दोन कोटी 30 लाख होती. अमेरिकेच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. फेसबुकच्या पाचशे कोटींच्या शेअर विक्रीच्या घोषणेनंतर भारत हाच भविष्यासाठीचा मुख्य स्त्रोत असल्याचे या वेळी स्पष्ट केले आहे.&nbsp &nbsp फेसबुकच्या गुंतवणुकीच्या "रडार'वर सध्या भारतच आहे. चीनमध्ये फेसबुकवर बंदी असल्याने तिथे फेसबुकने फोकस केलेला नाही.

"परे'वर उद्या ऐतिहासिक मेगाब्लॉक

मुंबई - पश्‍चिम रेल्वे मार्गावर डीसी ते एसी रूपांतरणासाठी रविवारी (ता.5) सकाळी 10.30 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत सहा तासांचा मेगाब्लॉक करण्यात येणार आहे. या काळात अंधेरी ते चर्चगेट दरम्यानची उपनगरी वाहतूक बंद असेल. दुसरीकडे, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मेगाब्लॉक नसल्याने प्रवाशांचा येता रविवार सुखाचा जाईल.&nbsp पश्‍चिम रेल्वे मार्गावरील जुनी डीसी (डायरेक्‍ट करंट) यंत्रणा रविवारी इतिहासजमा होऊन एसी तंत्रज्ञानावरील यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे परेचा प्रवास जलद होणार असून विजेची मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. विलेपार्ले-चर्चगेट स्थानकादरम्यान हे डीसी-एसी परिवर्तन होणार आहे.

हारून रशीद नाईक हा इंडियन मुजाहिदीनचा

मुंबई - तिहेरी बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या हारून रशीद नाईक इंडियन मुजाहिदीनच्या कोअर कमिटीचा सदस्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. "लष्कर ए तैय्यबा'च्या जिहादी कारवायांसाठीचे विशेष प्रशिक्षण घेऊन कंदाहार व अफगाण सीमेवर नॉर्दन अलायन्सेस सोबतच्या युद्धात सहभागी झालेल्या हारूनवर इंडियन मुजाहिदीनच्या कारवायांसाठी दुबईतून अर्थपुरवठ्याची जबाबदारी होती.

पालिका निवडणुकीच्या रिंगणात 70 "नागरिक उमेदवार'

मुंबई - राजकीय पक्षांचे उमेदवार निवडणूक होईपर्यंत आश्‍वासनांचा पाऊस पाडतात, पण विजयी झाल्यावर निवडून देणाऱ्या जनतेकडेच पाठ फिरवतात, अशी भूमिका घेऊन नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी "सिटिझन कॅंडिडेट' (नागरिक उमेदवार) ही संकल्पना 2007 मधील महापालिका निवडणुकीत पहिल्यांदा राबवण्यात आली. त्या निवडणुकीत जुहू येथून ऍडॉल्फ डिसोझा निवडून आले. ही संकल्पना अधिक व्यापक स्तरावर राबवण्यासाठी यावेळी 70 "नागरिक उमेदवार' निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

राष्ट्रवादी स्वबळावर उभा राहिलेला पक्ष

मुंबई - ""अन्य पक्षांतून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नेते प्रवेश करत आहेत.

रेल्वे पास नूतनीकरण आता "जनसाधारण केंद्रां'वरही

मुंबई - रेल्वेच्या मासिक वा तिमाही पासाचे नूतनीकरण करण्याची पर्यायी सोय रेल्वेने आता "जनसाधारण तिकीट' विक्रेत्यांकडेही उपलब्ध केली आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट खिडक्‍यांसमोरील रांगांमध्ये उभे राहण्याची गरज पडणार नाही.&nbsp &nbsp कमी अंतरावरील अनारक्षित तिकिटांकरिता तिकीट खिडक्‍यांसमोर लागणाऱ्या रांगा टाळण्याच्या उद्देशाने रेल्वेने "जनसाधारण तिकीट' योजना सुरू केली आहे. मागेल त्याला जनसाधारण तिकीट योजनेचे केंद्र उपलब्ध करून देण्याचे रेल्वेचे धोरण आहे. नगरपालिकेने व्यवसायासाठी मंजुरी दिलेल्या जागेत व रेल्वेस्थानकाच्या आवाराबाहेर कोणत्याही व्यक्तीला हे केंद्र सुरू करता येते.

जव्हारमधील वसतिगृहांच्या गैरव्यवहाराविरोधात याचिका

मुंबई - ठाणे जिल्ह्यातील जव्हार तालुक्‍यातल्या 75 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराविरोधात फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशनने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. रोजगारासाठी स्थलांतरित होणाऱ्या आदिवासींच्या मुलांसाठी सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून सुरू केलेल्या वसतिगृहांच्या नावाखाली पैसे उकळून अधिकारी आणि काही स्वयंसेवी संस्थांनी केलेला भ्रष्टाचार दोन वर्षांपूर्वी उघड झाला होता. यासंबंधी तत्कालीन अधिवेशनातही प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता.&nbsp जव्हार तालुक्‍यात एकूण 17 गावातल्या 17 वसतिगृहांची चौकशी तत्कालीन विस्तार अधिकारी कविता पांढरे यांनी केली होती.

नगरसेवकाच्या कमाचा हिशोब ठेवा

मुंबई - निवडणुकीत चांगला उमेदवार नाही, नकारात्मक मत नोंदविण्याची सोय नाही म्हणून निराश होऊ नका. त्यातील चांगल्यात चांगला उमेदवार निवडून त्याला मत द्या. निवडून आल्यावर त्याच्याकडून प्रत्येक कामाचा हिशोब घ्याच, त्याचबरोबर चांगले कामही करून घ्या, अशी प्रातिनिधीक प्रतिक्रिया शुक्रवारी (ता. 3) लोकसत्ता पक्षातर्फे आयोजित परिसंवादात उमटली.&nbsp लोकसत्ता पक्षातर्फे "मुंबई प्रति माझे कर्तव्य' या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग असलेल्या या परिसंवादात सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकारण्यांवर आगपाखड केली. मुंबईतल्या समस्यांचा पाढाच त्यांच्यासमोर मांडला.

रायगडमध्ये मद्यविक्रीवरील बंदी कायम

मुंबई - जिल्हा परिषद निवडणुकांच्या काळात दारूविक्रीला मनाई करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे, असे आज उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. रायगडमध्ये दारूविक्रीवरील मनाई आदेशही खंडपीठाने कायम ठेवला.&nbsp राज्यातील 27 जिल्हा परिषदांप्रमाणेच रायगडमध्येही 6 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रमामुळे 6, 7 आणि 8 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात दारूविक्री करण्यास जिल्हाधिकारी एच. के. जवले यांनी मनाई केली आहे. या मनाईला रायगड जिल्हा मद्यविक्रेता संघटनेने याचिकेद्वारे विरोध केला आहे. या प्रकरणी आज न्या. डी. डी. सिन्हा आणि न्या. विजया ताहिलरामानी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.