सहलीतील विद्यार्थिनीला घेऊन प्राध्यापक पळाला
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 16:40औरंगाबाद - औरंगाबाद परिसरातील पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातून आलेल्या एका प्राध्यापकाने सहलीच्या मुक्कामातून विद्यार्थिनीसह पलायन केले. या प्रेमप्रकरणाने खळबळ उडाली आहे. नांदेड जिल्ह्यतील नायगाव येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाची (डी.फॉर्मसी) सहल गुरुवारी (ता. दोन) औरंगाबाद आणि परिसरातील पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी आलेली होती. सहलीमध्ये 40 मुले, 11 मुली आणि तीन प्राध्यापकांचा सामावेश होता. सहलीतील विद्यार्थ्यांना थांबण्यासाठी भडकलगेट येथील जे.जे. लॉजवर व्यवस्था करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांनी वेरूळ, अजिंठा, बिबी-का-मकबरा आणि मॉलला भेट दिली.
दैठणाच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 16:40परभणी - तालुक्यातील दैठणा गटात चारही प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी गेल्या काही दिवसांपासून विविध क्लृप्त्या अवलंबून प्रत्यक्ष भेटी-गाठींवर लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान, निर्णायक ठरणाऱ्या स्थलांतरित मतदारांना आपलेसे करण्यासाठी उमेदवारांचे आटोकाट प्रयत्न सुरू असून, दैठणाच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या गटात खरी लढत शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांत होणार आहे. या गटाअंतर्गत येणाऱ्या दैठणा व धसाडी या दोन्ही गणांतील लढतीतही रंगत निर्माण झाली आहे.
तीन वाहनांच्या विचित्र अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 16:03किल्लेधारूर - टेंपो, जीप आणि दुचाकी यांच्या विचित्र अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर टेंपोमधील वीस जण जखमी झाल्याची घटना येथील घाटात शनिवारी (ता. चार) दुपारी चार वाजता घडली. जखमींपैकी सात जण गंभीर असून त्यांना अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या तिहेरी व विचित्र अपघातात सचिन सूर्यकांत काटकर (वय 32, रा. दिंद्रूड, ता. माजलगाव) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर दिनेश गावंडर (वय 28, रा. दिंद्रूड) हा गंभीर जखमी झाला. भागवत प्रकाश आघाव, खंडू भाऊराव दराडे, ज्ञानेश्वर श्रीरंग दराडे, आशामती आघाव, (सर्व रा. आडगाव, ता. सेलू) हे गंभीर जखमी झाले.
प्रकाश सोळंकेंचे फुटणारे घर मीच वाचविले !
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 16:05बीड - महाराष्ट्राच्या राजकारणात मी गेल्या 35 वर्षांपासून काम करीत आहे. सर्वच पक्षांतील राज्यस्तरीय नेत्यांपासून ते जिल्हास्तरीय नेत्यांशी आपले स्नेहाचे संबंध आहेत. मी कोणत्याही नेत्याचे घर फोडण्याचे काम केले नाही, उलट राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांचे फुटणारे घर मीच वाचविले, असे सांगून राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. केज तालुक्यातील बनसारोळा येथे आयोजित जाहीर सभेत मुंडे बोलत होते. शुक्रवारी (ता.3) राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी "निलंगेकर, मोहिते, हिरे यांची घरे कुणी फोडली' असा सवाल उपस्थित करीत खासदार मुंडे यांच्यावर घर फोडल्याचे आरोप केले होते.
दुसऱ्या टप्प्यातील सहा पालिकांचे अध्यक्ष 18 फेब्रुवारीला ठरणार
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 16:40नांदेड - डिसेंबर 2011 अखेर दुसऱ्या टप्प्यात निवडणुका झालेल्या देगलूर, कुंडलवाडी, बिलोली, मुखेड, कंधार आणि मुदखेड या पालिकांचा निकाल ता. 26 डिसेंबर रोजी जाहीर झाला परंतु नगराध्यक्षाची निवड लांबणीवर पडली. आता 54 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ता. 18 फेब्रुवारी रोजी विशेष सभेत या पालिकांचे नगराध्यक्ष निवडण्यात येणार आहेत. ता. 17 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्याच्या दुसऱ्याच दिवशी नगराध्यक्षांची निवड होणार आहे.
'राष्ट्रवादी हा उच्च शिक्षितांना संधी देणारा एकमेव पक्ष '
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 16:40चाकूर - तरुण व उच्चशिक्षितांना निवडणुकीत संधी देणारा राष्ट्रवादी हा एकमेव पक्ष आहे. पक्षाची विचारधारा आवडल्याने हजारो तरुण राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहेत. या तरुणांना नेतृत्व करण्याची संधी मिळावी यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करून पक्षाची ताकद वाढवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार ऍड. युवराज पाटील, करीम गुळवे, चंद्रकांत मारापल्ले यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री श्री. पवार यांची शनिवारी (ता. 4) येथे सभा झाली. माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव अध्यक्षस्थानी होते.
मतविभागणीने बिघडणार प्रत्येकाचेच विजयाचे गणित !
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 16:40परभणी - सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणात विजयी होण्याकरिता निरनिराळी समीकरणे जुळवून सक्षम उमेदवारांची निवड केली खरी मात्र, बंडखोर अपक्षांसह प्रतिस्पर्धी उमेदवारांनी टाकलेल्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष डावपेचामुळे होणारी मतविभागणी कुणाच्या पथ्थ्यावर पडणार..? कुणाच्या विजयातील अडसर ठरणार..? हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. जिल्हा परिषदेचे 52 गट आणि नऊ पंचायत समित्यांचे 104 गणांसाठी उमेदवार निवडताना राजकीय पक्षांनी त्या गटातील जाती-पोटजातीची समीकरणे, आर्थिक स्थिती, खर्च करण्याची कुवत, जनसंपर्क आदी निकष लावले.
'दिशाहीन राजकारणामुळे लोकांचे प्रश्न सुटत नाहीत '
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 16:40उमरगा/मुरूम - विरोधकांकडे कुठलीही दिशा नाही. दिशाहीन राजकारणामुळे लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. केंद्र व राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या सक्षम असून, ग्रामपातळीवर राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा फायदा जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून करून घेण्यासाठी मतदारांनी कॉंग्रेसच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीतील कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी मुरूम (गणेशनगर, ता. उमरगा) येथे शनिवारी(ता. चार) आयोजित सभेत मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते.
पत्र उशिरा आल्याने कॉंग्रेसचे पाठिंब्याचे धोरण
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 16:40औरंगाबाद - कॉंग्रेस आणि भारिप-बहुजन महासंघाच्या महाआघाडीला सोडण्यात आलेल्या जागांवर कॉंग्रेसच्या उमेदवारांनी ठाण मांडले आहे. ""अर्ज मागे घेण्यास तांत्रिक कारणामुळे उमेदवारांना वेळ मिळाला नाही'', असा बचावात्मक पवित्रा घेत भारिपच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे धोरण कॉंग्रेसने स्वीकारले आहे. कॉंग्रेस आणि भारिप-बहुजन महासंघाच्या महाआघाडीची घोषणा 29 जानेवारी रोजी झाली होती मात्र जागा वाटपाबाबत स्पष्ट सूचना न मिळाल्याने कॉंग्रेसच्या उमेदवारांनी शेवटपर्यंत आपले अर्ज कायम ठेवले. यामुळे स्थानिक नेत्यांनी कॉंग्रेसच्या या धोरणावर कडाडून टीका करीत कॉंग्रेसविरोधात प्रचार करण्याचा इशारा दिला होता.
वेतनातूनच विम्याचा हप्ता कापल्याने महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम
Submitted by admin on Sat, 02/04/2012 - 16:40औरंगाबाद - महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनातून "समूह विमा'च्या नावाखाली डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या वेतनातून प्रत्येकी 269 रुपये कापल्याने कर्मचाऱ्यांमध्ये शनिवारी (ता. चार) संभ्रमाचे वातावरण होते. महापालिकेच्या वतीने विमा कंपनीला 12 लाख रुपयांचा धनादेशही देण्यात आल्याचे समजते. विमा काढण्यासाठी ज्या लोकांनी आक्षेप घेतला होता, त्यांचेही पैसे कपात करण्यात आले. महापालिकेत काम करीत असलेले अनेक कर्मचारी अशिक्षित आहेत. यामुळे त्यांना विम्याचा भविष्यात फायदा होईल, या उद्देशाने इंडिया फस्ट लाईफ इन्शुरन्स कंपनीकडून कर्मचाऱ्यांचा समूह विमा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
गोपीनाथ मुंडेंनाच मी पक्षात नको होतो!
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 21:10परळी - "खासदार गोपीनाथ मुंडे यांनाच मी पक्षात नको होतो. त्यामुळे त्यांनी आपली कोंडी केली. परळी पालिकेत भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष होत होता. मात्र, त्यांनी अट्टहास धरून हे "महाभारत' घडविले,'' असा आरोप करून ""गोपीनाथ मुंडे मोठे आहेत, म्हणून ते बोलतात तेच खरे आणि आपण लहान आहोत म्हणून आपले खोटे ठरवले जात आहे,'' अशी खंत भाजपचे बंडखोर आमदार धनंजय मुंडे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. ""परळी नगरपालिकेत भाजपचाच नगराध्यक्ष होणार होता. आपल्याला तोडायचे नव्हते म्हणून आपण अध्यक्षपदासाठी दीपक देशमुख यांचा एक अर्ज भाजपकडून आणि दुसरा अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला होता.
गोपीनाथ मुंडेंनाच मी पक्षात नको होतो!
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 21:10परळी - "खासदार गोपीनाथ मुंडे यांनाच मी पक्षात नको होतो. त्यामुळे त्यांनी आपली कोंडी केली. परळी पालिकेत भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष होत होता. मात्र, त्यांनी अट्टहास धरून हे "महाभारत' घडविले,'' असा आरोप करून ""गोपीनाथ मुंडे मोठे आहेत, म्हणून ते बोलतात तेच खरे आणि आपण लहान आहोत म्हणून आपले खोटे ठरवले जात आहे,'' अशी खंत भाजपचे बंडखोर आमदार धनंजय मुंडे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. ""परळी नगरपालिकेत भाजपचाच नगराध्यक्ष होणार होता. आपल्याला तोडायचे नव्हते म्हणून आपण अध्यक्षपदासाठी दीपक देशमुख यांचा एक अर्ज भाजपकडून आणि दुसरा अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला होता.
कल्याणकारी योजनांसाठी कॉंग्रेसला विजयी करा
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 20:40जालना - केंद्र आणि राज्यात कॉंग्रेस आघाडी सरकार असल्याने विकास, कल्याणकारी योजनांचा लाभ जालन्यासारख्या मागासलेल्या जिल्ह्याला मिळण्यासाठी जिल्हा परिषद निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रेवगाव (ता. जालना) येथे शुक्रवारी (ता. तीन) केले. जिल्ह्यातील पालिका निवडणुकीतील यशाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. जालना तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांमधील कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजिण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.
शासकीय इमारतींसाठी दीडशे हेक्टर जागा देणार
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 20:10जालना - येथील प्रशासकीय इमारत संकुलातील 297 हेक्टर जमीन शासकीय कार्यालये आणि निवासस्थानांसाठी राखून ठेवण्यात आली आहे. यापैकी 147 हेक्टर जमिनींचे विविध शासकीय विभागांना वाटप करण्यात आले असले, तरी उरलेल्या दीडशे हेक्टरमध्ये शहरातील खासगी भाड्याच्या इमारतीतील कार्यालयांना त्यांच्या हक्काच्या इमारती बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय शुक्रवारी (ता. तीन) घेण्यात आला, अशी माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी दिली. प्रशासकीय इमारत संकुलातील जमिनीबाबतचा आढावा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
रस्ते, वीज, पाण्यावर पुढारी काही बोलेनात!
Submitted by admin on Fri, 02/03/2012 - 19:55परभणी - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्तारूढ व विरोधी पक्षांनी सभांतून व्यक्तिगत हेव्यादाव्यांसह आरोप-प्रत्यारोपाचा धुराळा उडवून दिला आहे. या रणधुमाळीत विकासाच्या मुद्द्याला मात्र सर्वांनी पद्धतशीरपणे बगल दिली आहे. प्रत्येक खेड्यापाड्यातील मूलभूत सोयी-सुविधांसह विकासाच्या प्रश्नांवर कुणीही बोलत नसल्याने ही निवडणूक म्हणजे उखाळ्यापाखाळ्या काढण्याचे साधन आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एरवी जनतेवर आश्वासनांचा पाऊस पाडणारे नेते विकासकामांविषयी चकार शब्दही काढायला तयार नाहीत. ग्रामीण भागातील समस्या भयावह आहेत.
