आपसांतील संघर्षात कांदा झालाय "साइड-ट्रॅक'
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 17:40नाशिक - गावगाड्यातील भाऊबंदकी, उमेदवारांचा आपसांतील संघर्ष यात कांद्याच्या ढासळलेल्या भावाचा विषय "साइड-ट्रॅक' झाला आहे. सद्यःस्थितीत उत्पादन खर्चाच्या निम्म्या भावाने कांदा विकण्याची वेळ आल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. दुसरीकडे मात्र जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा धुरळा उडाला असतानाही कांद्याचे आगर असलेल्या जिल्ह्यात विरोधकांना हा विषय तापवण्यात सपशेल अपयश आले आहे.  पिंपळगाव बसवंतच्या बाजार समितीमध्ये जीपभर कांदा विकण्यासाठी रानवडचे भगवान गायकवाड आले होते. त्यांनी एकरभर कांदा लावला आहे. मात्र हा कांदा सरासरी सव्वातीनशे रुपये भावाने त्यांना विकावा लागला.
आधार कार्ड योजना मार्चपासून होणार बंद
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 17:32धुळे - केंद्र शासनाने प्रत्येक नागरिकांच्या आयडेंटिसाठी आधार कार्ड योजना लागू केली आहे. येथील महापालिका क्षेत्रात असे ओळखपत्र तयार करण्याचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. ही योजना मार्चपासून बंद होत आहे. यामुळे राहिलेल्या नागरिकांनी ओळखपत्रे घेणे आवश्यक आहे. महापालिका हद्दीत देवपूर विभागासाठी नवरंग पाण्याच्या टाकीजवळ व धुळे शहरासाठी शाळा क्रमांक 21 मध्ये मार्चपर्यंत ओळखपत्र तयार करण्याचे काम सुरू राहील. हे काम 6 फेब्रुवारीपासून सुरू होईल. मार्चनंतर कुठल्याही नागरिकाला हे ओळखपत्र देता येणार नाही. ज्या नागरिकांनी ओळखपत्रांसाठी नोंदणी केली नसेल.
दहा महिन्यांत दमडीचाही खर्च नाही!
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 17:30नंदुरबार - येथील जिल्हा परिषदेच्या सभेत प्रत्येक वेळी शिक्षण आणि महिला व बालकल्याण विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या योजनांबाबत ओरड केली जाते. प्रत्यक्षात चालू आर्थिक वर्षातील गेल्या दहा महिन्यांत या दोन्ही विभागांनी एक रुपयाही खर्च केलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.  जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा आज झाली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कुमुदिनी गावित अध्यक्षस्थानी होत्या. उपाध्यक्ष जयपाल रावल, बांधकाम सभापती एम. एस. गावित, कृषी सभापती डॉ. भगवान पाटील, समाजकल्याण सभापती जयवंता पाडवी, महिला व बालकल्याण सभापती मंगला वळवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.
साखर विक्रीतील सव्वादोन कोटी घातले कुठे?
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 17:29धुळे - साक्रीतील अवसायनातील पांझराकान साखर कारखान्याच्या 825 कामगारांना थकीत देणी देण्याची जिव्हारी राज्य शिखर बॅंकेला आली आहे. ऐनवेळी परस्पर 26 कोटी 76 लाखांची देणी व एप्रिल 2003 पासूनचे व्याज देण्याची जबाबदारी निविदाधारकाच्या अंगावर टाकत कारखाना विक्री व सुरू करण्याच्या प्रक्रियेत बॅंकेनेच खोडा घातला आहे. असे असताना शिखर बॅंकेने सात वर्षांपूर्वी कारखान्याच्या साखर विक्रीतून कमावलेले सुमारे सव्वादोन कोटी रुपये घातले कुठे?
घरकुलातून खाल्लेल्या साडेअकरा कोटींचे शेअर्स जप्त करणार!
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 17:28जळगाव - हुडकोकडून घरकुलासाठी उपलब्ध झालेल्या कर्जातून प्रदीप रायसोनी, नाना वाणी, राजा मयूर यांनी मिळून साडेअकरा कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले, हे शेअर्स पोलिसांकडून गोठविण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. जे. एम. कॉटन, एस. बी. जैन ऑइल मिल, "कृषिधन' या कंपन्यांचे हे शेअर्स असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान, न्यायालयाने रायसोनी, वाणी, मयूर यांना आज पुन्हा 7 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी वाढवून दिली आहे.  माजी महापौर प्रदीप रायसोनी, खानदेश बिल्डर्सचे संचालक राजा मयूर, नाना वाणी, तत्कालीन मुख्याधिकारी पी. डी.
घोटाळ्याचे बाड सांगते, पालिका पालकाने
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 17:27जळगाव - घरकुल घोटाळ्यात संशयितांना पोलिस कोठडी वाढवून मिळावी, या सरकार पक्षाच्या मागणीवर आज न्यायालयाकडून दोन्ही बाजूने झालेले युक्तिवाद म्हणजे घात-प्रतिघात होते. न्यायालयात उपस्थित असलेल्या अडीचशेपर्यंत गर्दीच्या नजरा तपासाधिकारी सिंधूंवर रोखलेल्या होत्या.  युक्तिवादादरम्यान एकदाही "ऑर्डर ऑर्डर' म्हणण्याची न्यायालयाला गरज पडली नाही. बोलणाऱ्याव्यतिरिक्त सगळे कसे शांत...शांत होते.  सर्व दस्तावेज पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांना तपासासाठी रायसोनी, वाणी, मयूर, काळेंच्या कोठडीची काडीची गरज नाही, असे बचाव पक्षाकडून सांगण्यात आले.
गांधी जयंतीच्या ग्रामसभेत बिअर बारला परवानगीचा ठराव
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 17:24ममुराबाद (ता. जळगाव) - गांधी जयंतीच्या दिवशी (2 ऑक्टोबर) विविध विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा व आवश्यक ठराव करण्यासाठी येथे विशेष ग्रामसभा बोलविण्यात आली होती. सरपंचांसह अन्य सदस्य व सुमारे सव्वाशे ग्रामस्थांच्या उपस्थितीत सभेचे कामकाज पार पडले. पदाधिकारी ज्याच्या-त्याच्या कामासही लागले. हीच संधी साधून ग्रामविकास अधिकाऱ्याने कालांतराने बिअर बारला परवानगी देणारा बेकायदेशीर ठराव त्यात घुसडण्याची करामत केली.  काही कामानिमित्त मागील ग्रामसभांचे इतिवृत्त चाळताना खुद्द सरपंच चंद्रकांत भागवत व त्यांच्या सहकाऱ्यांना ग्रामविकास अधिकारी तानाजी श्यामराव मगर यांचे कृष्णकृत्य लक्षात आले.
कॉफीतून किमया कलाकृतींची!
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 17:23जळगाव - वातावरणातील गारव्यात फेसाळलेली, वाफाळलेली कॉफी! मजाच वेगळी, पण कॉफी पावडरपासून पेंटिंग म्हटले तर कुणाच्याही भुवया उंचावतील! कॉफी पावडरच्या वापरातून घराची सजावटही होऊ शकते म्हटल्यावर कुणीही "काय मजा घेताय' म्हणेल, मात्र ही मजा महिलांनी प्रत्यक्ष अनुभवली ती "सकाळ मधुरांगण'तर्फे आज झालेल्या कॉफी पावडर पेंटिंग प्रशिक्षण कार्यशाळेत...  गांधी उद्यानात ही कार्यशाळा झाली. "सकाळ मधुरांगण', सर्वधर्मसमभाव महिला मंडळ आणि श्री न्यू शहर मारवाडी महिला मंचतर्फे हे विशेष आयोजन करण्यात आले होते.
तडीपारीतून राजकीय शह-काटशहाच्या खेळी?
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 17:19नाशिक - महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहर पोलिसांनी काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांवरील गुन्ह्यांचा आलेख पाहून तडीपारीचे हत्यार उपसले आहे. पोलिसांकडून यादी तयार होत असली, तरी "ते' तडीपार होतील की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. तडीपारीच्या कारवाईची तलवार पोलिसांच्या माध्यमातून उपसून निवडणूक काळात शह-काटशहाचे राजकारण होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.  गेल्या महिनाभरापासून शहर पोलिसांनी शहरातील विविध आरोपींवरील गुन्ह्यांचा आलेख पाहून त्यांच्याविरुद्ध तडीपारीची कारवाई सुरू केली आहे.
भाजप-शिवसेनेचा महागाई, भ्रष्टाचार; तर आघाडीचा विकासाचा मुद्दा
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 17:18नाशिक - महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला अर्ज माघारीनंतर रंगत येणार असली, तरी राजकीय पक्ष प्रचाराचे मुद्दे तयार करण्यात मश्गुल आहेत. दहा वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजप-शिवसेनेने काडीमोड घेतला आहे. विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून महापालिकेसंबंधी विविध मुद्दे उपस्थित केले जाणार आहेत. त्यावर उपाय म्हणून राष्ट्रीय व राज्यपातळीवर गाजलेले भ्रष्टाचार, महागाईच्या मुद्यांभोवती मतदारांचे लक्ष केंद्रित करण्यावर सत्ताधाऱ्यांकडून भर दिला जाणार आहे.
"पक्ष पदाधिकाऱ्यांना भेटण्यास सक्त मनाई'
Submitted by admin on Thu, 02/02/2012 - 19:25इंदिरानगर -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकीट वाटपानंतर तिकीट न मिळालेल्या इच्छुकांचा रोष अजूनही कमी झालेला नाही. काहींनी पदाधिकाऱ्यांचे दूरध्वनी घेणे बंद केले आहे, तर काहींनी कार्यालयाच्या सूचना फलकावर पदाधिकाऱ्यांना भेटण्यास मनाई, अशी स्पष्ट सूचना लिहून नाराजी व्यक्त केली आहे. प्रभाग 40 मधील सर्वसाधारण जागा, 52 मधील पुरुष सर्वसाधारण आणि 53 मधील महिला राखीव जागेवर इच्छुकांनी अधिकृत उमेदवारांना विचारात पाडले आहे. प्रभाग 40 मधून जयश्री गिते आणि पुष्पावती बांडे यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे सौ. बांडे कॉंग्रेसच्या तिकिटावर, तर सौ. गिते यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
चेनपुलिंग'च्या घटनांमध्ये दुपटीने वाढ
Submitted by admin on Thu, 02/02/2012 - 19:25नाशिक रोड - नाशिक रोड स्थानकात न थांबणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये साखळी ओढून थांबविण्याच्या स्वयंघोषित प्रकारात दुपटीने वाढ झाली आहे. गेल्या वर्षात रेल्वे प्रशासनाने ऐंशी जणांना साखळ्या ओढून रेल्वे थांबविल्याच्या आरोपावरून दंड केला आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या नाशिकला थांबविण्यामागे तिकीट काढलेल्या प्रवाशांचीच संख्या अधिक आहे. थांबा नसलेल्या गाड्यांना नाशिक रोड स्थानकाचा थांबा दिला गेल्यास चेनपुलिंगचे गुन्हे झपाट्याने घटतील, असाही प्रवाशांचा सूर आहे. या मार्गावरून मध्य रेल्वेच्या अनेक गाड्या धावतात, परंतु थांबत नाहीत. त्यामुळे नाशिकला उतरणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होते.
सिडकोत प्रचारासाठी येणार गावाकडची मंडळी
Submitted by admin on Thu, 02/02/2012 - 19:25सिडको - महापालिका निवडणुकीत प्रचारासाठी केवळ सातच दिवस मिळणार असल्याने सिडकोतील उमेदवारांनी हायटेक प्रचारावर भर दिला असून, मोबाईल क्रमांक मिळवून नातेवाइकांमार्फत मतदारांपर्यंत पोचण्यासाठी धडपड सुरू केली आहे. येथे विविध उमेदवारांच्या प्रचारासाठी गावाकडची मंडळी येणार आहे. त्यामुळे सोमवारपासून येथे खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. सिडको परिसर हा तसा मिश्र वस्तीचा भाग. येथे कामानिमित्त राज्याच्या विविध भागातून नागरिक आलेले आहेत. त्यात निवडणुकीत खानदेश, कसमादे भागासह इतर भागातील उमेदवारही उतरले आहेत. त्यामुळे प्रादेशिकतेचा ठसा येथील निवडणुकीवर हमखास उमटत असतो.
आधी फुटला घाम; नंतर भांड्यात पडला जीव!
Submitted by admin on Thu, 02/02/2012 - 19:25नाशिक - दक्षता समितीच्या अहवालाशिवाय प्राप्त झालेले जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाने कडाक्याच्या थंडीत महापालिका निवडणुकीत राखीव जागांवर लढणाऱ्या उमेदवारांना घाम फोडला. 144 उमेदवारांचे जात प्रमाणपत्र दक्षता समितीच्या अहवालाशिवाय प्राप्त झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्या उमेदवारांवर गंडांतर येता येता टळले ते सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल ग्राह्य धरला असता, तर प्रभाग क्रमांक 21 अ व 37 अ मध्ये उमेदवारच शिल्लक राहिले नसते. तर प्रभाग 39 अ मध्ये बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली असती.
पखवाज-व्हायोलिन जुगलबंदी अन् भरतनाट्यम्चा पदन्यास!
Submitted by admin on Thu, 02/02/2012 - 19:25नाशिक - ओडीसी, भरतनाट्यम् नृत्याचा सुंदर पदन्यास, शास्त्रीय गायन, त्याचबरोबर पखवाज-व्हायोलिन यांची रंगलेली जुगलबंदी असा बहारदार संगीत-नृत्याचा कार्यक्रम सादर करून युवा प्रतिभावंत कलाकारांनी नाशिकमधील रसिकांना मंत्रमुग्ध केले. नागपूरच्या दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे आजपासून युवा संगीत नृत्य महोत्सवाला परशुराम साईखेडकर नाट्यगृहात प्रारंभ झाला. उद्या (ता. 3) याचा समारोप होणार आहे. ज्येष्ठ चित्रकार शिवाजीराव तुपे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नटराज पूजन करून उद्घाटन करण्यात आले. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे कार्यक्रम अधिकारी रामचंद्र भरतू या वेळी उपस्थित होते.
